Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखरपुडा मोडल्यानंतरही आता पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल पुन्हा एकत्र; इन्स्टावर दिली माहिती, म्हटले…

काही लोकांनी आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्ही साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी माझा मार्ग भरकटलो होते. एक असा निर्णय घेतला जो कदाचित घ्यायला नको होता. आमच्यात किमान संवाद होणे आवश्यक होते, असे पृथ्वीने सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 13, 2026 | 07:38 AM
साखरपुडा रद्द केल्यानंतर पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल पुन्हा एकत्र

साखरपुडा रद्द केल्यानंतर पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल पुन्हा एकत्र

Follow Us
Follow Us:
  • 17 सप्टेंबरला केली होती विभक्त होण्याची घोषणा
  • A Personal Clarification नावाची स्टोरी चर्चेत
  • पुन्हा एकत्र येण्याचेही दिले कारण
मुंबई : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच, पृथ्वीने याचवर्षी मार्चमध्ये अभिनेत्री-इन्फ्लुएन्सर आकृती अग्रवालसोबत साखरपुडा केला होता. मात्र, 17 सप्टेंबर रोजी आकृतीने एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली होती. असे असताना आता त्यांच्या नात्याला एक वेगळे वळण लागले आहे. पृथ्वी शॉने एक नवीन अपडेट देत, ते पुन्हा एकत्र आल्याचे सांगितले आहे.

पृथ्वी आणि आकृतीने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. मात्र, नंतर त्यांनी पुढे न जाण्याचा निर्णय घेतला होता. असे जरी असले तरी आता नात्याने जवळ येताना दिसत आहेत. क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांनी सोमवारी इन्स्टाग्रामवर A Personal Clarification नावाची एक स्टोरी शेअर केली. त्या स्टोरीमध्ये लिहिले आहे, “जेव्हा मी आमचा साखरपुडा मोडला, तेव्हा मी फक्त माझ्या जवळच्या लोकांचेच ऐकले आणि त्यावरच लक्ष दिले.

तसेच काही लोकांनी आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्ही साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी माझा मार्ग भरकटलो होते. एक असा निर्णय घेतला जो कदाचित घ्यायला नको होता. आमच्यात किमान संवाद होणे आवश्यक होते, असे पृथ्वीने सांगितले.

…म्हणून पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय

आकृती अग्रवालनेही सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यामध्ये तिने म्हटले की, “मी त्या निर्णयाची आणि त्यामुळे झालेल्या वेदनांची जबाबदारी घेते. तेव्हापासून, आम्ही मोकळेपणाने बोललो आहोत, एकमेकांना समजून घेतले आहे आणि पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघे एकमेकांसाठी पुरेसे आहोत आणि आम्हाला इतर कोणाचीही गरज नाही. या वेळी, मला आमचे भविष्य आमच्या स्वतःच्या समजूतदारपणा, विश्वास आणि प्रेमाने ठरवायचे आहे. आम्ही एक नवीन सुरुवात करत असताना, कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा”, असेही तिने म्हटले आहे.

Prithvi Shaw : साखरपुड्यानंतर अवघ्या ६ महिन्यांत संपलं नातं; पृथ्वी शॉ-आकृती अग्रवाल झाले वेगळे, चीटिंगच्या आरोपांना मिळालं बळ

Web Title: Prithvi shaw and aakriti aggarwal have come together again after canceling engagement nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 07:15 AM

Topics:  

  • Entertainment News
  • Prithvi Shaw

संबंधित बातम्या

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट
1

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..
2

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..

Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल
3

Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल

Nana Patekar Passed Away: कसा होता नानांचा जीवनप्रवास, गरीबी आणि संघर्षातून कमावले नाव; खऱ्या अर्थाने ‘नटसम्राट’
4

Nana Patekar Passed Away: कसा होता नानांचा जीवनप्रवास, गरीबी आणि संघर्षातून कमावले नाव; खऱ्या अर्थाने ‘नटसम्राट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.