( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Zee 5 Multilingual Slate: भारतातील आघाडीचे स्वदेशी व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Zee 5 ने हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बांग्ला या सात भाषांमध्ये आपली आतापर्यंतची सर्वात व्यापक बहुभाषिक कंटेंट स्लेट जाहीर केली आहे. या नव्या लाइनअपमध्ये चित्रपट, वेब सीरिज, लाईव्ह स्पोर्ट्स, एआय-आधारित स्टोरीटेलिंग, अॅनिमेशन आणि मुलांसाठीच्या कार्यक्रमांचा समावेश असून, विविध भाषांतील प्रेक्षकांना एकाच व्यासपीठावर दर्जेदार मनोरंजन उपलब्ध करून देण्याचा Zee 5 चा प्रयत्न आहे.
या नव्या स्लेटसाठी Zee 5 ने देशातील अनेक नामांकित प्रॉडक्शन हाऊसेस आणि दिग्दर्शकांसोबत भागीदारी केली आहे. हिंदीमध्ये जिओ स्टुडिओज, मॅडॉक फिल्म्स, टिप्स फिल्म्स, पेन स्टुडिओज यांसारख्या बड्या बॅनर्सची साथ मिळाली असून, मराठीमध्ये बहावा एंटरटेनमेंट, प्रतिसाद प्रॉडक्शन्स आणि कायरा कुमार क्रिएशन्स यांच्यासोबत सहकार्य करण्यात आले आहे.
हिंदी कंटेंटमध्ये ‘कांबळी’, ‘द स्कॅम: लीक्ड’, ‘कॉफी किंग’, ‘जीना इसी का नाम है 2.0’, ‘झी हॉरर शो’ यांसारख्या नव्या ओरिजिनल्सची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ‘रंगबाज सीझन 4’, ‘जनावर 2’ आणि ‘बकैती सीझन 2’ या लोकप्रिय फ्रँचायझी नव्या सीझनसह परतणार आहेत.
मराठी प्रेक्षकांसाठी Zee 5 ने खास सरप्राइज दिले आहे. ‘हे काय नवीन?’ या लोकप्रिय मालिकेचा नवा सीझन, ‘अगं आई, आहो आई’ ही नवी ओरिजिनल सीरिज आणि ‘तुंबाडची मंजुळा’ व ‘भूतम भयम्’ हे चित्रपट प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत.
याशिवाय, Zee 5 ने लाईव्ह स्पोर्ट्समध्येही आपला विस्तार कायम ठेवत FIFA®, Bundesliga, ILT Season 5 आणि तमिळनाडू कबड्डी यांसारख्या स्पर्धांचा समावेश केला आहे. मुलांसाठी ‘शिवलोक के कुंडक्का मंडक्का’, ‘स्मार्ट किड्स’, ‘टेल्स ऑफ कृष्णा’ आणि ‘बँडबुध और बुडबक 2.0’ यांसारख्या कार्यक्रमांचीही घोषणा करण्यात आली आहे.
या निमित्ताने Zee 5 चे बिझनेस हेड तेजकरण सिंग बजाज यांनी सांगितले की, ही स्लेट केवळ नवीन टायटल्सची घोषणा नसून भारतातील प्रेक्षकांसाठी अधिक समृद्ध, वैयक्तिकृत आणि भविष्यकालीन मनोरंजन अनुभव देण्याच्या Zee 5 च्या दीर्घकालीन धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे.
तर Zee 5 चे चीफ कंटेंट ऑफिसर राघवेंद्र हुन्सूर यांनी सांगितले की, प्रत्येक भाषेतील स्थानिक संस्कृती आणि प्रेक्षकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन या कथा निवडण्यात आल्या आहेत. भारतासह जागतिक स्तरावरील प्रेक्षकांना जोडणाऱ्या दर्जेदार कथा सादर करण्यावर कंपनीचा भर राहणार आहे.
सात भाषांमधील मोठ्या भागीदारी, लोकप्रिय फ्रँचायझी, नवे ओरिजिनल्स आणि विविध प्रकारच्या कंटेंटसह Zee 5 ने भारतीय ओटीटी क्षेत्रात आपली पकड आणखी मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
इंटिमेट होतानाही करायचा मारहाण! अभिनेत्रीचा आमिर खानच्या भावावर गंभीर आरोप, म्हणाली, ‘पळून जाऊन..’






