Govinda Sunita Ahuja Controversy: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
बॉलिवूडचा हिरो नंबर 1 गोविंदा गेल्या काही महिन्यांपासून सिनेमामुळे नाही तर त्याच्या घरच्या भांडणामुळे जास्त चर्चेत आहे. त्याची बायको सुनीता आहुजा सारखी त्याच्यावर आरोप केले की त्याचं बाहेर अफेअर चालू आहे. एका मुलाखतीमध्ये सुनीता आहुजी म्हणाली होती की, मी आणि गोविंदा अनेक वर्षांपासून वेगळे राहत आहोत. अनेकदा सुनीता यांनी कोमल राणीचे नाव घेत होत्या.
गेल्या अनेकदिवसांपासून गोविंदा आणि कोमल अनेकदा एअरपोर्टवर स्पॉट झाले. काही दिवसांपूर्वी दोघेंही लालबागच्या राज्याच्या दर्शनाला एकत्र गेले होते. तिथून चर्चेंना उधाण सुटले. Govinda Sunita Ahuja Controversy:
कालच सुनीता आहुजाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत ती गोविंदा आणि कोमलच्या लालबागच्या फोटोवर बोलत होती. ती म्हणाली होती, “माझं घर विनाकारण कोसळत आहे.” म्हणजे कोमलमुळे तिचं घर तुटतंय असं तिला म्हणायचं होतं. आता यावर कोमल राणीने पहिल्यांदाच मौन सोडतं सुनीतांना सडेतोड उत्तर दिले.
कोमलने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिलंय, “जे घर आधीच तुटलेलं आहे, ते कोणीही तोडू शकत नाही.”इतकंच नाही तर तिने अजून एक धक्कादायक आरोप केला आहे. ती म्हणते, “जी बाई अनेक वर्षांपासून स्वतःच्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न करतेय, तिच्या शापाकडे कोणी लक्ष देत नाही.”
कोमलने पुढे लिहिलंय, “आपल्या देशातले लोक एवढे मूर्ख नाहीत की कोणी सांगितलं ‘कावळ्याने कान नेला’ म्हणून ते कावळ्याच्या मागे पळतील. एक बाई एवढा त्रास सहन करतेय, हे मला कळत नाही. पण त्रास कमी करण्याऐवजी तो सगळ्या जगाला दाखवण्यात काय मजा येते? हे खरंच दुःख आहे की मुद्दाम रचलेला प्लॅन आहे?”
कोमल इथेच थांबली नाही. तिने नाव न घेता सुनीतावर निशाणा साधला आहे. ती लिहिते, “एका माणसाचा मानसिक छळ करणं, त्याला काम करू न देणं, त्याला घरात बसवून एकटं पाडणं आणि मरणाच्या दारात ढकलणं. मला नाही वाटत कोणतीही चांगली बायको आपल्या नवऱ्यासोबत असं वागेल.” असे धक्कादायक आरोप कोमलने सुनीता यांच्यावर केले आहेत.
शेवटी तिने सवाल केला आहे, “अशा बायका मनोरुग्ण असतात की जास्तच हुशार असतात? कारण त्यांना माहित आहे की बंद दाराआड जे करता आलं नाही, ते लोकांसमोर रडून सहानुभूती मिळवून करता येईल. तुमचा अजेंडा चालवण्यासाठी माझं नाव वापरणं बंद करा. देव प्रत्येक चांगल्या माणसाला अशा धूर्त बायकांपासून वाचवो.”

हे प्रकरण जेव्हा एअरपोर्टवर दोघं एकत्र दिसले तेव्हापासून सुरू झालं. दोनदा ते एकत्र स्पॉट झाले आणि त्यांनी फोटो पण दिले. मग लालबागला एकत्र गेल्यावर तर आगच लागली.
यावर गोविंदाने ANI ला सांगितलं होतं, “माझं कोमलसोबत अफेअर असलं तरी हा काही पब्लिक इश्यू नाही. मी काम करतोय. माझे प्रोफेशनल संबंध आहेत. लोकांना वाटतंय मी काम करू शकणार नाही. मला फायनान्सर मिळू नये म्हणून मला धमक्या येतायत. सगळे माझ्या विरोधात प्लॅन करतायत.”
Govinda Affair: ‘मुलीच्या वयाची, थोडी तरी लाज बाळग…’ बायको सुनीता …
सांगायचं झालं तर गोविंदा आणि कोमल लवकरच ‘रूपा’ नावाच्या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे हे अफेअर आहे की फक्त सिनेमाचं प्रमोशन आहे, हे अजून कळलेलं नाही. पण कोमलने जे लिहिलंय त्यामुळे हे भांडण आता अजूनच वाढणार हे नक्की.आहे.






