Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Actress and Business : फक्त अभिनय नव्हे तर व्यवसायातही अव्वल! ‘या’ मराठी अभिनेत्री आहेत बिझनेसवूमन

मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री अभिनयासोबतच उद्योजक म्हणूनही यशस्वी ठरत आहेत. प्राजक्ता माळीच्या 'प्राजक्तासाज' आणि ऋतुजा बागवेच्या 'फूडचं पाऊल' नंतर आता श्रेया बुगडे-शेठ, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, रुचिता जाधव आणि निवेदिता सराफ यांनीही विविध क्षेत्रांत स्वतःचे ब्रँड उभे केले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 19, 2026 | 04:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

आपल्या अभिनयाने मराठी रंगमंच आणि सिनेसृष्टी गाजवणारे काही गोड चेहरे इतर क्षेत्रातही नाव गाजवत आहेत. काही मराठी अभिनेत्री एक यशस्वी व्यावसायिकादेखील आहेत. आपण आजवर अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ‘प्राजक्तासाज’ विषयी तसेच अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या ‘फूडचं पाऊल’ विषयी जाणून होतो. परंतु, अशा अनेक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत, ज्यांना व्यवसाय क्षेत्रातही मराठी झेंडा रोविला आहे. या अभिनेत्री व्यवसायिका कोण?

बिंज-वॉचिंगसाठी बेस्ट! क्राईम, सस्पेन्स आणि थराराचा तिहेरी डोस; JioHotstar वरील ‘या’ ५ वेबसीरिज अजिबात मिस करू नका

The Big Fish And Co.

अभिनेत्री श्रेया बुगडे-शेठ हिने उद्योजिका उज्ज्वल सामंत आणि यतीन खानोलकर यांच्या भागीदारीत The Big Fish & Co. या सीफूड रेस्टॉरंटची स्थापना केली. जानेवारी २०२४ मध्ये सुरू झालेल्या या रेस्टॉरंटमध्ये कोकणी, मालवणी, गोवन आणि विविध सीफूड पदार्थांची खास मेजवानी मिळते. दादर (पश्चिम) येथील शिवाजी पार्कजवळ, शिवसेना भवन मार्गावर असलेल्या या रेस्टॉरंटचा दोन व्यक्तींसाठी सरासरी खर्च सुमारे ₹२,००० इतका आहे.

Madame S

अभिनेत्री सई ताम्हणकरने २५ जून २०२४ रोजी तिच्या वाढदिवसानिमित्त Madame S हा स्वतःचा युनिसेक्स कपड्यांचा आणि मर्चेंडाइज ब्रँड लाँच केला. हा ब्रँड तिच्या व्यक्तिमत्त्वातून प्रेरित असून त्यामध्ये ओव्हरसाइज टी-शर्ट्स, हुडीज आणि टोट बॅग्ससारखी उत्पादने उपलब्ध आहेत. “Moving On”, “घ्या भडंग”, “चला” आणि “आवडेल ते बजेट” यांसारख्या खास डिझाइन्समुळे हा ब्रँड चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. सईच्या मते, Madame S हा केवळ कपड्यांचा ब्रँड नसून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि चाहत्यांशी अधिक जवळून जोडले जाण्याचा एक प्रयत्न आहे.

Amulya by Amruta

अभिनेत्री अमृता खानविलकरने Amulya by Amruta या नावाने स्वतःचा साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. महिला दिनानिमित्त २०२६ मध्ये लाँच झालेला हा ब्रँड तिच्या साड्यांवरील प्रेमातून आणि भारतीय हातमाग परंपरेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून साकार झाला आहे. या ब्रँडमध्ये पैठणी, जामदानी, शुद्ध रेशीम, ऑर्गेन्झा आणि इतर पारंपरिक हातमागाच्या साड्यांचा समावेश असून प्रत्येक साडी अमृता स्वतः निवडते. तिच्या मते, “Amulya” म्हणजे अमूल्य—प्रत्येक साडी ही केवळ वस्त्र नसून भावना, परंपरा आणि कारागिरांच्या कलेचा वारसा आहे.

Zing Stays

अभिनेत्री रुचिता जाधव हिने पती आनंद माने यांच्यासह Zing Stays या व्हिला आणि लक्झरी हॉलिडे होम रेंटल प्लॅटफॉर्मची सह-स्थापना केली आहे. हा ब्रँड महाराष्ट्रासह गोवा, जयपूर आणि उदयपूरसारख्या पर्यटनस्थळांवरील व्हिला, फार्महाऊस आणि लक्झरी स्टे बुकिंगची सुविधा पुरवतो. अभिनेत्री म्हणून यशस्वी कारकीर्दीनंतर रुचिताने उद्योजकतेकडे वळत हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात पाऊल टाकले असून, ती Zing Stays ची संचालक म्हणूनही कार्यरत आहे.

‘मला पुरुषांचा तिरस्कार वाटतो’; ‘इंडियाज गॉट लेटंट’ फेम साक्षी झा वादाच्या भोवऱ्यात, नोकरी गेल्याच्या चर्चांना उधाण

Hansagamini

अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी अभिनयासोबतच उद्योजक म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी Hansagamini या नावाने स्वतःचा साड्यांचा ब्रँड सुरू केला असून, या ब्रँडमध्ये पारंपरिक आणि डिझायनर साड्यांचा समावेश आहे. अनेक साड्यांची रचना त्या स्वतः करतात. कमी किमतीत दर्जेदार डिझायनर साड्या उपलब्ध करून देणे आणि महिला कारागिरांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा Hansagamini ब्रँडचा प्रमुख उद्देश आहे. विशेष म्हणजे या ब्रँडचे “Hansagamini” हे नाव त्यांचे पती, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी सुचवले होते.

Web Title: Marathi actress and their business

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • marathi actress

संबंधित बातम्या

‘तुझा- माझा संबंध काय? ‘रात्रीस खेळ चाले’च्या सेटवरील वाद चव्हाट्यावर; अपूर्वाच्या आरोपांना कृतिकाचं सडेतोड उत्तर
1

‘तुझा- माझा संबंध काय? ‘रात्रीस खेळ चाले’च्या सेटवरील वाद चव्हाट्यावर; अपूर्वाच्या आरोपांना कृतिकाचं सडेतोड उत्तर

Tarini Seial: ‘तारिणी’मध्ये नवा ट्विस्ट! कमिशनर जे.जे.च्या एंट्रीने तपासाला मिळणार नवं वळण; मानसी कुलकर्णीने उलगडलं भूमिकेचं गुपित
2

Tarini Seial: ‘तारिणी’मध्ये नवा ट्विस्ट! कमिशनर जे.जे.च्या एंट्रीने तपासाला मिळणार नवं वळण; मानसी कुलकर्णीने उलगडलं भूमिकेचं गुपित

‘भूमिकेची गरज असेल तर कपडे काढायला हरकत नाही..’, बोल्ड सीनवर ईशा केसकरने मांडली स्पष्ट भूमिका
3

‘भूमिकेची गरज असेल तर कपडे काढायला हरकत नाही..’, बोल्ड सीनवर ईशा केसकरने मांडली स्पष्ट भूमिका

‘नुकसान होण्यापेक्षा बाहेर पडणं..’, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका अचानक का सोडली? ईशा केसकरने अखेर सोडलं मौन
4

‘नुकसान होण्यापेक्षा बाहेर पडणं..’, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका अचानक का सोडली? ईशा केसकरने अखेर सोडलं मौन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.