Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड

Iravati Marathi Movie : नाती जोडणे, ती मनापासून जपणे आणि माणसांमधील भावबंधांचा शोध घेणारा 'इरावती' हा नवीन मराठी चित्रपट येत्या १२ फेब्रुवारी २०२७ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 13, 2026 | 06:52 PM
'इरावती' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर ( सौजन्य - सोशल मीडिया )

'इरावती' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • अलका कुबल, सुनील बर्वे अन् संतोष जुवेकर!
  • ‘इरावती’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
  • ‘या’ दिवशी होणार रिलीज
Iravati Marathi Movie : नाती जोडली जाणं आणि ती मनापासून जपणं, ही आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. जन्माला आल्यापासूनच आपण काही नात्यांच्या बंधनात गुंफले जातो, तर काही नाती आयुष्याच्या प्रवासात नकळत जुळत जातात. काही नाती रक्ताची असतात, तर काही माया, प्रेम, आपुलकी आणि विश्वासाच्या धाग्यांनी विणलेली असतात. अशाच जिव्हाळ्याच्या नात्यांची, आपुलकीची आणित्यासोबत रहस्याची जोड असणारी गोष्ट सांगणारा ‘इरावती’ हा मराठी चित्रपट नव्या वर्षात, १२ फेब्रुवारी २०२७ ला आपल्या भेटीस येणार आहे. चिन्मय प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन निलेश देशपांडे यांनी केले असून निर्मिती डॉ. दिनेश वैद्य यांची आहे. ( Iravati Marathi Movie ) 

Sumo Didi Trailer Released: रूढींच्या आखाड्यात जिद्दीची कुस्ती! ‘सुमो दीदी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

चित्रपटात सतीश पुळेकर, अलका कुबल-आठल्ये, विजय गोखले, सुनील बर्वे, संतोष जुवेकर, जुई भागवत, स्वरदा करंदीकर, मृणालिनी जांभळे आणि अवंती सानप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुभवी कलाकारांची दमदार फळी आणि नात्यांमधील भावविश्व उलगडणारी कथा यांमुळे ‘इरावती’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

माणसांमधील नात्यांचा आणि भावबंधांचा शोध

निर्माते डॉ. दिनेश वैद्य म्हणाले, ‘इरावती’ ही केवळ एक चित्रपटाची कथा नसून, माणसांमधील नात्यांचा आणि भावबंधांचा शोध घेणारा अनुभव आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात नाती जपणं, त्यांना समजून घेणं आणि त्यांचं महत्त्व जाणणं अधिक गरजेचं झालं आहे. प्रेक्षकांना आपल्या आयुष्याशी जोडणारा, मनाला स्पर्श करणारा आणि चित्रपट संपल्यानंतरही विचार करायला लावणारा आशय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘इरावती’ प्रेक्षकांच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण करेल, अशी आशा आहे.”

प्रत्येक नात्याला स्वतःची एक गोष्ट

चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक निलेश देशपांडे म्हणाले, “प्रत्येक नात्याला स्वतःची एक गोष्ट असते. या नात्यांमधील भावभावना, त्यात दडलेली ओढ आणि माणसांना एकमेकांशी जोडणारे अदृश्य धागे यांचा वेध ‘इरावती’मधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही कथा प्रेक्षकांना केवळ भावनिक अनुभव देणार नाही, तर आपल्या आयुष्यातील नात्यांकडे नव्याने पाहण्याची जाणीवही करून देईल, असा मला विश्वास आहे.”

जबाबदाऱ्या यांच्या यांच्या खांद्यावर

‘इरावती’ चित्रपटाची कथा डॅा. दिनेश वैद्य यांची असून पटकथा नंदू परदेशी यांनी लिहिली असून, संवादलेखनाची जबाबदारी डॉ. दिनेश वैद्य आणि नंदू परदेशी यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे छायाचित्रण अनिकेत के यांनी केले असून, संकलन सुबोध नारकर यांनी केले आहे. पायलट साऊंडची जबाबदारी राशी बुट्टे यांनी सांभाळली आहे. कला दिग्दर्शन महेंद्र राऊत यांचे असून, कार्यकारी निर्माता म्हणून संभाजी जायेभाये यांनी काम पाहिले आहे. संगीतदिग्दर्शन कमलेश भडकमकर यांचे आहे. मिक्सिंग इंजिनिअर म्हणून अभिजीत श्रीराम देव यांनी काम पाहिले आहे. वेशभूषा ममता मंडल आणि विदुला तामोरे यांनी केली असून, रंगभूषेची जबाबदारी सुदर्शन कुलाबकर यांनी, तर केशभूषेची जबाबदारी जयश्री नाईक यांनी सांभाळली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचं दमदार मनोरंजन करेल अशी अपेक्षा आहे.

Entrepreneur Ajay Bijli : कॉर्पोरेट विश्वातील बड्या उद्योजकाची आता संगीतात धडक! अजय बिजलींचा ‘हे मां’ भक्ती अल्बम लाँच

Web Title: Iravati marathi movie release date announced starring alka kubal sunil barve ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • marathi movie

संबंधित बातम्या

Patri Sarkar 1942: साताऱ्याच्या मातीत पेटलेला स्वातंत्र्यलढा आता रुपेरी पडद्यावर! ‘पत्री सरकार १९४२’चा दमदार पोस्टर लाँच
1

Patri Sarkar 1942: साताऱ्याच्या मातीत पेटलेला स्वातंत्र्यलढा आता रुपेरी पडद्यावर! ‘पत्री सरकार १९४२’चा दमदार पोस्टर लाँच

Columbus Marathi Movie: सुशिक्षित बेरोजगाराच्या आयुष्यात अमेरिकेची संधी! ‘कोलंबस’ची रंजक गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर
2

Columbus Marathi Movie: सुशिक्षित बेरोजगाराच्या आयुष्यात अमेरिकेची संधी! ‘कोलंबस’ची रंजक गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर

Marathi Movie: प्रेम, लग्न आणि नात्यांमधील ट्विस्ट! पूजा सावंत-अभिजीत खांडकेकरच्या ‘लग्न आणि बरंच काही’चा ट्रेलर प्रदर्शित
3

Marathi Movie: प्रेम, लग्न आणि नात्यांमधील ट्विस्ट! पूजा सावंत-अभिजीत खांडकेकरच्या ‘लग्न आणि बरंच काही’चा ट्रेलर प्रदर्शित

New Marathi Movie: ‘दाणोलीश्वर’मधून उलगडणार सद्गुरू श्री साटम महाराजांचा आध्यात्मिक प्रवास; चित्रपटाची घोषणा
4

New Marathi Movie: ‘दाणोलीश्वर’मधून उलगडणार सद्गुरू श्री साटम महाराजांचा आध्यात्मिक प्रवास; चित्रपटाची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.