Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Search AI Mode: टीव्ही मालिकेत AIची एंट्री; ‘गंगा माई की बेटियां’च्या कथेत दिसणार Google Search AI Mode

Google Search AI Mode: झी आणि गूगलच्या अनोख्या भागीदारीत ‘गंगा माई की बेटियां’च्या कथेत Google Search AI Modeची एंट्री होणार आहे. मालिकांमध्ये AIचा नाविन्यपूर्ण वापर पाहायला मिळणार.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 30, 2026 | 08:16 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Google Search AI Mode: भारताच्या मनोरंजनविश्वात तंत्रज्ञान आणि कथाकथनाचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. झी आणि गूगल यांनी एकत्र येत लोकप्रिय झी टीव्ही मालिकांमध्ये Google Search AI Mode समाविष्ट करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून मालिकांमधील व्यक्तिरेखा ‘दिलफ्लुएन्सर्स’च्या रूपात AIचा वापर करत अधिक स्मार्ट आणि आत्मविश्वासाने दैनंदिन निर्णय घेताना दिसणार आहेत.

या उपक्रमाची सुरुवात झी टीव्हीच्या लोकप्रिय ‘गंगा माई की बेटियां’ या मालिकेपासून होणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या या सहकार्यामध्ये पारंपरिक ब्रँड प्लेसमेंटऐवजी Google Search AI Mode हा मालिकेच्या कथानकाचा नैसर्गिक भाग बनवण्यात आला आहे.

कथेतच मिळणार AIची मदत

दैनंदिन आयुष्यातील विविध समस्या, प्रश्न आणि निर्णय घेताना Google Search AI Mode पात्रांना आवश्यक माहिती शोधण्यात मदत करणार आहे. गुंतागुंतीचे प्रश्न समजून घेणे, उपलब्ध पर्यायांचा विचार करणे आणि अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, अशा स्वरूपात AIचा वापर कथानकातून दाखवण्यात येणार आहे.

या सहकार्याअंतर्गत झीच्या ‘दिलफ्लुएन्सर मोमेंट्स’ या संकल्पनेचा वापर करण्यात आला आहे. प्रेक्षक ज्या व्यक्तिरेखांशी भावनिकरित्या जोडलेले आहेत, त्यांच्याच आयुष्यात ब्रँडचा नैसर्गिक समावेश करण्याचा हा प्रयत्न आहे.

अमनदीप सिद्धूची खास ब्रँड फिल्म

या भागीदारीचा एक भाग म्हणून ‘गंगा माई की बेटियां’मध्ये स्नेहाची भूमिका साकारणाऱ्या अमनदीप सिद्धूचा सहभाग असलेली विशेष ब्रँड फिल्मही सादर करण्यात आली आहे.

या फिल्ममध्ये अमनदीप आणि तिची मेकअप आर्टिस्ट आरती यांच्यातील संवादातून कथा पुढे जाते. आरती स्वतःचं ब्युटी सलून सुरू करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे येते. मात्र, व्यवसाय सुरू करताना तिच्यासमोर अनेक प्रश्न आणि अडचणी उभ्या राहतात. अशावेळी Google Search AI Mode तिच्यासाठी विश्वासू मार्गदर्शक ठरतो.

‘गूगल सर्च का नया एआय मोड, समझे, समझाए और राह दिखाए’ या संकल्पनेवर आधारित ही फिल्म AI Mode गुंतागुंतीचे प्रश्न समजून घेऊन योग्य माहिती मिळवून देण्यास कशी मदत करतो, हे दाखवते.

‘तुम से तुम तक’मध्येही दिसणार AI Mode

ब्रँड फिल्मनंतर ही संकल्पना ‘तुम से तुम तक’ आणि ‘गंगा माई की बेटियां’ या मालिकांच्या आगामी भागांमध्ये पुढे नेली जाणार आहे. मालिकेतील पात्रांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर Google Search AI Mode त्यांना विविध पर्याय समजून घेण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी मदत करताना दिसणार आहे.

या माध्यमातून तंत्रज्ञान केवळ जाहिरातीचा भाग न राहता कथानकातील व्यक्तिरेखांच्या प्रवासाचा एक भाग बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

गूगल आणि झीच्या अधिकाऱ्यांनी काय म्हटलं?

गूगल इंडियाच्या प्लॅटफॉर्म्स अँड इकोसिस्टिम्स, कन्झ्युमर मार्केटिंगच्या डायरेक्टर कनिका कालरा यांनी या सहकार्याला भारतीय ग्राहकांसाठी Searchच्या क्षमतांची नव्याने ओळख करून देणारे महत्त्वाचे पाऊल असल्याचं म्हटलं.

तर झीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (जाहिरात महसूल) संदीप मेहरोत्रा यांनी प्रेक्षक ज्या कथांशी भावनिकरित्या जोडलेले आहेत, त्यामध्ये ब्रँड्सचा नैसर्गिक समावेश केल्यास संवाद अधिक प्रभावी होतो, असं सांगितलं.

Badshah New Marathi Rap: ‘चिमणा’ची उंच भरारी! बादशाहच्या रॅपचा तडका, ‘गोंधळ’चं लोकगीत जगभर गाजलं

झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसचे CMO कार्तिक महादेव यांच्या मते, प्रभावी ब्रँड समावेश हा कथानकाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. Google Search AI Modeसोबतच्या या उपक्रमातून नेमकं हेच साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

झीच्या लोकप्रिय मालिकांची व्यापक पोहोच आणि Google Search AI Modeची AI क्षमता यांचा संगम साधत तंत्रज्ञानाला मनोरंजनाच्या कथानकाचा भाग बनवण्याचा हा अनोखा प्रयोग ठरणार आहे.

नेपाळच्या पूरस्थितीने हेलावला ‘टॉक्सिक’चा गायक, घेतला मोठा निर्णय, म्हणाला- “मी लवकरच…”

Web Title: Google search ai mode ganga mai ki betiyan zee tv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 08:16 AM

Topics:  

  • ai
  • Entertainemnt News
  • tv serial

संबंधित बातम्या

OPPO चा नवा धमाका! ColorOS 17 ग्लोबली लॉन्च, AI फीचर्सवर खास भर
1

OPPO चा नवा धमाका! ColorOS 17 ग्लोबली लॉन्च, AI फीचर्सवर खास भर

Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस
2

Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस

AI in Education: एआय बंदूकसारखी… योग्य वापर तर फायदा, अन्यथा नुकसान! मुलांच्या अभ्यासात तंत्रज्ञानाचा कसा करावा वापर?
3

AI in Education: एआय बंदूकसारखी… योग्य वापर तर फायदा, अन्यथा नुकसान! मुलांच्या अभ्यासात तंत्रज्ञानाचा कसा करावा वापर?

World Bank Report 2026: फ्रेशर्ससाठी धोक्याची घंटा! एआयमुळे भारतातील २०% एंट्री-लेव्हल नोकऱ्या संकटात; वर्ल्ड बँकेचा खुला
4

World Bank Report 2026: फ्रेशर्ससाठी धोक्याची घंटा! एआयमुळे भारतातील २०% एंट्री-लेव्हल नोकऱ्या संकटात; वर्ल्ड बँकेचा खुला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.