Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aai Tuljabhavani Exclusive: 600 भागात अभिनयाचे वेगवेगळे कंगोरे देता आले, ‘शुंभा’ पात्रासाठी खूपच मेहनत – सोनाली पाटील

कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिका मोठा टप्पा गाठत आहे. या मालिकेचे ६०० भाग पूर्ण होत असून शुंभा व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सोनाली पाटीलने नवराष्ट्रसह खास बातचीत केली आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 19, 2026 | 03:29 PM
Exclusive: सोनाली पाटीलने सांगितला 'शुंभा' व्यक्तिरेखेमागील मेहनतीचा प्रवास

Exclusive: सोनाली पाटीलने सांगितला 'शुंभा' व्यक्तिरेखेमागील मेहनतीचा प्रवास

Follow Us
Follow Us:
  • शुंभा’ पात्रासाठी सोनाली पाटीलने स्वतःला झोकून दिले
  • काही काळासाठी आलेली भूमिका आता दीड वर्ष साकारत आहे 
  • अभियनाचे वेगवेगळे कंगोरे देता आले हेच समाधान 
‘आई तुळजाभवानी’ या कलर्स मराठीच्या मालिकेचे नेहमीच कौतुक होत असते. यातील कथा, सर्व कलाकारांचा अभिनय, संवाद आणि त्यामागे घेतलेली मेहनत याबाबतही नेहमीच चर्चा होत असते. ही मालिका सोमवारी ६०० भागांचा टप्पा गाठत आहे. याच निमित्ताने मालिकेत ‘शुंभा’ची भक्कम भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनाली पाटीलशी ‘नवराष्ट्र’ने खास गप्पा मारल्या आणि तिनेही अगदी उत्साहाने आपल्याला वाटत असणाऱ्या या भूमिकेविषय मनसोक्त उत्तरं दिली आहेत. 

‘शुंभा’ या पात्राची नकारात्मक उर्जा आहे, पण गेले वर्षभर तू हा दरारा प्रेक्षकांच्या मनावर कसा टिकवून ठेवलास? या भूमिकेची तयारी कशी केलीस? असं विचारल्यावर सोनाली म्हणाली, ‘ही माझी नकारात्मक भूमिका साकारण्याची पहिलीच वेळ आहे. खरं सांगू का? जशी मी पडद्यावर दिसते तशी मी प्रत्यक्षात नाही. त्यामुळे शुंभाची भूमिका साकारणं हे माझ्यासाठी मोठं आव्हान होतं आणि आताही आहे. १७२ व्या भागात मी आले आणि आता ६०० चा टप्पा पार करत आहे मला खूपच भारी वाटतंय. या भूमिकेसाठी मला प्रचंड मेहनत करावी लागत आहे. कारण मुळात जी मी नाही ते मला दाखवावं लागतं आणि यामुळे माझी प्रचंड दमछाक होते. पण एक मात्र नक्की हे करत असताना मला हे काम फारच भावलं आहे. कारण यामध्ये माझ्या अभिनयाचा कस लागतो आणि यातून वेगवेगळे कंगोरे मला पडद्यावर दाखवता येतात. कारण उन्हात काम करत घाम गाळावा लागतो, तर कधी वेगवेगळ्या लुकसाठी कष्ट घ्यावे लागतात, सीन देताना खूप एनर्जी लागते आणि हे सर्व करताना मला स्वप्नील राजशेखर यांची खूपच मदत झाली हे विसरून चालणार नाही. त्यांनी संवाद कसे घ्यावे, भाषेवर कसे काम करावे हे मला शिकवले आणि आता त्याचं फळ मला मिळतंय.’

