Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतुल कुलकर्णी भडकले! पोस्ट करत सरकारला लगावला टोला; Missing Link दरड कोसळीवर संताप, म्हणाले ‘ऱ्हास अटळ…’

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळून वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. या घटनेनंतर अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर सलग दोन पोस्ट शेअर करत शासनाच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्ष टीका केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 08, 2026 | 03:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • काही कलाकारांनी त्यांचा अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.
  • अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडिया पोस्ट करत शासनाला चांगलाच टोला लगावला आहे.
  • धनश्री काडगावकरने ही या पावसात घडलेल्या दुर्घटनेबद्दल तिचे मत व्यक्त केले आहे.
सध्या राज्यात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. पावसाने राज्यभरात थमासान घातले आहे. अशामध्ये सोमवारी मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक येथे दरड कोसळली त्यामुळे वाहतूक मार्गावर मोठा परिणाम झाला. अशामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या महामार्गावरील बोगद्या संदर्भात काही जुने महत्वाचे विधाने चर्चेत आले आहेत. पावसाच्या सुरुवातीलाच या नव्या मार्गावर दुर्घटना घडली त्यामुळे लोक अस्वस्थ आहेत. अशामध्ये मनोरंजनसृष्टीतून काही कलाकारांनी त्यांचा अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.

Marathi Serial: ‘मोहिनी’मध्ये मोठा ट्विस्ट! RK च्या आयुष्यात दीपाची एंट्री; सुपरस्टार जेलमध्ये जाणार?

अभिनेते अतुल कुलकर्णी नेहमीच सामाजिक मुद्द्यांवर त्यांचे परखड मत मांडताना दिसतात. अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडिया पोस्ट करत शासनाला चांगलाच टोला लगावला आहे. त्यांनी एक नाही तर या संदर्भात दोन पोस्ट केले आहेत. एका पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले आहे की, “‘बिनशर्त पाठिंबा’ हा लोकशाही मधला सगळ्यात धोकादायक प्रकार असतो. माझ्या कुठल्यातरी एका ‘अजेंडा’ ला पाठिंबा असणारं, तो राबवणारं सरकार आहे म्हणून त्या सरकारच्या बाकी सगळ्या चुकांना मी पाठीशी घालेन; हा विचार संपूर्ण समाजा बरोबर अंतिमतः स्वतःचा आणि मुख्य म्हणजे पुढच्या पिढ्यांचा घात करणारा असतो हे लक्षात घेतलं पाहिजे. सदसदविवेक बुद्धी प्रत्येकाला असतेच. ती गहाण टाकून सगळं ‘कोसळू’ द्यायचं का हा निर्णय मात्र ज्याचा त्याचा…”

तर पुढील पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले आहे की, “कुठल्याही शासन, प्रशासना मधे, ‘आमचं कधीही काहीही चुकतच नाही’ ही भावना कुठून येत असेल? श्रेष्ठत्वाच्या ह्या खात्रीचं मूळ कशात आहे? आपण नागरिक देखील आपापसात असेच वागू लागलो आहोत काय? तथाकथित ‘नं चुकणाऱ्या’ समूहांचं शिकणं बंद होत आणि ऱ्हास अटळ असतो.”

New Marathi Serial: तब्बल १८ वर्षांनंतर ‘हा’ मराठी अभिनेता छोट्या पडद्यावर; ‘इच्छाधारी नागीन’मध्ये साकारणार प्रमुख भूमिका

या दोन्ही पोस्टमुळे अतुल कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अतुल कुलकरणींसह धनश्री काडगावकरने ही या पावसात घडलेल्या दुर्घटनेबद्दल तिचे मत व्यक्त केले आहे. तिने सोशल मीडिया पोस्ट करत ती 9 तासांसाठी मुंबई-पुणे महामार्गावर अडकलेली असल्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली. तसेच सांगितले की मासिक पाळी असताना साधं वॉशरूमला जाणंही यात शक्य नव्हतं.

Web Title: Atul kulkarni criticized the government following the landslide incident in the missing link section of the mumbai pune expressway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Chief Minister Devendra Fadnavis
  • Marathi celebrities

संबंधित बातम्या

China Landslide : चीनमध्ये मोठी दुर्घटना! गान्सू प्रांतात भूस्खलन; २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू
1

China Landslide : चीनमध्ये मोठी दुर्घटना! गान्सू प्रांतात भूस्खलन; २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Konkan Rain : रत्नागिरीत दरड दुर्घटनांची मालिका सुरूच; दहिवलीत चार घरे ढिगाऱ्याखाली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू
2

Konkan Rain : रत्नागिरीत दरड दुर्घटनांची मालिका सुरूच; दहिवलीत चार घरे ढिगाऱ्याखाली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

पठ्ठयाने Zee Marathi च्या मालिकेवरून नाव ठेवलं लेकीचं! निर्माती शर्मिष्ठा राऊत झाली खुश, म्हणाली ‘निर्माती म्हणून…’
3

पठ्ठयाने Zee Marathi च्या मालिकेवरून नाव ठेवलं लेकीचं! निर्माती शर्मिष्ठा राऊत झाली खुश, म्हणाली ‘निर्माती म्हणून…’

‘बेबी लेट्स डान्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘मी होणार सुपरस्टार’ फेम अपेक्षा लोंढेचा दमदार डान्स अवतार
4

‘बेबी लेट्स डान्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘मी होणार सुपरस्टार’ फेम अपेक्षा लोंढेचा दमदार डान्स अवतार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.