Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Movie: प्रेम, लग्न आणि नात्यांमधील ट्विस्ट! पूजा सावंत-अभिजीत खांडकेकरच्या ‘लग्न आणि बरंच काही’चा ट्रेलर प्रदर्शित

Marathi Movie: पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर यांच्या ‘लग्न आणि बरंच काही’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दोन नवीन गाणीही रिलीज झाली असून, चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 12, 2026 | 12:15 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ऑनलाइन प्रेमापासून लग्नापर्यंतचा भन्नाट प्रवास
  • पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर यांची प्रमुख भूमिका
  • ‘मला लग्नाची झालिया घाई’ आणि ‘साखरपुडा’ गाणी प्रदर्शित
Marathi Movie: मराठी मनोरंजनसृष्टीत प्रेम, लग्न आणि नात्यांमधील गुंतागुंत उलगडणारा एक नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लग्न आणि बरंच काही’ असे या चित्रपटाचे नाव असून, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यासोबतच चित्रपटातील ‘मला लग्नाची झालिया घाई’ आणि ‘साखरपुडा’ ही दोन गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता अभिजीत खांडकेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून आजच्या पिढीचे प्रेम, लग्न आणि नात्यांकडे पाहण्याचे बदलते दृष्टिकोन पाहायला मिळणार आहेत.

ऑनलाइन प्रेमापासून लग्नापर्यंतचा भन्नाट प्रवास

आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन प्रोफाइल, राइट स्वाइप, पहिली चॅट आणि त्यानंतर लग्नाचा निर्णय, हा अनेकांच्या आयुष्याचा भाग बनला आहे. डिजिटल माध्यमातून जोडीदार शोधताना जुळणारे सूर, वाढणाऱ्या अपेक्षा आणि अचानक येणारे ट्विस्ट यांची मनोरंजक गोष्ट ‘लग्न आणि बरंच काही’ या चित्रपटातून उलगडणार आहे.

‘लग्न म्हणजे प्रेमाचा हॅप्पी एंडिंग की एका नव्या पिक्चरची सुरुवात?’ असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मनोरंजन, भावनिक क्षण आणि सुरेल गाण्यांची झलक पाहायला मिळते. त्यामुळे चित्रपटाच्या कथेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर यांची प्रमुख भूमिका

‘लग्न आणि बरंच काही’ या चित्रपटात पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अक्षया नाईक, सुकन्या गुरव, भारती पाटील आणि इतर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. बदलत्या काळातील नातेसंबंध आणि लग्नाविषयीच्या अपेक्षा यांची मांडणी या कलाकारांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.

हा चित्रपट केवळ लग्नाभोवती फिरणारा नसून, आजच्या पिढीचे विचार, स्वतःची ओळख, नात्यांमधील अपेक्षा आणि समतोल यांसारख्या विषयांनाही स्पर्श करतो. विशेषतः महिलांच्या भावविश्वाकडे पाहण्याचा प्रयत्न या कथेतून करण्यात आला आहे. मनोरंजनासोबतच प्रेक्षकांना काही प्रश्नांवर विचार करायला लावणारी ही कथा ठरणार आहे.

 

‘मला लग्नाची झालिया घाई’ आणि ‘साखरपुडा’ गाणी प्रदर्शित

चित्रपटाच्या ट्रेलरसोबतच ‘मला लग्नाची झालिया घाई’ आणि ‘साखरपुडा’ ही दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. या चित्रपटातील गाण्यांना लोकप्रिय गायिका वैशाली सामंत यांनी आपला आवाज दिला असून, संगीत दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.

याशिवाय अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, सुरेश वाडकर, मैथिली जोशी आणि अवनी तुषार नान्नजकर या गायकांचाही चित्रपटातील गाण्यांना सुरेल साज लाभला आहे. प्रेमाच्या भावना, लग्नाची धामधूम आणि नात्यांमधील विविध रंग संगीताच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार आहेत.

ट्रेलर आणि गीत अनावरण सोहळ्याला वैशाली सामंत यांची विशेष उपस्थिती होती. चित्रपटातील गाण्यांमुळेही ‘लग्न आणि बरंच काही’बद्दलची उत्सुकता वाढली आहे.

Ramayana Release Date: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर रंगणार ‘रामायणम्’चा भव्य सोहळा! रणबीर कपूरच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

२३ ऑक्टोबरला चित्रपटगृहात रंगणार प्रेम आणि नात्यांचा खेळ

‘लग्न आणि बरंच काही’ या चित्रपटाचे दिग्दर्शन वेदांती चंद्रकांत दाणी यांनी केले आहे. नाद स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अव्यान आर्ट्स आणि म्हाळसा एंटरटेनमेंट यांनी केली असून, पिकल एंटरटेनमेंटचे सहकार्य लाभले आहे. अंजली तुषार नान्नजकर आणि डॉ. संजना सुरेश पै या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत, तर यशश्री मसूरकर यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे.

लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींमधील नातं की त्यापलीकडेही बरंच काही, या प्रश्नातून उलगडणारा प्रेम, भावना, नाती आणि संगीताचा प्रवास प्रेक्षकांना २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप

Web Title: Marathi movie lagna aani barach kahi trailer pooja sawant abhijeet khandkekar ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Pooja Sawant

संबंधित बातम्या

New Marathi Movie: ‘दाणोलीश्वर’मधून उलगडणार सद्गुरू श्री साटम महाराजांचा आध्यात्मिक प्रवास; चित्रपटाची घोषणा
1

New Marathi Movie: ‘दाणोलीश्वर’मधून उलगडणार सद्गुरू श्री साटम महाराजांचा आध्यात्मिक प्रवास; चित्रपटाची घोषणा

Madhu Kambikar Death: ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर काळाच्या पडद्याआड, वयाच्या ७३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2

Madhu Kambikar Death: ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर काळाच्या पडद्याआड, वयाच्या ७३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kapus Konda Movie Trailer: ‘फॅमिलीत कोण राहणार? कोण जाणार?’ सचिन पिळगावकरांच्या ‘कापूसकोंडा’चा ट्रेलर पाहिलात का?
3

Kapus Konda Movie Trailer: ‘फॅमिलीत कोण राहणार? कोण जाणार?’ सचिन पिळगावकरांच्या ‘कापूसकोंडा’चा ट्रेलर पाहिलात का?

The Dirty Picture: १५ वर्षांनंतर ‘द डर्टी पिक्चर’चा सीक्वेल येणार! एकता कपूरने केली घोषणा, कथेबाबतही दिली हिंट
4

The Dirty Picture: १५ वर्षांनंतर ‘द डर्टी पिक्चर’चा सीक्वेल येणार! एकता कपूरने केली घोषणा, कथेबाबतही दिली हिंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.