Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Saraf Birthday Special: अशोक सराफ यांचे ‘हे’ ५ TOP सुपरहिट कॉमेडी चित्रपट, जे पाहून तुम्ही आजही खळखळून हसाल

Ashok Saraf Birthday Special: मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्या टॉप ५ सुपरहिट कॉमेडी चित्रपटांची यादी जाणून घ्या. ‘अशी ही बनवा बनवी’, ‘नवरा माझा नवसाचा’ यांसारखे अजरामर सिनेमे आजही प्रेक्षकांचे फेव्हरेट आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 04, 2026 | 10:37 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांचे लाडके मामा अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस आहे यांनी आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मराठीसोबतच, दूरदर्शन मालिका तसेच हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजही त्यांचे चित्रपट प्रेक्षक मोठ्या आवडीने पाहतात.अशोक सराफ आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी मराठी सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कॉमेडी जोड्यांपैकी एक मानली जाते. या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले, जे आजही प्रेक्षकांना खळखळून हसवतात. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करत अभिनयाचा वेगळाच ठसा उमटवला आहे. विनोदी भूमिकांपासून ते गंभीर आणि खलनायकी पात्रांपर्यंत विविधांगी भूमिका त्यांनी समर्थपणे साकारल्याृ
आपण आज पाच मराठी कॉमेडी चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे पाहून तुम्ही खळखळून हसाल. हे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आवडीचे असून कौटुंबिक मनोरंजनासाठी उत्तम पर्याय मानले जातात.

१.आयत्या घरात घरोबा

आयत्या घरात घरोबा हा मराठी चित्रपट १९९१ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले आहे.या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, तसेच सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर आणि किशोरी शहाणे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.कौटुंबिक पार्श्वभूमी आणि विनोदी प्रसंगांनी भरलेली ही कथा प्रेक्षकांना खूपच आवडली होती. हलकाफुलका विनोद, नातेसंबंधांमधील गंमतीशीर घडामोडी आणि दमदार अभिनयामुळे हा चित्रपट आजही मराठी कॉमेडी क्लासिक म्हणून ओळखला जातो.

२.फेका फेकी

फेका फेकी हा १९८९ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील एक लोकप्रिय कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा मूलराज राजदा यांनी लिहिली असून, दिग्दर्शन बिपिन वरती यांनी केले आहे.या चित्रपटात अशोक सराफ, निवेदिता जोशी-सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सविता प्रभुणे, प्रतिभा गोरेगावकर, चेतन दळवी आणि अजय वाधवकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.हलकाफुलका विनोद, मजेशीर प्रसंग आणि दमदार अभिनयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. नंतर या चित्रपटाचा हिंदी रिमेक गोलमाल रिटर्न्स या नावाने करण्यात आला.

३. शेजारी शेजारी

शेजारी शेजारी हा १९९० मध्ये प्रदर्शित झालेला एक हलकाफुलका आणि मजेशीर मराठी कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिलीप कोल्हटकर यांनी केले असून, निर्माते सचिन पारेकर आणि संजय पारेकर आहेत.या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निशिगंधा वाड आणि वर्षा उसगावकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.हा चित्रपट अमेरिकन चित्रपट गुड नेबर सॅम वर आधारित आहे. पुढे २००५ मध्ये याचा हिंदी रिमेक सुख या नावाने तयार करण्यात आला.

४.अशी ही बनवा बनवी

अशी ही बनवा बनवी हा मराठी चित्रपट १९८८ मध्ये प्रदर्शित झालेला एक अजरामर कॉमेडी क्लासिक आहे. या चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शनही सचिन पिळगावकर यांनीच केले आहे.या चित्रपटाची कथा दोन भावांभोवती फिरते. त्यांना घरमालकाकडून रूम मिळवण्यासाठी विवाहित असल्याचे भासवावे लागते, कारण घरमालक फक्त विवाहित जोडप्यांनाच खोली देत असतो. त्यामुळे ते आपल्या मित्रांना ‘पत्नी’ म्हणून सादर करतात आणि तिथूनच सुरू होते गोंधळ, गमतीजमती आणि धमाल प्रसंगांची मालिका.

Ashok Saraf Birthday: वयात १८ वर्षांचं अंतर, लग्नाला विरोध अन् …, जाणून घ्या अशोक-निवेदिता सराफ यांच्या प्रेमकहाणीचा रंजक प्रवास

५.नवरा माझा नवसाचा

नवरा माझा नवसाचा हा २००४ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट असून तो मराठी सिनेसृष्टीतील एक कल्ट क्लासिक कॉमेडी म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले आहे.या चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.या चित्रपटाची कथा एका जोडप्याभोवती फिरते, जे आपला नवस पूर्ण करण्यासाठी मुंबई ते गणपतीपुळे असा प्रवास करतात. या प्रवासात त्यांना अनेक अडचणी, गमतीशीर प्रसंग आणि विनोदी घटना अनुभवायला मिळतात, ज्यामुळे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन होते.

मराठीतील पहिल्या सिनेमॅटिक युनिव्हर्सची सुरुवात! ‘घबाडकुंड’ घेऊन येतोय रहस्य आणि थराराचा अनोखा प्रवास

अशोक सराफ यांच्या या चित्रपटांनी मराठी कॉमेडीला एक वेगळी उंची दिली आहे. त्यांच्या सहजसुंदर अभिनयामुळे हे सिनेमे आजही तितकेच ताजेतवाने वाटतात आणि प्रेक्षकांना पुन्हा पुन्हा हसवतात.

Web Title: Ashok saraf birthday special top 5 superhit marathi comedy movies list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • ashok saraf
  • Birthday
  • marathi movie

संबंधित बातम्या

पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध घेणार “अडकित्ता”! मराठी झी ५ वर लवकरच होणार प्रदर्शित
1

पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध घेणार “अडकित्ता”! मराठी झी ५ वर लवकरच होणार प्रदर्शित

प्रायोगिक नाटकानंतर आता थेट मोठ्या पडद्यावर! ‘Pach Futacha Bachchan’चा टीझर लाँच;  चित्रपटात तगड्या कलाकारांची फौज
2

प्रायोगिक नाटकानंतर आता थेट मोठ्या पडद्यावर! ‘Pach Futacha Bachchan’चा टीझर लाँच; चित्रपटात तगड्या कलाकारांची फौज

Psycho Ranga Movie: रहस्य, थरार अन् दमदार कलाकारांचा मेळ; ‘सायको रंगा’चा थरार अनुभवायला सज्ज व्हा! ‘या’ दिवशी होणार रिलीज
3

Psycho Ranga Movie: रहस्य, थरार अन् दमदार कलाकारांचा मेळ; ‘सायको रंगा’चा थरार अनुभवायला सज्ज व्हा! ‘या’ दिवशी होणार रिलीज

Dwidha Movie Review: दोन पिढ्यांचं अंतर, वचनाची परीक्षा अन् भावनांचा गुंता; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’ चित्रपट कसा आहे?
4

Dwidha Movie Review: दोन पिढ्यांचं अंतर, वचनाची परीक्षा अन् भावनांचा गुंता; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’ चित्रपट कसा आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.