Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Film Festival: अंजली पाटीलची ‘सेल्वी’ची जगभरात झेप! बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार दिमाखदार वर्ल्ड प्रीमियर

Film Festival: अभिनेत्री अंजली पाटील आता अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करत आहे. तिच्या आगामी ‘सेल्वी’ या तमिळ चित्रपटाची 31व्या बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. 6 ते 15 ऑक्टोबर 2026 दरम्यान होणाऱ्या या महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवात ‘सेल्वी’चा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 24, 2026 | 05:52 PM
Film Festival: अंजली पाटीलची ‘सेल्वी’ची जगभरात झेप! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Film Festival: अंजली पाटीलची ‘सेल्वी’ची जगभरात झेप! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ची बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड
  • 6 ऑक्टोबरला चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर
  • ‘व्हिजन एशिया’ विभागातून मिळणार आंतरराष्ट्रीय व्यासपीठ
Anjali Patil’s ‘Selvi’ : अभिनेत्री अंजली पाटील आता अभिनयासोबतच निर्मितीच्या क्षेत्रातही वेगळी ओळख निर्माण करत आहे. तिच्या आगामी ‘सेल्वी’ या तमिळ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झाली असून, हा चित्रपट थेट बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकणार आहे. त्यामुळे चित्रपटाच्या टीमसाठी हा क्षण विशेष मानला जात आहे.

दिग्दर्शक सैलेश रत्नकुमार यांचा हा पहिलाच फीचर फिल्म प्रोजेक्ट आहे. 6 ते 15 ऑक्टोबर 2026 दरम्यान होणाऱ्या 31व्या बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘सेल्वी’चा वर्ल्ड प्रीमियर होईल. ‘व्हिजन एशिया’ या विभागात या चित्रपटाची निवड झाली आहे. आशियातील नव्या दिग्दर्शकांच्या कलाकृतींना या विभागातून मोठं व्यासपीठ मिळतं.

चित्रपटात वेध

‘सेल्वी’ची कथा अशा महिलांभोवती फिरते, ज्या घरगुती आरोग्यसेवा देण्याचे काम करतात. दुसऱ्यांच्या घरात राहून आजारी व्यक्तींची काळजी घेणाऱ्या या महिलांचं स्वतःचं आयुष्य मात्र अनेकदा दुर्लक्षित राहतं. कामाचा ताण, घरापासून दूर राहण्याची वेळ, नवीन ठिकाणी जुळवून घेण्याची धडपड आणि मनात साचणाऱ्या भावना या सगळ्यांचा या चित्रपटात वेध घेतला आहे.

कथेची कल्पना दिग्दर्शक सैलेश रत्नकुमार आणि सिनेमॅटोग्राफर भार्गव श्रीधर यांनी मिळून विकसित केली. भार्गव यांच्या आईच्या आजारपणात घरच्या नर्सेसकडून मिळालेली सेवा त्यांनी जवळून पाहिली. त्या काळात या महिलांचे आयुष्य, त्यांची परिस्थिती आणि त्यांच्या रोजच्या अडचणी लक्षात आल्या. त्यातूनच ‘सेल्वी’ची कथा आकाराला आली.  Film Festival:

Kriti Sanon Raksha Bandhan Ad: “लाज कशी वाटत नाही?”, कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरातीवर नेटकऱ्यांचा संताप; नेमकं काय घडलं?

चित्रपटातील प्रमुख भूमिका अंजली पाटील

सैलेश स्वतः कोयंबतूरहून चेन्नईला आलेला असल्याने स्थलांतराचा अनुभव त्याच्यासाठीही नवीन नव्हता. त्यामुळे आपल्या शहरापासून दूर जाऊन दुसऱ्यांसाठी काम करणाऱ्या महिलांच्या जगाशी त्याला एक वेगळं नातं जाणवलं.चित्रपटातील प्रमुख भूमिका अंजली पाटीलने साकारली असून, ती या सिनेमाची निर्मातीही आहे. ‘अनाहत फिल्म्स’ या तिच्या बॅनरखाली हा प्रोजेक्ट तयार झाला आहे. अभिनय क्षेत्रात वेगळी छाप पाडल्यानंतर निर्मितीमध्येही स्वतःच्या आवडीच्या कथा पुढे आणण्याचा अंजलीचा प्रयत्न आहे.

नऊ राष्ट्रीय पुरस्कार

‘सेल्वी’ हा अनाहत फिल्म्सचा पहिला पूर्ण लांबीचा तमिळ चित्रपट ठरणार आहे. याआधी या संस्थेने विविध विषयांवरील फिक्शन आणि नॉन-फिक्शन प्रोजेक्ट्सवर काम केले आहे. त्यामुळे या चित्रपटातून बॅनरची नवी दिशा प्रेक्षकांसमोर येणार आहे. सिनेमामागे अनुभवी तंत्रज्ञांची टीमही आहे. तब्बल नऊ राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले ए. श्रीकर प्रसाद यांनी चित्रपटाचं एडिटिंग केलं आहे. ‘पोन्नियिन सेल्वन: पार्ट वन’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले आनंद कृष्णमूर्ती यांनी साऊंड डिझाईनची जबाबदारी सांभाळली आहे.

Mirzapur The Movie: पुणेकरांनो, सज्ज व्हा! प्रमोशनसाठी ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची टीम येणार चाहत्यांच्या भेटीला; साधणार खास संवाद

‘सेल्वी’च्या संपूर्ण टीमसाठी मोठी गोष्ट

चित्रपटाला रेड सी फंड आणि हाँगकाँग एशिया फिल्म फायनान्सिंगकडूनही सहकार्य मिळाले आहे. त्यामुळे ‘सेल्वी’चा प्रवास भारतापुरता मर्यादित न राहता जागतिक चित्रपटविश्वात पोहोचण्याची संधी मिळाली आहे. सानसारख्या प्रतिष्ठित महोत्सवात चित्रपटाचा पहिला प्रयोग होणे ही ‘सेल्वी’च्या संपूर्ण टीमसाठी मोठी गोष्ट आहे. आता या चित्रपटाकडे आंतरराष्ट्रीय प्रेक्षक आणि चित्रपटविश्वाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Anjali patils selvi selected for busan international film festival 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • bollywood Flim
  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील
1

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील

Chandrapur News: चंद्रपूरवर पाणीटंचाईचे संकट? जलप्रकल्पांमध्ये केवळ 55.85% जलसाठा, शेतकऱ्यांची चिंता वाढली
2

Chandrapur News: चंद्रपूरवर पाणीटंचाईचे संकट? जलप्रकल्पांमध्ये केवळ 55.85% जलसाठा, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Raigad News: रोहा तालुक्यातील तिसे गावावर दरडीचा धोका, संरक्षण भिंतीचे काम रखडले; ग्रामस्थांचा जीव टांगणीला
3

Raigad News: रोहा तालुक्यातील तिसे गावावर दरडीचा धोका, संरक्षण भिंतीचे काम रखडले; ग्रामस्थांचा जीव टांगणीला

मासे खाताय सावधान!!! बोबींल ताजे दिसावे म्हणून महिलेने जे काही केले ते पाहून पुन्हा मासे खाण्याची इच्छा राहणार नाही… Video Viral
4

मासे खाताय सावधान!!! बोबींल ताजे दिसावे म्हणून महिलेने जे काही केले ते पाहून पुन्हा मासे खाण्याची इच्छा राहणार नाही… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.