Hrita Durgule: शाळेचा गणवेश, दोन वेण्या आणि खट्याळ हसू, (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सध्या ती ‘अगं आई अहो आई’ या वेब सिरीजमुळे चर्चेत आहे. झी ५ वर ही सिरीज आली आहे. यात तिच्यासोबत रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत आहेत. या सिरीजला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच हृताने तिच्या पुढच्या सिनेमाची बातमी दिली आहे आणि त्यामुळे चाहते एकदम खुश झाले आहेत.Hrita Durgule:
तिच्या नव्या सिनेमाचं नाव आहे ‘आली मोठी शहाणी’.हृताने स्वतः तिच्या इन्स्टाग्रामवर या सिनेमाचं पहिलं पोस्टर टाकलं आहे. पोस्टर बघूनच खूप धमाल वाटतेय. कारण यात हृता एकदम वेगळ्या रूपात दिसतेय.पोस्टरमध्ये ती शाळेच्या युनिफॉर्ममध्ये आहे. पांढरा शर्ट, टाय, दोन घट्ट वेण्या आणि चेहऱ्यावर एक निरागस पण खट्याळ हसू. अगदी शाळेतल्या चुणचुणीत मुलीसारखी दिसतेय ती.
Jui Gadkari post: ‘आमची म्हातारी आज ७०ची झाली असती…’ सायलीची पूर्णा आजीच्या आठवणीत भावूक पोस्ट
तिच्यासोबत अभिनेता सारंग साठ्ये आहे. त्याच्या कानावर जास्वंदीचं फूल आहे आणि तो हृताचे कान धरताना दिसतोय. हा फोटो इतका गमतीशीर आहे की बघताच हसू येतं. सिनेमा कसला असेल याची उत्सुकता या एका पोस्टरने वाढवली आहे.
View this post on Instagram
पोस्टर टाकताना हृताने एक छान कॅप्शन लिहिलं आहे. ती म्हणाली, लहान असो किंवा मोठा, आपण सगळेच बाप्पाकडे काहीतरी मागत असतो. आणि बाप्पा पण मोठ्या मनाने आपल्याला देतो. हा सिनेमा पण तसाच आहे, आपल्याच घरातली, हलकीफुलकी आणि गोड गोष्ट आहे असं तिने सांगितलं.आता सगळ्यांना प्रश्न पडलाय हा सिनेमा कधी येणार?तर ‘आली मोठी शहाणी’ हा सिनेमा २ ऑक्टोबर २०२६ ला सिनेमागृहात येणार आहे.
या सिनेमाचं दिग्दर्शन आनंद गोखले यांनी केलं आहे.या सिनेमात फक्त हृता आणि सारंगच नाहीत तर अजून बरेच ओळखीचे चेहरे आहेत. ऋजुता देशमुख, मैत्रयी दाते, सुहिता थत्ते, गुरू ठाकूर, विशाखा नाईक, प्रशांत कुलकर्णी असे बरेच चांगले कलाकार यात दिसणार आहेत.एकंदरीत, शाळेच्या आठवणींना उजाळा देणारा आणि पोट धरून हसवणारा असा हा सिनेमा असेल असं वाटतंय. हृताच्या या नव्या लूकने तर सगळ्यांची मनं जिंकली आहेतच.






