Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badshah New Marathi Rap: ‘चिमणा’ची उंच भरारी! बादशाहच्या रॅपचा तडका, ‘गोंधळ’चं लोकगीत जगभर गाजलं

Badshah New Marathi Rap: ग्रामीण संस्कृतीशी जोडलेल्या ‘गोंधळ’ चित्रपटातील पारंपरिक ‘एक चिमणा चिवचिवला’ या लोकगीताला लोकप्रिय रॅपर बादशाहने आधुनिक रॅप आणि दमदार बीट्सचा तडका दिला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 29, 2026 | 05:54 PM
Badshah New Marathi Rap: ‘चिमणा’ची उंच भरारी! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Badshah New Marathi Rap: ‘चिमणा’ची उंच भरारी! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘चिमणा’ला बादशाहच्या रॅपचा भन्नाट तडका
  • लोकसंगीत आणि आधुनिक बीट्सचा अनोखा संगम
  • गाणं प्रदर्शित होताच ट्रेंडिंगमध्ये
वेगळा आशय, ग्रामीण संस्कृतीशी जोडलेली कथा आणि प्रभावी मांडणी यामुळे ‘गोंधळ’ या चित्रपटाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. देश-विदेशातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद, उत्कृष्ट दिग्दर्शन, प्रभावी सिनेमॅटोग्राफी आणि दमदार कथानकासाठी मिळालेले पुरस्कार यामुळे ‘गोंधळ’ने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आता या चित्रपटातील एक पारंपरिक लोकगीत थेट जागतिक स्तरावर पोहोचले आहे. ‘गोंधळ’मधील ‘एक चिमणा चिवचिवला’ या रॉ आणि अस्सल लोकगीताला लोकप्रिय रॅपर बादशाहने आपल्या खास रॅपचा तडका देत नवे रूप दिले असून नुकतेच प्रदर्शित झालेले हे गाणे रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. विशेष म्हणजे हे गाणं सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.

‘चिमणा’ या नावाने गाणं प्रदर्शित

‘चिमणा’ या नावाने प्रदर्शित झालेल्या या गाण्यात दिव्या कुमार, बादशाह, नागेश मोर्वेकर आणि नेहा खान यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. पारंपरिक लोकसंगीताचा बाज कायम ठेवत त्याला आधुनिक रॅप आणि दमदार बीट्सची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे या गाण्याचे पारंपरिक रूप आणि आधुनिक सादरीकरण यांचा भन्नाट मेळ साधला गेला आहे. ऐकताना आणि पाहातानाही हे गाणे एक वेगळाच अनुभव देत असून प्रदर्शित होताच त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. Badshah New Marathi Rap:

आपल्या शैलीत रॅप

विशेष म्हणजे, ‘एक चिमणा चिवचिवला’ हे ‘गोंधळ’मधील पारंपरिक लोकगीत असून, बादशाहने त्याला आपल्या शैलीत रॅपच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत आणि जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहे. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या या लोकगीताला आधुनिक संगीताचा साज चढवत जागतिक स्तरावर नेल्याबद्दल ‘गोंधळ’च्या टीमने बादशाहसह संपूर्ण गाण्याच्या टीमचे आभार मानले आहेत.

डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपट

‘गोंधळ’ची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांचे असून, डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे यांच्यासह अनेक अनुभवी कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटाला बळ दिले आहे.

Web Title: Gondhal movies ek chimna chivchivla gets a rap makeover by badshah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • marathi movie
  • New Song

संबंधित बातम्या

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड
1

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड

Patri Sarkar 1942: साताऱ्याच्या मातीत पेटलेला स्वातंत्र्यलढा आता रुपेरी पडद्यावर! ‘पत्री सरकार १९४२’चा दमदार पोस्टर लाँच
2

Patri Sarkar 1942: साताऱ्याच्या मातीत पेटलेला स्वातंत्र्यलढा आता रुपेरी पडद्यावर! ‘पत्री सरकार १९४२’चा दमदार पोस्टर लाँच

Columbus Marathi Movie: सुशिक्षित बेरोजगाराच्या आयुष्यात अमेरिकेची संधी! ‘कोलंबस’ची रंजक गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर
3

Columbus Marathi Movie: सुशिक्षित बेरोजगाराच्या आयुष्यात अमेरिकेची संधी! ‘कोलंबस’ची रंजक गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर

Marathi Movie: प्रेम, लग्न आणि नात्यांमधील ट्विस्ट! पूजा सावंत-अभिजीत खांडकेकरच्या ‘लग्न आणि बरंच काही’चा ट्रेलर प्रदर्शित
4

Marathi Movie: प्रेम, लग्न आणि नात्यांमधील ट्विस्ट! पूजा सावंत-अभिजीत खांडकेकरच्या ‘लग्न आणि बरंच काही’चा ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.