Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Drishyam 3: विजय साळगावकरची कथा इथेच संपणार? ‘दृश्यम 4’बाबत दिग्दर्शकांनी केला मोठा खुलासा

Drishyam 3:अजय देवगणच्या ‘दृश्यम’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असून त्यांनंतर ‘दृश्यम 3’नंतर चौथा भाग येणार का असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. यावर दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 23, 2026 | 10:50 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Drishyam 3: अजय देवगणच्या ‘दृश्यम’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘Drishyam: The Conclusion’ हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘दृश्यम’ फ्रँचायझीतील हा तिसरा आणि अंतिम भाग असल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे.

‘दृश्यम’चा पहिला भाग २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता, तर ‘दृश्यम २’ २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे. ९ सप्टेंबरला चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘दृश्यम ४’ येणार का?

‘Drishyam: The Conclusion’ या नावामुळेच हा चित्रपट विजय साळगावकरच्या कथेचा शेवट असल्याचं संकेत मिळतात. मात्र, ‘दृश्यम ३’नंतर चौथा भाग येणार का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.

दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत याबाबत स्पष्ट उत्तर दिलं आहे. हिंदी ‘दृश्यम ४’ बनण्याची शक्यता काय, असं विचारण्यात आलं असता त्यांनी थेट “Zero” असं उत्तर दिलं. त्यांनी पुढे आपण ‘दृश्यम ४’ लिहिणार नसल्याचंही स्पष्ट केलं.

‘दृश्यम ३’च असेल कथेचा शेवट

अभिषेक पाठक यांच्या मते, ‘Drishyam: The Conclusion’ हा विजय साळगावकरच्या कथेचा योग्य शेवट आहे. या चित्रपटासाठी त्यांनी आणि टीमने खूप मेहनत घेतली असून केवळ पैशांसाठी पुढचा भाग बनवण्याचा त्यांचा हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं.

त्यामुळे सध्या तरी अजय देवगणच्या हिंदी ‘दृश्यम’ फ्रँचायझीचा प्रवास तिसऱ्या भागासोबतच संपणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Abhay Jodhpurkar: ‘अवतरली… लाडाची… नवसाची गौराई…!’ सिंगर अभय जोधपूरकरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

मोहनलालच्या ‘दृश्यम ३’पेक्षा वेगळी कथा

विशेष म्हणजे, अजय देवगणचा ‘Drishyam: The Conclusion’ हा मोहनलालच्या मल्याळम ‘Drishyam 3’चा थेट रिमेक नाही. अभिषेक पाठक यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदी चित्रपटाची कथा वेगळी आणि स्वतंत्र आहे.

चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू, श्रिया सरन, राजत कपूर, इशिता दत्ता आणि मृणाल जाधव पुन्हा दिसणार आहेत. जयदीप अहलावत, प्रकाश राज आणि सौरभ शुक्ला हे कलाकार नव्या भूमिकांमध्ये दिसतील.

आता विजय साळगावकर या सगळ्या संकटातून आपल्या कुटुंबाला कसं वाचवणार आणि त्याच्या कथेचा शेवट नेमका कसा होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

‘Pehla Pyaar Dusse Baar’ Trailer Release: जुनं प्रेम, नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर रिलीज; ‘या’ तारखेला सिनेमागृहात

Web Title: Drishyam 3 director abhishek pathak on ajay devgn movie drishyam 4

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • Ajay Devgn
  • bollywood Flim
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Afratafri Marathi Movie Trailer: एक कोटींच्या हव्यासापायी तीन भाऊ भिडले; ‘अफरातफरी’चा भन्नाट ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी होणार रिलीज
1

Afratafri Marathi Movie Trailer: एक कोटींच्या हव्यासापायी तीन भाऊ भिडले; ‘अफरातफरी’चा भन्नाट ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी होणार रिलीज

Yami Gautam: यामी गौतमच्या शिरपेचात मानाचा तुरा; पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळताच पती आदित्य धर भावूक
2

Yami Gautam: यामी गौतमच्या शिरपेचात मानाचा तुरा; पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळताच पती आदित्य धर भावूक

Abhay Jodhpurkar: ‘अवतरली… लाडाची… नवसाची गौराई…!’ सिंगर अभय जोधपूरकरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
3

Abhay Jodhpurkar: ‘अवतरली… लाडाची… नवसाची गौराई…!’ सिंगर अभय जोधपूरकरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी
4

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.