Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Unfolds Across 2 Seasons: OTT वर अनेक पर्याय उपलब्ध असताना ‘जमनापार’ ही 2024 मध्ये आलेली वेबसीरीज आपल्या आयुष्याशी जोडलेली कथा म्हणून लक्ष वेधून घेते. पूर्व दिल्लीच्या पार्श्वभूमीवर आधारित या सीरीजमध्ये शैंकी नावाच्या मध्यमवर्गीय तरुणाच्या स्वप्नांचा, करिअरच्या संघर्षाचा आणि वडिलांसोबतच्या नात्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 05, 2026 | 02:44 PM
Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मध्यमवर्गीय शैंकीची संघर्षमय कहाणी
  • कॉर्पोरेट जगाच्या आकर्षणात बदललेलं आयुष्य
  • अडचणीत कुटुंबाची भक्कम साथ
 

आजकाल OTT वर बघण्यासाठी एवढे पर्याय आहेत की, प्रश्व पडतो की , नेमकं काय बघावं? असं काहीतरी असावं जे आपल्या जवळचं तसेच आपल्या आयुष्याशी जोडलेलं बघायचं असेल तर ‘जमनापार’ ही वेबसीरीज नक्की बघा. ही फक्त मनोरंजन नाही, तर आपल्या घरातलीच गोष्ट आहे असं वाटतं. 2024 मध्ये आलेली ही सीरीज पूर्व दिल्लीच्या बॅकग्राउंडवर आहे. दिल्लीत यमुना नदीच्या पलीकडे असलेल्या भागाला जमनापार म्हणतात. तिथला एक साधा मध्यमवर्गीय पोरगा, त्याची स्वप्नं आणि त्याचे वडील, हीच या सीरीजची मेन स्टोरी आहे. मोठं व्हायचंय, श्रीमंत व्हायचंय पण आपली मुळं विसरायची नाहीत, यातला संघर्ष यात भारी दाखवलाय.

पहिल्या सीझनमध्ये काय आहे?

ही गोष्ट आहे शैंकीची. त्याचे वडील लक्ष्मीनगरमध्ये CA चे क्लासेस घेत असतात. तसेच ते प्रसिद्ध टीचर असतात. त्यांची इच्छा आहे की आपल्या मुलाने CA व्हावं. पण शैंकी काय करतो, अनेक वेळा प्रयत्न करून पण त्याची CA ची फायनल परीक्षा निघत नाही. घरच्यांचा दबाव, बाहेरच्या लोकांचं बोलणं, यामुळे तो खूप टेन्शनमध्ये असतो.

मग खर्चासाठी तो एका छोट्या कंपनीत नोकरी करायला लागतो. तिथे काम करताना त्याला गुरुग्रामच्या एका मोठ्या कॉर्पोरेट क्लायंटला भेटायची संधी मिळते. तिथे गेल्यावर त्याला ते मोठं जग, मोठ्या बिल्डिंगा, पैसा, इंग्लिश बोलणं सगळंच भारी वाटतं. दरम्यान त्याला आपल्या जमनापारच्या साध्या घराची लाज वाटायला लागते. तो आपली ओळख लपवायला लागतो. मी पण त्या मोठ्या जगातलाच आहे असं दाखवायला लागतो. Unfolds Across 2 Seasons:

नवीन मित्र, नवीन लाईफस्टाईलच्या नादात तो घरच्यांनी दिलेली शिकवण विसरतो. पण याच मोठ्या कॉर्पोरेट जगातले लोक त्याचा वापर करतात आणि त्याला एका खोट्या केसमध्ये अडकवतात. सगळं संपलं असं वाटत असताना त्याचं कुटुंब त्याच्यामागे खंबीरपणे उभं राहतं. तेव्हा त्याला कळतं की आपलं खरं जग कोणतं आहे.

आता दुसऱ्या सीझनमध्ये काय होतं?

दुसरा सीझन पहिल्या सीझनच्या पुढे सुरू होतो. यावेळी शैंकी शेवटी CA ची परीक्षा पास होतो. पण आधी केलेल्या एका घोटाळ्यामुळे त्याचा CA चा परवाना जातो. परवाना परत मिळवण्यासाठी तो धडपडतोय.याच वेळी तो दोन जगात अडकतो. एकीकडे त्याचं जुनं पूर्व दिल्लीतलं साधं आयुष्य आणि दुसरीकडे पैशाने भरलेलं शॉर्टकटचं जग. याच काळात त्याची भेट ‘शौकीन भैया’ नावाच्या माणसाशी होते. हा माणूस पूर्व दिल्लीत भंगारचा बिझनेस करतो, खूप पैसा आणि पॉवर आहे त्याच्याकडे असेत.

ही भूमिका विजय राज यांनी एकदम जबरदस्त केली आहे. शौकीन भैया त्याला पैशाच्या जगात ओढतो, पण नंतर त्याच्याकडून शैंकीला मोठा धोका मिळतो.घरात पण प्रॉब्लेम वाढतात. त्याची बहीण शैलजा आणि तिचा नवरा पारस यांच्यात IVF आणि इतर कौटुंबिक गोष्टींवरून भांडणं सुरू होतात. त्यामुळे घरातले संबंध बिघडायला लागतात. दुसऱ्या सीझनमध्ये फक्त पैशाचा नाही तर नात्यांचा, कुटुंबाचा आणि स्वतःच्या ओळखीचा संघर्ष पण दाखवला आहे.

का बघावी ?

या सीरीजला IMDb वर 7.9 रेटिंग मिळालं आहे, जे खूप चांगलं आहे. दोन सीझन मिळून 20 एपिसोड आहेत. जर तुम्हाला मध्यमवर्गीय कुटुंबाची, स्वप्नांची आणि वास्तवाची गोष्ट बघायची असेल तर ‘जमनापार’ Amazon Prime वर नक्की बघा. तुम्हाला तुमचीच गोष्ट वाटेल.

Web Title: Imdb 79 rated ott series about a middle class boy and his father

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा
1

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
2

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

Chandrapur News: विद्यार्थी शाळेत पोहोचले, पण शिक्षकच गायब! गोंडपिपरीत पालकांचा गोंधळ; नेमकं काय घडलं?
3

Chandrapur News: विद्यार्थी शाळेत पोहोचले, पण शिक्षकच गायब! गोंडपिपरीत पालकांचा गोंधळ; नेमकं काय घडलं?

Sunny Leone: सनी लिओनी बनली ‘शांताबाई’! मराठमोळ्या अंदाजात भन्नाट जलवा
4

Sunny Leone: सनी लिओनी बनली ‘शांताबाई’! मराठमोळ्या अंदाजात भन्नाट जलवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.