अभिनेत्री जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वापासून सोशल मीडियावर फार Active आहे. तिचे चाहतेमंडळी अगदी तिच्यावर फिदा आहेत. अभिनेत्री दररोज नवनवीन Photos, Reels आणि इतर पोस्ट शेअर करतच असते. चाहतेही तिच्या या सक्रियतेला भरभरून प्रतिसाद देत असतात. जान्हवी किल्लेकरची ही पोस्ट नक्की पहा.
अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने शेअर केले तिचे नवीन Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने नथ परिधान केली आहे, जी या फोटोंबद्दलची विशेष बाब आहे. मोकळे सोडलेले केसं आणि चेहऱ्यावरचे स्मित हास्य पाहणाऱ्यांना आकर्षक करत आहे.
जान्हवीने पोस्टखाली सुंदर असा कॅप्शन दिला आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने 'नथीचा नखरा' असे नमूद केले आहे.
अभिनेत्रीने परिधान केलेली ही सुंदर नथ @nathicha__nakhara यांनी डिजाईन केली आहे, असे कॅप्शनमध्ये नमूद आहे.
कमेंट्समध्ये अभिनेत्रीला भरभरून कौतुक मिळाला आहे. तिच्या निखळ सौंदर्यामुळे कौतुकांचा वर्षाव झाला आहे.