Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhootam Bhayyam Movie: ‘भूतम भयम्’ मधील भूमिकेसाठी करण सोनावणेने गिरवले मालवणीचे धडे; प्रेक्षकांना दिसणार नवा अंदाज

Bhootam Bhayyam Movie: ऑरेंज ज्यूस गँग’मधील करण सोनावणे लवकरच भूतम भयम्’ या नवीन चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने काय विशेष मेहनत घेतली आहे जाणून घेऊया.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 16, 2026 | 12:48 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Bhootam Bhayyam Movie: सोशल मीडियावरील आपल्या विनोदी अंदाजाने आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा ‘ऑरेंज ज्यूस गँग’मधील करण सोनावणे (karan sonawane)आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूतम भयम्’मध्ये करण एका अस्सल मालवणी तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे.या भूमिकेला वास्तवदर्शी बनवण्यासाठी करणने मालवणी भाषा शिकण्यावर विशेष भर दिला. मुळात मालवणी भाषिक नसतानाही त्याने संवादांपुरती भाषा न शिकता तिची लकब, उच्चार, शब्दफेक आणि बोलण्याची शैली समजून घेण्यासाठी मेहनत घेतली.

करण मुळात मालवणी भाषिक नसतानाही त्याने या भूमिकेसाठी स्वतःवर विशेष मेहनत घेतली. फक्त संवाद पाठ करून न थांबता, मालवणी भाषेची लकब, उच्चार, शब्दफेक आणि बोलण्याची सहज शैली समजून घेण्यासाठी त्याने सातत्याने सराव केला. यासाठी त्याने आपल्या मालवणी मित्रांची, चित्रपटाच्या सेटवरील मालवणी सहकाऱ्यांची मदत घेतली. संवादांमधील प्रत्येक शब्द नैसर्गिक वाटावा, पडद्यावर कुठेही कृत्रिमपणा जाणवू नये, यासाठी त्याने अनेकदा संवादांची उजळणी करत भाषेवर प्रभुत्व मिळवलं.

Samarth Teaser Out: समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आधुनिक स्पर्श; ‘समर्थ’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित

याबद्दल करण सोनावणे (karan sonawane) म्हणाला, “या चित्रपटात मी साकारत असलेली भूमिका मालवणी असल्याचं समजलं, तेव्हाच मला जाणवलं की ही भाषा फक्त बोलायची नाही, तर ती जगायची आहे. सुरुवातीला मालवणीतील काही शब्द, त्यांचा उच्चार आणि बोलण्याची लय समजून घेणं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. काही शब्द वारंवार चुकायचे, काही वाक्यं म्हणताना मराठीची सवय मध्ये यायची. परंतु मला ही भूमिका कुठेही खोटी वाटू द्यायची नव्हती. त्यामुळे मी माझ्या मालवणी मित्रांशी सतत बोलत राहिलो. सेटवरही जे मालवणी सहकारी होते त्यांचं बोलणं बारकाईने ऐकलं, त्यांना माझे संवाद ऐकवून दुरुस्त करून घेतले. अनेकदा एकाच संवादाचा पुन्हा पुन्हा सराव केला. हळूहळू भाषेची गोडी लागली आणि तिची सहजता अंगी आली. आज पडद्यावर स्वतःला मालवणीत बोलताना पाहाताना खूप वेगळं आणि समाधानकारक वाटतं. प्रेक्षकांनाही माझा हा प्रयत्न नक्की आवडेल, अशी मला आशा आहे. कलाकार म्हणून प्रत्येक भूमिकेत काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि ‘भूतम भयम्’मुळे मला मालवणी भाषेचं सौंदर्य जवळून अनुभवता आलं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.”

रामचंद्र अरुण गांवकर लिखित-दिग्दर्शित ‘भूतम भयम्’ या चित्रपटात सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, नील साळेकर, करण सोनावणे (karan sonawane) यांच्यासह पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा हॉरर-कॉमेडी चित्रपट २४ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

‘सीता के पति…’; जंतर-मंतरवरील कुणाल कामराच्या वक्तव्यावरून नवा वाद, अभिजित दीपकेवरही नेटकऱ्यांचा निशाणा

Web Title: Karan sonawane learned malvani language for bhootam bhayam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम
1

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम

Bandkhor Marathi Movie: चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष
2

Bandkhor Marathi Movie: चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

Actor Rajat Bedi: बॉलिवूडनंतर मराठीत रजत बेदीची दमदार एन्ट्री! ‘बंधू’मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका
3

Actor Rajat Bedi: बॉलिवूडनंतर मराठीत रजत बेदीची दमदार एन्ट्री! ‘बंधू’मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका

Hrita Durgule: शाळेचा गणवेश, दोन वेण्या आणि खट्याळ हसू, हृता दुर्गुळेचा नवा लूक पाहिलात का?
4

Hrita Durgule: शाळेचा गणवेश, दोन वेण्या आणि खट्याळ हसू, हृता दुर्गुळेचा नवा लूक पाहिलात का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.