Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Drishyam 3: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’मध्ये ‘या’ मराठी अभिनेत्रीची पुन्हा Entry; पोस्टमधून व्यक्त केला आनंद

Drishyam 3: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’मध्ये मराठी अभिनेत्री नेहा जोशी पुन्हा एकदा झळकली आहे. ‘दृश्यम 2’नंतर तिने तिसऱ्या भागातही असिस्टंट सब इन्स्पेक्टर जेनी थॉमस ही भूमिका साकारली आहे. नेहाने पोलीस गणवेशातील काही बिहाइंड द सीन फोटो शेअर करत दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव सुंदर असल्याचे म्हटले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 04, 2026 | 03:43 PM
Drishyam 3: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Drishyam 3: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नेहा जोशीची पुन्हा एन्ट्री
  • जेनी थॉमसची भूमिका
  • चाहत्यांकडून कौतुक
सध्या सगळीकडे एकाच सिनेमाची चर्चा आहे आणि तो म्हणजे ‘दृश्यम 3’. अजय देवगणचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. सिनेमाचा सस्पेन्स, त्याची स्टोरी सगळ्यांनाच आवडतेय. पण या सगळ्यात एका मराठी चेहऱ्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि ती म्हणजे आपली अभिनेत्री नेहा जोशी. नेहा जोशी ‘दृश्यम 3’ मध्ये दिसली आहे. तिने याआधी ‘दृश्यम 2’ मध्ये पण काम केलं होतं आणि आता तिसऱ्या भागात पण तिची भूमिका आहे. Drishyam 3:

काय आहे नेहाची भूमिका?

नेहा जोशीने या सिनेमात ‘असिस्टंट सब इन्स्पेक्टर जेनी थॉमस’ नावाच्या पोलीस ऑफिसरची भूमिका केली आहे. तिने नुकतेच आपले काही बिहाइंड द सीन फोटो शेअर केले आहेत. पोलीस गणवेशात ती एकदम कडक दिसतेय.

फोटो शेअर करत तिने लिहिलंय, “असिस्टंट सब इन्स्पेक्टर जेनी थॉमस रिपोर्टिंग… ‘दृश्यम 3’ मध्ये पुन्हा एकदा या दिग्गज कलाकारांसोबत काम करताना शिकण्याचा एक अतिशय सुंदर अनुभव मिळाला!”तिची ही पोस्ट पाहून सगळ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी

‘दृश्यम’ सारख्या मोठ्या सिनेमात काम करणं ही काही छोटी गोष्ट नाही. या सिनेमात अजय देवगण, तब्बू, प्रकाश राज, जयदीप अहलावत सारखे मोठे कलाकार आहेत. नेहाला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. तिने सांगितलं की या सगळ्यांकडून खूप काही शिकायला मिळालं. नेहा जोशीला मराठी प्रेक्षक चांगलंच ओळखतात. तिने अनेक मराठी सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. तिचा अभिनय नेहमीच नैसर्गिक असतो.

‘दृश्यम 2’ मधला तिचा रोल आठवतोय का?

जर तुम्ही ‘दृश्यम 2’ पाहिला असेल तर तुम्हाला नेहा आठवत असेल. त्या सिनेमात ती विजय साळगावकर म्हणजे अजय देवगणच्या घराच्या शेजारी राहायला येते. ती आणि आणखी एक पोलीस ऑफिसर सामान्य माणसासारखे राहतात पण खरं तर ते पोलीस असतात. ते विजयच्या कुटुंबावर लक्ष ठेवत असतात, त्यांचं बोलणं रेकॉर्ड करतात. तिचा रोल छोटा होता पण खूप महत्वाचा होता.

Drishyam 3 Review: पोलिसांनी पुन्हा रचलं जाळं, पुराव्यांमध्ये अडकला विजय

आता ‘दृश्यम 3’ मध्ये पण त्याच भूमिकेचा पुढचा भाग दाखवला आहे. यावेळी तिचा रोल कॅमिओसारखा आहे, म्हणजे थोड्या वेळासाठीच ती दिसते, पण ती दिसली तरी प्रेक्षक तिला लगेच ओळखतात.

चाहत्यांच्या भारी कमेंट्स

नेहाने फोटो टाकल्यानंतर तिच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. मराठी अभिनेत्री अनिता दातेने पण तिला कमेंट करून अभिनंदन केलं आहे.

Drishyam 3: रिलीजआधीच ‘दृश्यम 3’चा बॉक्स ऑफिसवर धमाका! अॅडव्हान्स …

एका चाहत्याने लिहिलंय, “जेव्हा प्रकाश राज तुम्हाला चंगू मंगू म्हणतात तेव्हा अख्खं थिएटर हसतं”. तर दुसऱ्याने लिहिलंय, “रोल छोटा होता पण नक्कीच तुला खूप शिकायला मिळालं असेल”. अनेकांनी “मस्त काम केलंस नेहा” असं म्हणत तिचं कौतुक केलंय.खरं तर छोटा रोल असला तरी मोठ्या बॅनरच्या सिनेमात काम करणं हे प्रत्येक कलाकारासाठी मोठं असतं. नेहा जोशीने पण या संधीचं सोनं केलं आहे.’दृश्यम 3′ अजूनही थिएटरमध्ये चालू आहे.

Web Title: Drishyam 3 neha joshi jenny thomas role drishyam 2 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • Ajay Devgan
  • Entertainement News
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Arun Govil Ramayana:  प्रभू रामानंतर आता राजा दशरथ! अरुण गोविल यांचा ‘रामायण’मधील नवा लूक समोर
1

Arun Govil Ramayana: प्रभू रामानंतर आता राजा दशरथ! अरुण गोविल यांचा ‘रामायण’मधील नवा लूक समोर

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट
2

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट

Jailer 2 Trailer: मुथुवेल पांडियन परतला! रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’चा ट्रेलर रिलीज, नव्या मिशनसाठी सज्ज सुपरस्टार
3

Jailer 2 Trailer: मुथुवेल पांडियन परतला! रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’चा ट्रेलर रिलीज, नव्या मिशनसाठी सज्ज सुपरस्टार

Ishqa Ishqa Trailer:  प्रेम की झपाटलेपण की काळोखी दुनिया! ‘इश्का इश्का’चा थरारक ट्रेलर रिलीज
4

Ishqa Ishqa Trailer: प्रेम की झपाटलेपण की काळोखी दुनिया! ‘इश्का इश्का’चा थरारक ट्रेलर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.