Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aarohi Season 24 : मुंबई होणार संगीतमय! उगवत्या सिताऱ्यांची मैफिल; ‘या’ तारखेला रंगणार संगीत सोहळा

Aarohi Season 24 : GRACE Foundation प्रस्तुत आणि पंचम निषाद यांच्या संकल्पनेतून ‘Aarohi - उगवत्या ताऱ्यांचा महोत्सव’चे आयोजन करण्यात आले असून यंदा हा महोत्सव २४व्या वर्षात पदार्पण करत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 19, 2026 | 03:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • Adya Mukherjee यांचे गायनही या संध्याकाळी आकर्षण ठरणार आहे.
  • तरुण कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे.
  • भारतीय शास्त्रीय संगीताच्या समृद्ध वारशाशी जोडणारा भावनिक आणि कलात्मक प्रवास असल्याचे सांगितले.
Aarohi Season 24 : GRACE Foundation प्रस्तुत आणि पंचम निषाद यांच्या संकल्पनेतून ‘Aarohi – उगवत्या ताऱ्यांचा महोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे पर्व 24 वे आहे. विशेष म्हणजे संगीत प्रेमींसाठी हा कार्यक्रम अगदी विनामूल्य आहे. 20 मे 2026 तसेच 21 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे हा सोहळा रंगणार आहे.

पी. एल. देशपांडे मिनी थिएटरमध्ये हा शो विनामूल्य पाहता येणार आहे. २००२ मध्ये ‘त्यांना लहानपणीच ओळखा’ या उद्देशाने सुरू झालेल्या या उपक्रमाने आजवर १३८ हून अधिक नवोदित कलाकारांना मोठ्या व्यासपीठावर सादरीकरणाची संधी दिली आहे. केवळ विद्यार्थी म्हणून नव्हे, तर स्वतंत्र कलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी ‘आरोही’ने अनेकांना प्रेरणा दिली आहे.

रणवीर सिंहला पाहून भारावली होती रकुल प्रीत सिंह; अभिनेत्रीने शेअर केली पहिल्या भेटीची खास आठवण

पहिल्या दिवशी शास्त्रीय गायन आणि संतूरवादनाच्या विविध छटा अनुभवायला मिळणार आहेत. Chaitanya Parab यांच्या गायनातून शास्त्रीय संगीताची प्रगल्भ परंपरा उलगडणार आहे. Divyansh Srivastava हे मुंबईत प्रथमच स्वतंत्र संतूरवादन सादर करणार असून ते पद्मविभूषण Pandit Bhajan Sopori यांचे शिष्य आहेत. त्यांच्या सादरीकरणातून सोपोरी सुफियाना घराण्याची दुर्मिळ शैली रसिकांना अनुभवता येईल. याशिवाय Adya Mukherjee यांचे गायनही या संध्याकाळी आकर्षण ठरणार आहे.

दुसऱ्या दिवशी विविध संगीत परंपरांचा सुरेल संगम पाहायला मिळेल. Swati Tiwari या ग्वाल्हेर आणि बनारस घराण्यांच्या परंपरेत घडलेल्या गायिका आहेत. Samyak Parasari यांच्या बासरीवादनातून श्रोत्यांना भावविश्वाशी जोडणारा अनुभव मिळणार आहे. महोत्सवाचा समारोप Abhed Abhisheki यांच्या गायनाने होईल. ते Pandit Shaunak Abhisheki यांचे पुत्र आणि पद्मश्री Pandit Jitendra Abhisheki यांचे नातू आहेत. या सर्व कलाकारांना यती भगवत, स्वप्निल भिसे, रोहित देव, मनोज सोलंकी, सुधांशू घारपुरे आणि ज्ञानेश्वर सोनवणे हे साथसंगत करणार आहेत.

Ata Thambvaych Kas? : तब्बल दशकानंतर रंगमंचावर झळकणार अभिनेत्री! गिरीश ओकांसोबत 30 वर्षांनी करणार नाटकाचे सादरीकरण

‘आरोही’ची खास ओळख

तरुण कलाकारांना योग्य वेळी, जाणकार रसिकांसमोर सादर होण्याची संधी देणे हे ‘आरोही’चे मुख्य वैशिष्ट्य आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ हा महोत्सव भारतीय शास्त्रीय संगीताच्या नव्या पिढीला प्रोत्साहन देत आहे. Shashi Vyas म्हणाले, “भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी तरुण कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे आणि ‘आरोही’ हीच भूमिका सातत्याने पार पाडत आहे.” कलाकारांनीही ‘आरोही’ला केवळ कार्यक्रम नसून भारतीय शास्त्रीय संगीताच्या समृद्ध वारशाशी जोडणारा भावनिक आणि कलात्मक प्रवास असल्याचे सांगितले.

Web Title: Aarohi season 24 at mumbai show for shining singing star

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Indian Classical Music
  • Indian Music

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.