
Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
OTT Release: नेहमीच्या हॉरर चित्रपटांपेक्षा वेगळ्या कथेचा आणि साहसाचा अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा कारण “भूतम् भयम्’चा प्रीमियर 25 सप्टेंबर 2026 रोजी केवळ मराठी झी5वर होणार आहे. या चित्रपटातून रामचंद्र गावकर दिग्दर्शनात पदार्पण केलं असून भय, विनोद, रहस्य आणि साहस यांचा अनोखा मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. कोणतीही वस्तू सोन्यात बदलण्याची शक्ती असलेले एक प्राचीन नाणे या हटके कल्पनेभोवती चित्रपटाची कथा फिरते. Bhootam Bhayyam OTT:
झी स्टुडिओज मराठी प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेल्या ‘भूतम् भयम्’मध्ये छाया कदम, पुष्कराज चिरपुटकर, करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे आणि शुभम जाधव यांच्यासह नव्या पिढीतील अनेक गुणी कलाकारांच्या भूमिका आहेत.
सात बेरोजगार मित्रांना एक रहस्यमय नाणे सापडते आणि झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणून ते या नाण्याकडे पाहू लागतात. मात्र, त्यातूनच ते ‘राणीवाडा’ या ओसाड हवेलीच्या भयावह आणि गूढ जगात ओढले जातात. या हवेलीत अनेक शतकांपूर्वीचा शाप दडलेला असतो. भयावह प्रसंग आणि विक्षिप्तपणातून निर्माण होणारा विनोद यांचा समतोल साधत ‘भूतम् भयम्’मधून हॉरर-कॉमेडीला वेगळे स्वरूप देण्यात आले आहे.
अलौकिक घटनांमधील रहस्याला विनोद, साहस आणि उत्कंठेची जोड देतानाच मैत्री, लोभ, जगण्यासाठीची धडपड आणि सहज मिळणाऱ्या संपत्तीचे आकर्षण यांचाही वेध चित्रपटातून घेण्यात आला आहे. हटके मध्यवर्ती कल्पना, विविध व्यक्तिरेखांची धमाल टीम आणि पुढे काय घडणार याचा अंदाज बांधता न येणारी कथा यांच्या माध्यमातून नेहमीच्या वाटेने न जाणारा अलौकिक मनोरंजनाचा अनुभव या चित्रपटातून मिळणार आहे. भयासोबतच प्रेक्षकांना भरपूर हसवणारे प्रसंगही यात पाहायला मिळणार आहेत.
सात बेरोजगार मित्रांना एक प्राचीन आणि रहस्यमय नाणे सापडते. कोणतीही वस्तू सोन्यात बदलण्याची शक्ती या नाण्यात असल्याचे मानले जाते आणि इथूनच त्यांचा अनपेक्षित साहसी प्रवास सुरू होतो. श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी हे मित्र ‘राणीवाडा’ नावाच्या एका ओसाड हवेलीत जातात. मात्र, त्या हवेलीच्या भिंतींआड दडलेल्या गडद रहस्यांची त्यांना कल्पनाही नसते.
संपत्तीची लालसा वाढत असतानाच या नाण्यासोबत शतकानुशतके जुना शापही जोडलेला असल्याचे त्यांच्या लक्षात येते. त्यांचा मित्र गजा अचानक रहस्यमयरीत्या बेपत्ता होतो आणि परिस्थिती आणखी भयावह वळण घेते. त्यानंतर या मित्रांना आपल्या भोवती असलेल्या अलौकिक शक्तींचा सामना करावा लागतो. भयावह प्रसंग, विनोदातून निर्माण होणारा गोंधळ आणि अनपेक्षित वळणांनी भरलेल्या ‘भूतम् भयम्’मध्ये मैत्री, लोभ आणि जगण्यासाठीची धडपड यांची कथा भय आणि विनोदाची सांगड घालत मांडण्यात आली आहे.
दिग्दर्शक रामचंद्र गावकर म्हणाले चित्रपटाचा प्रवास माझ्यासाठी खूप खास आहे. विशेषतः दिग्दर्शक म्हणून हा माझा पहिलाच पूर्ण लांबीचा चित्रपट असल्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वेगळे आहे. भय, विनोद आणि साहस यांची सांगड घालत प्रेक्षकांचे मनापासून मनोरंजन करणारी कथा मला तयार करायची होती.
सात मित्रांना त्यांचे आयुष्य बदलून टाकू शकणारी एक वस्तू अचानक सापडते आणि नंतर त्यासोबत एक धोकादायक शापही जोडलेला असल्याचे त्यांना समजते. या कल्पनेमुळे आम्हाला विनोदासोबतच उत्कंठाही निर्माण करण्यासाठी भरपूर वाव मिळाला. मराठी झी5वर ही वेगळी कथा प्रेक्षकांना अनुभवता येणार असल्यामुळे मी खूप उत्सुक आहे”
छाया कदम म्हणाल्या “भूतम् भयम्’मध्ये काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता. या चित्रपटात भय आणि विनोद यांचा अनोखा मिलाफ आहे. टीमने उभे केलेले या कथेचे विश्व गूढ वाटते आणि त्याच वेळी मनोरंजकही आहे. काही प्रसंग तुम्हाला हसवतील, तर काही प्रसंगांमध्ये पुढे काय होणार याची उत्सुकता कायम राहील. ही कथा प्रेक्षकांसमोर येण्यासाठी मी उत्सुक आहे. ‘भूतम् भयम्’ हा एक खास अनुभव करणारी धमाल गोंधळ, रहस्य आणि अलौकिक घटनांचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घ्यावा, असे मला वाटते.”
‘भूतम् भयम्’ 25 सप्टेंबर 2026पासून केवळ मराठी झी5वर बघायला विसरू नका !