Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MTDC Guhagar Film City : कोकणात तयार होणार नवी ‘फिल्म सिटी’! गुहागरच्या पालशेतमध्ये प्रकल्प उभारणार; आशिष शेलार यांचे निर्देश

MTDC Guhagar Film City : कोकणातील पर्यटन आणि चित्रपट उद्योगाला मोठी चालना देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत येथे 'फिल्म टूरिझम' प्रकल्प उभारण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 13, 2026 | 07:15 PM
कोकणात तयार होणार नवी 'फिल्म सिटी'!( सौजन्य - सोशल मीडिया )

कोकणात तयार होणार नवी 'फिल्म सिटी'!( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • कोकणात चित्रपट सृष्टीला बळ!
  • गुहागरच्या पालशेतमध्ये प्रकल्प उभारणार
  • आशिष शेलार यांचे निर्देश
MTDC Guhagar Film City : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत येथे शासकीय भूखंडावर चित्रपट आणि पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प उभारण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) संयुक्त भागीदारीत सविस्तर प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. या प्रकल्पासाठी चित्रपट पर्यटन योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून घेण्यासाठी म्हाडाची मदत घेण्याबाबतही विचार करावा. संपूर्ण प्रस्ताव महिन्याभरात सादर करावा, असे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले. ( MTDC Guhagar Film City )

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड

शासनामार्फत योजना तयार

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील मौजे पालशेतसह परिसरातील जागांचा वापर करून चित्रपट निर्मितीसाठी शासनामार्फत योजना तयार करण्याबाबत मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक बैठकीत माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी कोकणात चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विविध सूचना मांडल्या.

१२५ एकर शासकीय जागा उपलब्ध

मौजे पालशेत येथे पर्यटन विभागाची सुमारे १२५ एकर शासकीय जागा उपलब्ध असून, या जागेवर पर्यटन आणि चित्रपट उद्योगाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा विकसित कराव्यात. शासनामार्फत फिल्मसिटी उभारल्यास या भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. या अनुषंगाने मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी

गुहागर आणि दापोली तालुक्यांतील निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळे चित्रपट चित्रीकरणासाठी उपयुक्त आहेत. या परिसरात अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण झाले आहे. मात्र, चित्रीकरणासाठी आवश्यक परवानग्या आणि सुविधा वेळेत उपलब्ध होण्यात अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर चित्रीकरणासाठी एकत्रित सुविधा उपलब्ध करून दिल्यास चित्रपट निर्मितीला चालना मिळण्यासह स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे डॉ. नातू यांनी सांगितले.

प्रकल्पासाठी निधी उपलब्धतेचे विविध पर्याय

गुहागर तालुक्यातील पालशेत, वेळणेश्वर आणि तवसाळ येथील शासकीय जागांचा उपयोग करून चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याची सूचनाही त्यांनी केली. या जागांवर सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून सुविधा उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. एमटीडीसीसोबत संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून फिल्मसिटी उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे. प्रकल्पासाठी निधी उपलब्धतेचे विविध पर्याय तपासून महिन्याभरात सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या बैठकीत दिले.

बैठकीस माजी आमदार डॉ. विनय नातू दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, एमटीडीसीचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Sumo Didi Trailer Released: रूढींच्या आखाड्यात जिद्दीची कुस्ती! ‘सुमो दीदी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Web Title: Film tourism project to be set up in guhagar palshet ashish shelar instructs mtdc ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • Entertainment News
  • film city

संबंधित बातम्या

साखरपुडा मोडल्यानंतरही आता पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल पुन्हा एकत्र; इन्स्टावर दिली माहिती, म्हटले…
1

साखरपुडा मोडल्यानंतरही आता पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल पुन्हा एकत्र; इन्स्टावर दिली माहिती, म्हटले…

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट
2

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..
3

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..

Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल
4

Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.