Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: लहानपणी अनेकांनी देवाकडे ‘मला लवकर मोठं कर’ अशी इच्छा व्यक्त केली असेल. याच निरागस इच्छेभोवती लेखक-दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले यांनी ‘आली मोठी शहाणी’ हा नवा मराठी सिनेमा साकारला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 19, 2026 | 07:00 PM
Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर रिलीज; चिमुकलीच्या ‘मोठं होण्याच्या’ इच्छेभोवती कथा.
  • हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवर.
  • आनंद दिलीप गोखले दिग्दर्शित सिनेमा २ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार.
लहानपणी आपण सगळे नेहमीच असे म्हणायचो की, देवा प्लीज मला लवकर मोठं कर. परंतू हे असे कधीच झाले नाही, मात्र दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले यांनी एक असा चित्रपट आणला. त्यामध्ये चिमुकलीची ही इच्छा पूर्ण केली आहे. त्यानंतर होणारी गंमत या चित्रपटात सांगितली आहे.

‘आली मोठी शहाणी‘ हा नवीन मराठी सिनेमा येतोय. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर आला होता आणि तेव्हा पासूनच लोकांना उत्सुकता लागली होती. आता अखेर याचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि ट्रेलर पाहून ही उत्सुकता आणखी वाढली आहे. Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser:

ट्रेलरमध्ये नेमकं काय आहे?

ट्रेलरमध्ये दिसतंय की, एक चिमुकली गणपती बाप्पाकडे हट्ट करते की मला मोठं कर आणि तिची ही निरागस इच्छा आहे. पण या इच्छे भोवतीच सगळी गोष्ट फिरते. तिच्या या इच्छेमुळे तिच्या आयुष्यात असे काही गंमतीदार प्रसंग घडतात की पाहून हसू पण येतं आणि विचार करायला पण लावतात. तिची ही इच्छा पूर्ण होते का? आणि झाली तर पुढे काय होतं? हेच या ट्रेलरमध्ये थोडं थोडं दाखवलं आहे, पण पूर्ण गोष्ट सांगितली नाहीये. त्यामुळेच लोकांना आता सिनेमा कधी येतोय याची वाट लागली आहे.

पहिल्यांदाच हृता आणि सारंग एकत्र

या सिनेमाचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये ही जोडी प्रथमच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे त्यांच्या फॅन्समध्ये आधीपासूनच क्रेझ आहे. ट्रेलरमध्ये हृताची भूमिका खूपच फ्रेश वाटते. ती नेहमीप्रमाणे सुंदर दिसतेच, पण तिच्या अभिनयाची झलक पण या ट्रेलरमध्ये दिसते. सारंग साठ्ये तर कॉमेडीसाठी फेमस आहेच, पण या सिनेमात तो काय भूमिका करतोय हे पाहणं महत्वाचं ठरेल.

या दोघांचा त्या चिमुकलीशी काय संबंध आहे?

ते तिच्या इच्छेमुळे तिच्या आयुष्यात कसे येतात? हे सगळं सिनेमातच कळेल. पण ट्रेलरवरून तरी असं वाटतंय की या तिघांची केमिस्ट्री पडद्यावर धमाल करणार आहे.

दिग्दर्शक काय म्हणतो?

या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले यांनी केेले आहे. ते म्हणतात की, “आली मोठी शहाणी ची गोष्ट एकदम साधी आहे. एका छोट्या इच्छेतून सुरू होते. पण जशी जशी गोष्ट पुढे जाते तसे त्याचे वेगवेगळे रंग समोर येतात. लहान मुलं कसा विचार करतात, त्यांच्या मनात काय चालतं, त्यांच्या छोट्या इच्छा किती मोठ्या असतात हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या एका इच्छेभोवती कोणती गोष्ट घडते हे लोकांना थिएटरमध्ये येऊन बघावं लागेल.

Samay Raina On Nawazuddin: ‘नवाजने ड्रग्स घेतले, दारू प्यायली…’; समय रैनाचा नवाजुद्दीन सिद्दीकींबद्दल मोठा दावा

“निर्मात्यांना विश्वाससिनेमाच्या निर्मात्या ईशा मुठे आणि श्रुती साठे यांनी पण आपलं मत मांडलं. त्या म्हणाल्या, “या कथेचा साधेपणा हेच या सिनेमाचं खरं बलस्थान आहे. यात लहान मुलांचं विश्व आहे हे खरं आहे, पण मोठ्या माणसांना पण ही गोष्ट आपलीच वाटेल. कारण आपण सगळेच कधीतरी मोठं होण्याचं स्वप्न पाहिलं आहे.

हृता आणि सारंगची जोडी या सिनेमाला एक वेगळीच उंची देते. प्रेक्षकांना हा सिनेमा नक्की आवडेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.”हा सिनेमा फाईन ब्रू प्रोडक्शन्स आणि ट्रू होप फिल्म्स वर्क यांनी बनवला आहे. जयकुमार मुनोत, ईशा मुठे आणि श्रुती साठे यांनी याची निर्मिती केली आहे.

एकंदरीत काय तर लहान मुलांच्या विश्वावर आधारित पण मोठ्यांनाही विचार करायला लावणारा हा सिनेमा असणार आहे. ‘मला मोठं व्हायचंय’ ही इच्छा तर सगळ्यांचीच असते, पण ती पूर्ण झाल्यावर काय होतं हे पाहण्यासाठी 2 ऑक्टोबरची वाट पाहावी लागेल. त्या दिवशी हा सिनेमा सगळीकडे प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Aali mothi shahani marathi movie trailer hruta durgule sarang sathaye

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi actress
  • Marathi News

संबंधित बातम्या

Tata Sierra Legend Series लाँच; ₹11.99 लाखांपासून किंमत, प्रीमियम फीचर्सचा भर
1

Tata Sierra Legend Series लाँच; ₹11.99 लाखांपासून किंमत, प्रीमियम फीचर्सचा भर

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
2

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा
3

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा

Dadar Ganpati Visarjan: दादरच्या विसर्जनस्थळी गोंधळ? ‘VIP लोकांना वाट मोकळी, आम्हालाच अडवता’; VIDEO व्हायरल
4

Dadar Ganpati Visarjan: दादरच्या विसर्जनस्थळी गोंधळ? ‘VIP लोकांना वाट मोकळी, आम्हालाच अडवता’; VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.