Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketaki Mategaonkar: केतकी माटेगावकरची ‘कृष्णार्पण सिरीज’द्वारे जन्माष्टमीची खास भेट; तीन कव्हर्ससह ‘मनमोहन कृष्णा’ची सुरेल मेजवानी

Ketaki Mategaonkar: जन्माष्टमीनिमित्त केतकी माटेगावकर ‘कृष्णार्पण सिरीज’ घेऊन आली आहे. तीन निवडक कव्हर्ससह तिची ओरिजिनल रचना ‘मनमोहन कृष्णा’ या संगीतभेटीचा समावेश आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 06, 2026 | 01:05 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ketaki Mategaonkar: जन्माष्टमीच्या निमित्ताने गायिका आणि संगीतकार केतकी माटेगावकरने चाहत्यांसाठी खास संगीतभेट आणली आहे. ‘कृष्णार्पण सिरीज’च्या माध्यमातून केतकी भक्ती, संगीत आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम घडवून आणणार आहे. भगवान श्रीकृष्णाला समर्पित या विशेष मालिकेत एकूण पाच संगीत अर्पणे सादर केली जाणार असून, त्यामध्ये तीन निवडक कव्हर गाण्यांसोबत एका ओरिजिनल रचनेचाही समावेश आहे.

‘रामार्पण सिरीज’नंतर आता ‘कृष्णार्पण’

केतकी माटेगावकरच्या याआधीच्या भक्तिसंगीत प्रकल्पाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. तिच्या ‘रामार्पण सिरीज’ला लाखो व्ह्यूज मिळाले आणि या माध्यमातून देशभरातील प्रेक्षकांशी तिचं नातं आणखी घट्ट झालं. याच यशानंतर आता केतकीने ‘कृष्णार्पण सिरीज’च्या माध्यमातून भक्तिसंगीताचा प्रवास पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.

या मालिकेत लोकप्रिय आणि परिचित भक्तिगीतांना केतकी आपल्या खास गायकीच्या शैलीत नव्याने सादर करणार आहे. त्यामुळे या कव्हर गाण्यांना तिच्या आवाजाची वेगळी छटा मिळणार आहे. त्यासोबतच सिरीजमधील ओरिजिनल रचनेतून तिच्या वैयक्तिक संगीतविचारांची आणि भावविश्वाची झलक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

गायिका ते संगीतकार; केतकीच्या प्रवासाची नवी झलक

गायनासोबतच संगीत रचना आणि संगीतमय कथनाच्या क्षेत्रातही केतकीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. *‘कृष्णार्पण सिरीज’*मधून तिच्या या बहुआयामी प्रतिभेचं दर्शन घडणार आहे.

कव्हर गाण्यांमधून लोकप्रिय भक्तिसंगीताला स्वतःच्या शैलीत सादर करताना, तर ओरिजिनल रचनेतून स्वतःच्या भावना व्यक्त करताना केतकीचा कलाकार म्हणून झालेला प्रवास अधोरेखित होतो. पारंपरिक भक्तिसंगीताला आधुनिक संगीत संयोजनाची जोड देण्याचा प्रयत्नही या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

‘मनमोहन कृष्णा’ ही केतकीची खास ओरिजिनल रचना

या सिरीजमधील शेवटचं रिलीज होणारं गाणं ‘मनमोहन कृष्णा’ हे केतकी माटेगावकर ने स्वतः रचलेलं ओरिजिनल गाणं आहे. हे गाणं आपल्या मनाच्या खूप जवळचं असल्याचं केतकीने सांगितलं आहे.

जन्माष्टमीच्या या खास उपक्रमाबद्दल बोलताना केतकी म्हणाली, “जन्माष्टमीची ऊर्जा खूपच वेगळी असते, कारण या सणामध्ये भक्ती, उत्सव आणि संगीत या तिन्ही भावनांचा सुंदर संगम असतो. यावर्षी माझी ही संगीतभेटही याच सर्व भावनांचे प्रतिबिंब असावी, अशी माझी इच्छा होती.”

Mirzapur The Movie Box Office: ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्या दिवशी कमाईत २४.३% वाढ; ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

“कव्हर गाणी माझ्या शैलीतून नव्याने सादर करण्याची संधी मिळाली”

पुढे केतकी म्हणाली, “लोकांना आधीपासून आवडणारी गाणी कव्हर करताना मला ती माझ्या शैलीतून नव्याने सादर करण्याची संधी मिळाली, तर ओरिजिनल गाण्यांमधून कृष्णाबद्दलच्या माझ्या भावना आणि संगीतविषयक जाणिवा अधिक वैयक्तिक पद्धतीने व्यक्त करता आल्या.”

‘मनमोहन कृष्णा’ या ओरिजिनल गाण्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “हे गाणे माझ्या मनाच्या खूप जवळचे आहे आणि प्रत्येक गाण्याशी श्रोते कशा प्रकारे जोडले जातील, याची मला खूप उत्सुकता आहे.”

Sonali Kulkarni On Vidyanand Bapat: ”तुझी दमछाक होऊ नये…”; विद्यानंद बापटांच्या भूमिकेवर सोनाली कुलकर्णीची कौतुकाची थाप

भक्तिसंगीताला डिजिटल माध्यमांवर तरुण प्रेक्षकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत असताना, ‘कृष्णार्पण सिरीज’च्या माध्यमातून केतकी माटेगावकर पारंपरिक भक्तीभावाला आधुनिक संगीताची जोड देत आपला हा सुरेल प्रवास पुढे नेत आहे. जन्माष्टमीच्या निमित्ताने तिची ही संगीतभेट रसिकांसाठी नक्कीच खास ठरणार आहे.

Web Title: Ketaki mategaonkar krishnarpan series manmohan krishna song

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress

संबंधित बातम्या

Mirzapur The Movie Box Office: ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्या दिवशी कमाईत २४.३% वाढ; ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
1

Mirzapur The Movie Box Office: ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्या दिवशी कमाईत २४.३% वाढ; ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Sonali Kulkarni On Vidyanand Bapat: ”तुझी दमछाक होऊ नये…”; विद्यानंद बापटांच्या भूमिकेवर सोनाली कुलकर्णीची कौतुकाची थाप
2

Sonali Kulkarni On Vidyanand Bapat: ”तुझी दमछाक होऊ नये…”; विद्यानंद बापटांच्या भूमिकेवर सोनाली कुलकर्णीची कौतुकाची थाप

Malaika Arora-Arjun Kapoor: ‘या’ कारणामुळे तुटलं मलायका-अर्जुनचं नातं? ब्रेकअपमागचं कारण चर्चेत
3

Malaika Arora-Arjun Kapoor: ‘या’ कारणामुळे तुटलं मलायका-अर्जुनचं नातं? ब्रेकअपमागचं कारण चर्चेत

Mirzapur The Movie: ‘बीना भाभी’च्या BOLD .सीन्सची चर्चा; अभिनेत्रीने सांगितलं, शूटिंग कसं व्हायचं?
4

Mirzapur The Movie: ‘बीना भाभी’च्या BOLD .सीन्सची चर्चा; अभिनेत्रीने सांगितलं, शूटिंग कसं व्हायचं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.