Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apurva Nemlekar: अमेरिकेत रंगली अपूर्वा नेमळेकरची पहिली मंगळागौर; नऊवारी साडी, झिम्मा-फुगडी अन् मराठमोळा थाट!

Apurva Nemlekar: अपूर्वा नेमळेकरने लग्नानंतरची पहिली मंगळागौर अमेरिकेतील कॅलिफोर्नियात साजरी केली. नऊवारी साडीतील मराठमोळा लूक आणि झिम्मा-फुगडीने वेधलं चाहत्यांचं लक्ष.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 28, 2026 | 10:05 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Apurva Nemlekar: श्रावण महिना सुरू झाला की नवविवाहित महिलांमध्ये मंगळागौरीच्या सणाची विशेष उत्सुकता पाहायला मिळते. श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करण्याची परंपरा आहे. या निमित्ताने महिला एकत्र येत पारंपरिक खेळ खेळतात. झिम्मा, फुगडी आणि जुन्या मराठमोळ्या गाण्यांमुळे मंगळागौरीच्या उत्सवाला खास रंग चढतो. टाळ्यांच्या तालावर गाणी म्हणत गोलाकार फिरत खेळला जाणारा झिम्मा आणि फुगडी हा या उत्सवाचा अविभाज्य भाग मानला जातो. त्यामुळे मंगळागौरीच्या माध्यमातून धार्मिक परंपरेसोबतच महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृतीही जपली जाते.

याच परंपरेचा अनुभव अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनेही घेतला आहे. लग्नानंतरची तिची पहिली मंगळागौर तिने थेट अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये साजरी केली. परदेशात असूनही अपूर्वाने मराठमोळ्या परंपरा आणि संस्कृतीची नाळ जपली. या खास सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

नऊवारी साडीतील अपूर्वाचा मराठमोळा लूक

अपूर्वाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा पारंपरिक मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे. तिने लाल रंगाची नऊवारी साडी नेसली असून, त्यावर पिवळा शेला घेतला आहे. पारंपरिक दागिने, नाकातील नथ, कपाळावरील चंद्रकोर आणि हातातील हिरव्या बांगड्यांचा चुडा यामुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसत आहे.

परदेशातील मंगळागौरीच्या या सोहळ्यात अपूर्वाने पारंपरिक खेळांचाही आनंद घेतला. तिच्या या खास अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

‘माझी पहिली मंगळागौर…’

अपूर्वाने आपल्या पहिल्या मंगळागौरीचा अनुभवही सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला. तिने लिहिलं, “माझी पहिली मंगळागौर आणि ती सुद्धा अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये झाली. आपल्या सुंदर मराठी परंपरा परदेशातही इतक्या प्रेमाने आणि उत्साहाने जपल्या जात असल्याचं पाहून खूप आनंद झाला. महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर असूनही यानिमित्ताने घराच्या अगदी जवळ असल्यासारखं वाटलं. हा माझ्यासाठी खरोखरच खूप स्पेशल आणि अविस्मरणीय अनुभव होता.”

ती पुढे म्हणाली, “सर्वांमध्ये एक जबरदस्त उत्साह होता. त्यामुळे हा दिवस माझ्यासाठी कायम लक्षात राहणारा ठरला. सर्वांना एकत्र आणल्याबद्दल आणि सातासमुद्रापार आपली संस्कृती व परंपरा जिवंत ठेवल्याबद्दल ‘मराठी आई इनिशिएटिव्ह’ (MAI) आणि डॉ. सायली नातू यांचे मनापासून आभार. परदेशातही आपली संस्कृती आणि ही सुंदर नाळ जपली जातेय, हे पाहून मन भरून आलं.”

Rakshabandhan 2026: अर्जुन कपूरपासून सलमान खानपर्यंत; बहिणींची जबाबदारी पालकाप्रमाणे सांभाळतात हे कलाकार

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

अपूर्वाने शेअर केलेल्या या खास पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिचा पारंपरिक मराठमोळा लूक आणि अमेरिकेतही जपलेली महाराष्ट्राची संस्कृती चाहत्यांना विशेष भावली आहे. अनेकांनी कमेंट्स करत अपूर्वाच्या या खास लूकचे आणि मंगळागौरीच्या सेलिब्रेशनचे कौतुक केले.

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’; उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी प्रथमच एकत्र

लग्नानंतरची पहिलीच मंगळागौर

दरम्यान, अपूर्वाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, तिने १४ फेब्रुवारी २०२६ रोजी तनुज गोवळकरसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतरची ही तिची पहिलीच मंगळागौर होती. विशेष म्हणजे, अपूर्वाच्या या खास सोहळ्यात तिचा पती तनुज गोवळकरही सहभागी झाला होता. कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या या मंगळागौरीच्या कार्यक्रमात त्याचीही उपस्थिती पाहायला मिळाली.

अशाप्रकारे महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर अमेरिकेत अपूर्वाने आपली पहिली मंगळागौर साजरी करत मराठमोळ्या संस्कृतीची सुंदर झलक दाखवली.

Web Title: Apurva nemlekar first mangalagaur america california

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress

संबंधित बातम्या

Ketaki Kulkarni: ‘कठीण काळात स्वतःवरचा विश्वासच माझी शक्ती ठरला’; ‘कमळी’ फेम केतकी कुलकर्णीचा प्रेरणादायी खुलासा
1

Ketaki Kulkarni: ‘कठीण काळात स्वतःवरचा विश्वासच माझी शक्ती ठरला’; ‘कमळी’ फेम केतकी कुलकर्णीचा प्रेरणादायी खुलासा

Chinmayi More: ‘धाकट्या सुनबाई’ फेम चिन्मयी मोरेने उलगडला यशाचा प्रवास; आईविषयी बोलताना झाली भावुक
2

Chinmayi More: ‘धाकट्या सुनबाई’ फेम चिन्मयी मोरेने उलगडला यशाचा प्रवास; आईविषयी बोलताना झाली भावुक

Janhavi Killekar: जान्हवी किल्लेकरने जिंकली मनं! वाढदिवसाची पार्टी रद्द करून SMAग्रस्त चिमुकली गार्गीच्या उपचारांसाठी केली मदत
3

Janhavi Killekar: जान्हवी किल्लेकरने जिंकली मनं! वाढदिवसाची पार्टी रद्द करून SMAग्रस्त चिमुकली गार्गीच्या उपचारांसाठी केली मदत

Prapti Redkar: स्त्रीशक्ती म्हणजे नेमकं काय? प्राप्ती रेडकरने सांगितला स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा अर्थ
4

Prapti Redkar: स्त्रीशक्ती म्हणजे नेमकं काय? प्राप्ती रेडकरने सांगितला स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.