‘तुळजाभवानीचा आशिर्वाद म्हणूनच ही भूमिका मिळाली’, देवीच्या भक्तीत लीन पूजा काळे

ही भूमिका स्वीकारताना साशंक होतीस का? किंवा भीती वाटली होती का? आता दीड वर्षानंतर काय वाटतंय? यावर सोनालीने क्षणाचाही विलंब लावला नाही आणि म्हणाली, ‘हा ना खरंच तू माझ्या मनातला प्रश्न विचारलास. जेव्हा ही भूमिका माझ्याकडे आली ना तेव्हा माझ्या मनात एक चित्र होतं की नकारात्मक भूमिका आहे तर मला अक्राळविक्राळ दाखवणार, काळे कपडे देणार आणि मी तसे प्रश्नही विचारले. पण जेव्हा मला प्रॉडक्शनकडून कळलं की, शुंभा ही एक वाईट प्रवृत्ती आहे आणि ती  साकारायची आहे, या प्रवृत्तीला लढा देणारी दुसरी चांगली प्रवृत्ती आहे. मला एक सम्राज्ञी म्हणून सुंदरच दाखविण्यात येणार आहे कळल्यावर माझा जीव भांड्यात पडला आणि मी काम करायला तयार झाले.’

तुला ही भूमिका करताना काय आव्हानं जाणवतात? रोज वेगवेगळे सीन असतात, यात राग, युद्ध सर्वच असतं मग अशावेळी मानसिक थकवा येतो का? यावर सोनाली म्हणाली, ‘हो खरंच इतके हेव्ही सीन असतात की, अगदी श्वास फुलतो. अशावेळी वाटतं की आता थांबावं आणि मग दुसरा सीन करावा. पौराणिक कथेचं शूट करणं हे खूपच थकवा देणारं आहे. शारीरिक आणि मानसिक असा दोन्ही थकवा जाणवतो. पण जेव्हा प्रेक्षकांना काम आवडतं ना तेव्हा आमच्या मेहनतीचं फळ मिळाल्यासारखं वाटतं. मी अशी नाहीच आहे त्यामुळे नसलेलं दाखवताना अजूनच त्रास होतो आणि असा अभिनय करणं हे नक्कीच माझ्यासाठी आव्हान आहे.’ 

यानंतर जेव्हा सोनालीला प्रेक्षकांची प्रतिक्रिया कशी येते? काही गंमतीशीर किस्से सांग म्हटल्यावर ती हसूनच उत्तर द्यायला सुरूवात केली, ‘प्रेक्षक कामाची चांगलीच पोचपावती देतात पण इतकं बारीक निरीक्षण करतात ना. हे तुम्हाला ऐकायला पण मजेशीर वाटले की, अनेक चाहते सेटवर येतात आणि भेटल्यावर विचारतात की, तुम्ही सम्राज्ञी म्हणून काम करता आणि फक्तच दोनच कपडे का वापरता? आम्ही कधी याचा विचारही करत नाही पण प्रेक्षक अगदी बारकाईने पाहतात.’

Exclusive: ‘आई तुळजाभवानी’च्या अलौकिक विवाहाचा हा अनुभव खूपच अद्भुत – पूजा काळे

सहकलारांसह तुझी केमिस्ट्री इतकी परफेक्ट कशी आहे? विचारल्यावर सोनाली म्हणाली, ‘मला काम एन्जॉय करायला खूप आवडतं आणि खरं सांगू का एकदा का केमिस्ट्री जमली ना की काम उत्तम होतं. जेव्हा तुमच्या सहकलाकारांसह ऑफस्क्रिन केमिस्ट्री चांगली असते ना तेव्हा ऑनस्क्रिन सीन चांगले होण्यास मदत मिळते आणि माझं तर सर्वांशीच खूप चांगलं जमतं’ याबरोबरच तिने प्रेक्षकांचेही आभार मानले आणि आई तुळजाभवानी मालिका असेच त्यांचे मनोरंजन करत राहील असंही सांगायला ती विसरली नाही. 

Web Title: Actress sonali patil shared experience as shumba character in aai tuljabhavani on colours marathi exclusive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Aai Tuljabhavani
  • colors marathi
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य
1

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?
2

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत
3

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख
4

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.