Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 20: ‘बिग बॉस 20’चा बिगुल वाजलं! मेकर्सने शेअर केला खास व्हिडीओ, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Bigg Boss 20 Announced: 'बिग बॉस 20'चा ट्रेलर रिलीज झाला असून जिओ हॉटस्टारने नव्या सीझनची अधिकृत घोषणा केली आहे. सलमान खान हिंदी आवृत्तीचे सूत्रसंचालन करणार असून यंदा बिग बॉस 6 भाषांमध्ये एकाचवेळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 22, 2026 | 08:36 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Bigg Boss 20 Announced: ‘बिग बॉस’च्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 20’ची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, मेकर्सनी नव्या पर्वाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच चाहत्यांमध्ये नव्या सीझनबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस 20’बाबत विविध चर्चा सुरू होत्या. अखेर जिओ हॉटस्टारने सोशल मीडियावर शोचा अधिकृत लोगो आणि टीझर व्हिडिओ शेअर करत नव्या पर्वाची घोषणा केली. मात्र, शोच्या प्रीमियरची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

जिओ हॉटस्टारने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ‘बिग बॉस 20’चा नवा लोगो पाहायला मिळतो. यावेळी लोगोतील डोळ्याला आकर्षक आणि वेगळ्या रंगसंगतीची डिझाइन देण्यात आली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, “दोन दशकांनंतरही… तो अजूनही सर्वात आकर्षक आहे. बिग बॉस 20 लवकरच येत आहे,” असे लिहिण्यात आले आहे. लोगोच्या नव्या डिझाइनचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

ट्रेलर समोर आल्यानंतर चाहत्यांनीही उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. “लवकर सुरू करा,” “आता वाट पाहवत नाही,” “बिग बॉस 20 सुरू होणार यावर विश्वास बसत नाही,” अशा कमेंट्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. अनेक चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या कलाकारांना स्पर्धक म्हणून सहभागी करण्याचीही मागणी केली आहे.

Hindustani Bhau : लाठीचार्जच्या मुद्द्यावरून हिंदुस्थानी भाऊने सरकारला केली विनंती! “विद्यार्थ्यांवर हात उचलू….”

यंदा ‘बिग बॉस’चा इतिहास घडवणारा मोठा बदल पाहायला मिळणार आहे. 2026 मध्ये हा शो एकाच वेळी सहा भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि बंगाली अशा सहा आवृत्त्या एकाचवेळी प्रसारित केल्या जाणार आहेत.

 

सूत्रसंचालकांच्या बाबतीतही यंदा तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. हिंदी आवृत्तीचे सूत्रसंचालन सलमान खान, मल्याळमचे मोहनलाल, कन्नडचे किच्चा सुदीप, तेलगूचे नागार्जुन, तमिळचे विजय सेतुपती, तर बंगाली आवृत्तीचे सूत्रसंचालन माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली करणार आहेत. विशेष म्हणजे, सौरव गांगुली पहिल्यांदाच ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत.

दरम्यान, आता चाहत्यांचे लक्ष शोच्या प्रीमियरच्या तारखेवर आणि स्पर्धकांच्या अधिकृत यादीकडे लागले आहे. लवकरच यासंदर्भातील मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

‘Bigg Boss’चा इतिहासातील सर्वात मोठा सीझन! हिंदीसह ६ भाषांमध्ये एकाचवेळी नवे पर्व; सौरव गांगुलींची दमदार एन्ट्री

Web Title: Bigg boss 20 announced makers drop a special promo video fans excitement reaches new heights

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 08:36 AM

Topics:  

  • Bigg Boss
  • Entertainemnt News
  • Salman Khan

संबंधित बातम्या

‘सन मराठी’चा अनोखा पुढाकार, ‘इच्छा कलश’मधून विठुरायाच्या चरणी पोहोचणार भक्तांच्या मनोकामना
1

‘सन मराठी’चा अनोखा पुढाकार, ‘इच्छा कलश’मधून विठुरायाच्या चरणी पोहोचणार भक्तांच्या मनोकामना

Marathi Serial: ‘सावळ्याची जणू सावली’ टीम पंढरपुरात; ‘स्वर पंढरी’च्या माध्यमातून साजरा केला यशाचा खास सोहळा
2

Marathi Serial: ‘सावळ्याची जणू सावली’ टीम पंढरपुरात; ‘स्वर पंढरी’च्या माध्यमातून साजरा केला यशाचा खास सोहळा

3 Idiots: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘3 इडियट्स’ची पुन्हा थिएटरमध्ये एन्ट्री; जाणून घ्या रिलीज डेट
3

3 Idiots: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘3 इडियट्स’ची पुन्हा थिएटरमध्ये एन्ट्री; जाणून घ्या रिलीज डेट

मराठी अभिनेत्याच्या घरी आली नवकोरी मर्सिडीज GLE AMG Coupé; किंमत ऐकून व्हाल थक्क
4

मराठी अभिनेत्याच्या घरी आली नवकोरी मर्सिडीज GLE AMG Coupé; किंमत ऐकून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.