Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jacqueline Fernandez : जॅकलिन फर्नांडिसला मोठा धक्का! २०० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

२०० कोटी रुपयांच्या कथित खंडणी आणि संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचा पाय आणखी खोलात गेला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: May 31, 2026 | 03:33 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

२०० कोटी रुपयांच्या कथित खंडणी आणि संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचा निकाल दिला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने या प्रकरणात सुकेश चंद्रशेखर, लीना मारिया पॉल, बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि इतर आरोपींवर आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित करण्यासोबतच, २०० कोटी रुपयांच्या कथित खंडणीशी संबंधित मकोका (MCOCA) प्रकरणातही न्यायालयाने सुकेश चंद्रशेखर, लीना मारिया पॉल आणि इतर आरोपींवर आरोप निश्चित केले आहेत. न्यायालयाने सर्व आरोपींना आरोपांवर औपचारिक स्वाक्षरी करण्यासाठी ३ जून रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

हे प्रकरण तक्रारदार अदिती सिंग यांच्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमधून उद्भवले आहे. तपास यंत्रणांनुसार, कथित फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर तुरुंगातून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळल्याचा आणि त्या पैशांचा विविध मार्गांनी वापर केल्याचा आरोप आहे. अंमलबारी संचालनालयाचा (ईडी) आरोप आहे की, जॅकलिन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखरकडून महागड्या भेटवस्तू आणि इतर फायदे मिळाले, तर दुसरीकडे या अभिनेत्रीने सातत्याने हेच सांगितले आहे की, तिला या कथित गुन्हेगारी उत्पन्नाच्या स्रोताबद्दल काहीही माहिती नव्हती.

Khatron Ke Khiladi 15 Promo: तुफानी टास्क-थरारक स्टंट्स! रोहित शेट्टीच्या इशाऱ्यामुळे वाढली उत्सुकता, स्पर्धकांना बसणार धक्का

सुकेश चंद्रशेखर तुरुंगात असला तरी, त्याच्या व्यभिचाराची कहाणी सोशल मीडियावर चर्चेत आहे. जॅकलिनने एकदा या कुख्यात ठगाला भेट दिली होती आणि त्यानंतर त्यांच्या कथित प्रेमकथेचे पदर उलगडू लागले. सुकेशने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू दिल्या आणि तिच्या परदेशातील कुटुंबीयांना मौल्यवान वस्तू भेट दिल्याचे वृत्त आहे. यातील बहुतेक पैसा बेकायदेशीरपणे कमावलेला होता आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात जॅकलिनला आता ३ जून रोजी न्यायालयात हजर राहावे लागेल. जॅकलिन हे प्रकरण कसे हाताळते हे पाहणे महत्त्वाचे आहे. या प्रकरणामुळे जॅकलिनच्या करिअरवर मोठा परिणाम झाला आहे आणि तिची लोकप्रियता डागाळली आहे. असे असले तरी, जॅकलिन चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत आहे.

Deool Band 2: स्वामींची भक्ती अपरंपार, देऊळ बंद २ च्या कलेक्शनमध्ये १० व्या दिवशी मोठी वाढ! रितेश देशमुखच्या चित्रपटाला टाकलं मागं

Web Title: Jaelinecqu fernandez faces major setback court passes key order in 200 crore money laundering case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Court
  • Jacqueline Fernandez

संबंधित बातम्या

‘डोला रे डोला’ शूटिंगवेळी माधुरी दीक्षित होती प्रेग्नेंट? अभिनेत्रीचा मोठा खुलासा, चर्चेला पूर्णविराम
1

‘डोला रे डोला’ शूटिंगवेळी माधुरी दीक्षित होती प्रेग्नेंट? अभिनेत्रीचा मोठा खुलासा, चर्चेला पूर्णविराम

१३ वर्षे पूर्ण: ‘ये जवानी है दीवानी’च्या आठवणींना उजाळा; दीपिका पदुकोणच्या स्टाइलिश लूकची पुन्हा चर्चा
2

१३ वर्षे पूर्ण: ‘ये जवानी है दीवानी’च्या आठवणींना उजाळा; दीपिका पदुकोणच्या स्टाइलिश लूकची पुन्हा चर्चा

दिव्यांका त्रिपाठीच्या जुळ्या बाळांची पहिली झलक व्हायरल; घरी येताच सासूबाईंनी काढली नजर, व्हिडिओ चर्चेत
3

दिव्यांका त्रिपाठीच्या जुळ्या बाळांची पहिली झलक व्हायरल; घरी येताच सासूबाईंनी काढली नजर, व्हिडिओ चर्चेत

Madhuri Dixit Viral Video: AI तंत्रज्ञानाचा गैरवापर; डीपफेकची बळी ठरली माधुरी दीक्षित, व्हायरल व्हिडिओ पाहून चाहते थक्क
4

Madhuri Dixit Viral Video: AI तंत्रज्ञानाचा गैरवापर; डीपफेकची बळी ठरली माधुरी दीक्षित, व्हायरल व्हिडिओ पाहून चाहते थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.