Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pooja Sawant Car Accident : मोठी दुर्घटना टळली! “कपबशी” चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मोठा अपघात, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

“कपबशी” चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटदरम्यान अभिनेत्री पुजा सावंत हीच्या कारचा मोठा अपघात घडला असल्याची माहिती मिळत आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 09, 2026 | 03:57 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

चित्रपट ‘कपबशी’च्या प्रमोशन कार्यक्रमादरम्यान आज एक मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त पुणे येथून सांगलीकडे जात असताना सातारा जिल्ह्यातील काशीळ परिसरात अपघाताची घटना घडली. प्रवासादरम्यान तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला आहे.

या वाहनांमध्ये अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे यांचा समावेश होता. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. काहींना किरकोळ मुका मार लागल्याची माहिती मिळत आहे.अपघातामुळे वाहनांचे नुकसान झाले असून घटनास्थळी काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र सर्व प्रवासी सुरक्षित असल्याने मोठा अनर्थ टळला.अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

सुकल्प चित्र निर्मिती संस्थेच्या बॅनरखाली “कप बशी” या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचे निर्माते कल्पक सदानंद जोशी असून बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश रामगोपाल राठी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.चित्रपटाची पटकथा आणि संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिले असून दिग्दर्शनाची धुरा वैभव रामकृष्ण चिंचाळकर यांनी सांभाळली आहे.या चित्रपटाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीला पहिल्यांदाच सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. गीतलेखनाची जबाबदारी गुरु ठाकूर यांनी पार पाडली आहे.

Batwara First look: भारत-पाकिस्तान फाळणीच्या जखमा पुन्हा उघडणार? सनी देओलच्या ‘बंटवारा 1947’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

तांत्रिक बाजूला देखील तितकाच भक्कम संघ दिसून येतो. बाळू दहिफळे यांनी छायांकन (कॅमेरामन) केले असून संकलनाची जबाबदारी आशिष म्हात्रे यांनी सांभाळली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते मंदार कमलापूरकर यांनी ध्वनी संयोजन केले असून, श्रीकांत देसाई यांनी लूक डिझाइन केले आहे.नृत्यदिग्दर्शन दीपाली विचारे, कला दिग्दर्शन महेश कुडाळकर तर प्रोजेक्ट हेड म्हणून चिन्मय शिंत्रे यांनी काम पाहिले आहे.

Manjari Fadnnis : मुक्या प्राण्याला बेदम मारहाण, झाला खून! मंजिरी फडणीस झाली भावुक; शेअर केली पोस्ट, अश्रू अनावर

चित्रपटातील कोणते कोणते कलाकार?

चित्रपटात निर्मिती सावंत, पूजा सावंत, नवोदित अभिनेता ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, आनंद काळे, चिन्मय शिंत्रे आणि उमा सरदेशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.‘कप बशी’ हा चित्रपट दमदार कलाकार, अनुभवी तंत्रज्ञ आणि दर्जेदार संगीत यांचा संगम असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे.

Web Title: Major accident averted a big mishap occurred during the promotion of the film cupbashi but fortunately there was no loss of life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • Accident
  • marathi movie
  • Pooja Sawant

संबंधित बातम्या

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
1

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Dashami Movie Song : ‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत
2

Dashami Movie Song : ‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण
3

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण

पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध घेणार “अडकित्ता”! मराठी झी ५ वर लवकरच होणार प्रदर्शित
4

पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध घेणार “अडकित्ता”! मराठी झी ५ वर लवकरच होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.