Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Actress: ‘बाबांनी स्वप्नांना कधीच…’;अभिनेत्रीने सांगितला स्वातंत्र्याचा खरा अर्थ

Marathi Actress: स्वातंत्र्यदिन म्हटलं की शाळेतील तिरंगा, ध्वजारोहण, देशभक्तीची गाणी आणि मित्रांसोबतचा उत्साह अशा अनेक आठवणी ताज्या होतात. अभिनेत्री हेमांगी कवीनेही तिच्या बालपणीच्या १५ ऑगस्टच्या खास आठवणी शेअर केल्या आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 14, 2026 | 01:13 PM
Marathi Actress: ‘बाबांनी स्वप्नांना कधीच...’ ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Marathi Actress: ‘बाबांनी स्वप्नांना कधीच...’ ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • हेमांगी कवीने सांगितल्या बालपणीच्या १५ ऑगस्टच्या खास आठवणी.
  • शाळेतील ध्वजारोहण आणि देशभक्तीच्या कार्यक्रमांचा तिला विशेष उत्साह असायचा.
  • खेळांची आवड असल्याने हेमांगी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायची.
  • ढोल-ताशे, राष्ट्रगीताचा सराव आणि तिरंग्यामुळे शाळेचे वातावरण उत्साहाने भरून जायचे.
Hemangi Kavi Shares Independence Day Memories: स्वातंत्र्यदिन म्हटलं की प्रत्येकाच्या मनात बालपणीच्या काही खास आठवणी जाग्या होतात. शाळेचा गणवेश, सकाळची लगबग, तिरंगा, देशभक्तीची गाणी आणि मित्रासोबतचा उत्साह… या आठवणीत अनेक वर्षांनंतरही मनात ताज्या राहतात. अभिनेत्री हेमांगी कवी सोबत तिच्या १५ ऑगस्टचा दिवसच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सध्या हेमांगी सन मराठीवरील तू अनोखी तरी सोबती या मालिकेत नीलांबरीची भूमिका साकारणाऱ्या हेमांगीने स्वातंत्र्यदिनाशी जोडलेल्या आपल्या काही जुन्या आठवणी सांगितल्या.

लहानपणी शाळेत स्वांतत्र्यदिनाची तयारी सुरु झाली की, हेमांगीच्या उत्साहाला उधाण यायचं. खेळांची आवड असल्याने विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा तिचा उत्साह वेगळाच होता. ध्वजरोहणाच्या कार्यक्रमासाठी होणारी तयारी , ढोल-ताशांचा आवाज आणि राष्ट्रगीताच्या सरावामुळे शाळेचं वातावरणच बदलून जायचं. Marathi Actress:

हेमांगीने सांगितल्या तिच्या शाळेतील स्वातंत्र्यदिनाच्या आठवणी

स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशीचीही एक वेगळीच लगबग असायची. दुसऱ्या दिवशी घालायचा पांढरा गणवेश स्वच्छ करुन नीट इस्त्री करुन ठेवायचा. सकाळी तयार होऊन शाळेत जायचं, ध्वजरोहणाच्या कार्यक्रमात पुन्हा सहभागी व्हायचं. आज आयुष्य खूप पुढे आलं असली तरी त्या दिवसांच्या आठवणी मनात अजूनही तशाच आहेत.त.

अभिनयाच्या क्षेत्रात आल्यानंतरही हा दिवस तिच्यासाठी खासच राहिला. मालिकेच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी संपूर्ण टीम एकत्र येते आणि राष्ट्रगीत म्हणते. काही मिनिटांचा हा कार्यक्रम असला तरी त्या क्षणी वातावरणात एक वेगळीच भावना निर्माण होते, असं हेमांगी सांगते. देशासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य व्यक्तींची आठवण या दिवशी अधिक प्रकर्षाने होते. आपण ज्या देशात जन्मलो, त्याचा अभिमान वाटतो, ही भावना तिच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

हेमांगीच्या मते,

स्वातंत्र्याचा अर्थ केवळ भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यापुरता मर्यादित नाही. एखाद्या व्यक्तीला स्वतःचे विचार मांडता येणे, आपल्या आवडीचा मार्ग निवडता येणे आणि स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहता येणे, हेदेखील स्वातंत्र्याचाच एक भाग आहे.

Bollywood Fashion: सिंपल लूक, जबरदस्त स्वॅग! हृतिक, टायगर ते टिमोथींचे स्टायलिश लूक्स

विशेषतः मुलींच्या बाबतीत हा विषय तिच्या मनाच्या जवळचा आहे. आपल्या घरातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे तिला स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्याची संधी मिळाली. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढतानाही तिच्या वडिलांनी तिच्यावर करिअर किंवा कपड्यांच्या बाबतीत अनावश्यक बंधनं घातली नाहीत. आधी कलाकार आणि पुढे अभिनेत्री होण्याचं स्वप्न तिने पाहिलं, तेव्हा घरच्यांनी तिच्या निर्णयावर विश्वास ठेवला.

हेमांगीसाठी खरी श्रीमंती काय आहे?

अभिनयाच्या कामामुळे रात्री उशिरा घरी परतण्याचे प्रसंग आले, तरी तिच्या वडिलांनी तिच्यावर अविश्वास दाखवला नाही. उलट तिच्या कामाला आणि निवडीला साथ दिली. बहिणीलाही घरात अशीच मोकळीक मिळाल्याचं हेमांगी सांगते. तिच्यासाठी हीच खरी श्रीमंती आहे.

लग्नानंतरही तिच्या आयुष्यातील हा आधार कायम राहिला. पतीकडूनही तिला स्वतःच्या कामासाठी आणि निर्णयांसाठी पूर्ण सहकार्य मिळालं. म्हणूनच यंदाच्या स्वातंत्र्यदिनाकडे पाहताना हेमांगीसाठी देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच स्वतःच्या आयुष्याचा मार्ग निवडण्याची मुभाही तितकीच मौल्यवान आहे.

Awarapan 2: इमरान हाश्मीची ‘आवारापन 2’ ठरतेय हिटची दावेदार; पहिल्याच दिवशी 15-20 कोटींची कमाई शक्य

तिच्या या विचारांतून एक साधा पण महत्त्वाचा संदेश मिळतो. स्वातंत्र्य म्हणजे फक्त मोकळेपणाने जगणं नाही, तर आपल्या मनातली इच्छा ओळखून ती पूर्ण करण्याची संधी मिळणंही आहे. प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक मुलीला अशी संधी मिळाली, तर स्वातंत्र्याचा खरा अर्थ आणखी सुंदर होईल.

Web Title: Hemangi kavi shares childhood memories of independence day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • Entertainment marathi
  • marathi actress
  • Marathi News

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी
2

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार
3

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत
4

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.