
Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा...’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
अवधूत गुप्ते हा नेहमीच त्याच्या हटके गाण्यांसाठी ओळखला जातो. त्याने विद्यानंद बापट यांना सपोर्ट करण्यासाठी हे गाणं तयार केलं. या गाण्याचे संगीत, गायन हे सर्व त्याने स्वत:ताच केले असून नुकताच एक व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर टाकला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. व्हिडिओच्या खाली लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. Avadhoot Gupte:
अवधूतने गाण्यात म्हटलंय,”तुझ्या सारख्या सरळ माणसाचा ना हा धंदा
विद्यानंदा ओळख इथल्या आनंदी आनंदा”पुढे तो म्हणतो,स्वच्छ विचार अन्
स्वच्छ वाणीवर
हसणाऱ्या माकडांचामंगला असला
पवित्र असला
तरीही देश हा दगडांचाया गाण्यातून त्याने विद्यानंद बापट यांची जी स्वच्छ विचारसरणी आहे, त्यावर काही लोक कसे हसतात, यावर भाष्य केलं आहे. सरळ माणसाला या जगात कसं जगणं कठीण आहे, हेच त्याला सांगायचं आहे.
अवधूतने व्हिडिओ शेअर करताना खाली कॅप्शनमध्ये पण गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि #supportbapat, #vidyanandbapatsupport, #hats_off_bapat असे हॅशटॅग वापरले आहेत. त्यामुळे हे स्पष्ट होतंय की अवधूत पूर्णपणे विद्यानंद बापट यांच्या पाठीशी उभा आहे.डीजे बंदीची मागणी केल्यामुळे विद्यानंद बापट यांना खूप त्रास सहन करावा लागला. पण आता अवधूत गुप्ते सारखा मोठा कलाकार त्यांच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे त्यांना मोठं बळ मिळालं आहे. पुण्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात आता या गाण्याचीच चर्चा सुरू आहे.
मराठी संगीतविश्वातील लोकप्रिय गायक, संगीतकार आणि परीक्षक अवधूत गुप्ते पुन्हा एकदा ‘सारेगमप’च्या मंचावर परीक्षकाच्या भूमिकेत परतले आहेत. अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या ‘सारेगमप’च्या या नव्या पर्वात नव्या पिढीचे नवे आवाज, त्यांची संगीताकडे पाहण्याची बदललेली दृष्टी आणि सोशल मीडियामुळे बदललेलं संगीतविश्व पाहायला मिळणार आहे.
‘सारेगमप’मध्ये खूप काही नवीन आणि खास पाहायला मिळणार आहे. नवीन टॅलेंट, नवीन चेहरे, नवीन आवाज आणि नावीन्य असलेली नवी पिढीच पाहायला मिळेल, असं म्हणायला हरकत नाही. आताची पिढी खूप स्मार्ट आहे. त्यांचं जीवनमान त्यांच्या पद्धतीने बदललं आहे. ही पिढी खूप फास्ट आहे. नव्या पिढीचं संगीत आत्मसात करण्याचं माध्यम, संगीत उपभोगण्याचं माध्यमही बदललं आहे. आता सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमधून नव्या पिढीला गाणी मिळत असतात आणि ती त्यांना आकर्षित करत असतात. अशा पिढीचं गाणं आपण यावेळेस ‘सारेगमप’ मध्ये ऐकणार आहोत.