Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉक्स ऑफिसवरील यशानंतर ‘सुपर डुपर’ लवकरच झी5 मराठीवर; निर्मिती सावंत यांनी शेअर केले ‘सेटवरील’ खास किस्से

या चित्रपटात ललित सोबत काम करताना झालेली मैत्री, सेटवरील मजेशीर प्रसंग आणि प्रँक्स याबद्दल अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी खास आठवणी शेअर केल्या आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: May 29, 2026 | 01:17 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

“सुपर डुपर” हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करून आता लवकरच ZEE5 मराठीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ललित यांच्यासोबत काम करताना झालेली मैत्री, सेटवरील मजेशीर प्रसंग आणि प्रँक्स याबद्दल अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी खास आठवणी शेअर केल्या आहेत.

“सुपर डुपर” चित्रपटात काम करण्यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे दिग्दर्शक विजय शिंदे यांच्यावर असलेला विश्वास असल्याचं निर्मिती सावंत यांनी सांगितलं आहे.त्या म्हणाल्या की विजय शिंदे यांना त्या त्यांच्या चॅनेलच्या काळापासून ओळखतात आणि त्यांचे ‘बापल्योक’सारखे उत्तम चित्रपटही त्यांनी पाहिले आहेत. त्यामुळे जेव्हा त्यांनी “सुपर डुपर”ची ऑफर दिली, तेव्हा भूमिका ऐकण्याआधीच त्यांना वाटलं की हा चित्रपट करायलाच हवा.नंतर स्क्रिप्ट ऐकल्यावर ती त्यांना खूप आवडली. लेखक, दिग्दर्शक आणि स्वतः त्यांनी मिळून त्या पात्रावर काम केलं, आणि हळूहळू फक्त भूमिका नाही तर संपूर्ण चित्रपटच त्यांना आवडू लागला.

निर्मिती सावंत यांनी सांगितलं की त्या स्वतः चाळ संस्कृतीत आणि संयुक्त कुटुंबात वाढलेल्या असल्यामुळे त्या चित्रपटातील वातावरणाशी सहज जोडल्या गेल्या.

छोट्या जागेत अनेक लोकांसोबत राहिल्यामुळे एकमेकांशी जुळवून घेणं, नात्यांमध्ये समजूतदारपणा ठेवणं आणि जोडलेलं राहणं हे शिकायला मिळतं, असं त्या म्हणाल्या. कुटुंबात मतभेद आणि भांडणं असली तरी कठीण काळात सगळे एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात, हीच गोष्ट सर्वात महत्त्वाची असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

त्यांच्या मते, अशा कुटुंबामुळे आयुष्यात कधीच एकटेपणा जाणवत नाही आणि हा भावनिक बंध कायम टिकतो. “सुपर डुपर”च्या शूटिंगदरम्यान हे सर्व प्रसंग अनुभवताना त्यांना स्वतःच्या बालपणाच्या आणि कुटुंबाच्या आठवणी ताज्या झाल्या, असंही त्यांनी सांगितलं.

निर्मिती सावंत यांनी सांगितलं की “सुपर डुपर”च्या संपूर्ण शूटिंगदरम्यान सेटवर खूप मजा-मस्ती आणि हलकंफुलकं वातावरण होतं. नामा, कुशल बद्रिके, शशांक आणि ललित यांच्यासोबत त्यांचं छान बॉन्डिंग झालं, पण विशेषतः ललितसोबत त्या जास्त जवळ आल्या कारण त्याच्यासोबत त्यांचं हे पहिलंच काम होतं.

ललित शांत आणि मृदू स्वभावाचा असला तरी त्याचा डाएटचा किस्सा सेटवर खूप चर्चेचा विषय होता. चित्रपटातील शर्टलेस सीनमुळे तो डाएटवर होता आणि इतर लोक जेवत असताना तो फक्त “तुम्ही खा, मी नंतर खातो” असं म्हणायचा, त्यामुळे सगळे त्याची मजा घेत असत.

परीक्षेचा निकाल ठरवणार ‘कमळी’चा पुढचा प्रवास; निकालाच्या दिवशी शिक्षणमंत्री विश्वंभर राजेशिर्केंची एन्ट्री, मालिकेत मोठा ट्विस्ट

सेटवर दोन मोठे प्रँकस्टर म्हणजे कुशल बद्रिके आणि ललित होते. कुशलची खोडकर वृत्ती लगेच लक्षात यायची, पण ललित मात्र त्याच्या निरागस चेहऱ्यामुळे संशय येऊ न देता शांतपणे खोड्या करत असे. तो कधी कधी गुपचूप मजेशीर गोष्टी बोलायचा आणि “हे कुणाला सांगू नका” असंही सांगायचा.

“सुपर डुपर”च्या शूटिंगदरम्यानचा पोलीस स्टेशनचा सीन हा सर्वात मजेशीर प्रसंगांपैकी एक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या सीनमध्ये सर्व कलाकार एकमेकांशी भांडण करत होते, पण सेटवर वातावरण इतकं हलकंफुलकं होतं की टेकदरम्यान हसू आवरणं कठीण जात होतं. बॅकग्राउंडमध्येही अनेक कलाकार हसू दाबण्याचा प्रयत्न करत होते, आणि विशेषतः ललितचे रिअॅक्शन्स खूपच मजेशीर होते, असं त्यांनी नमूद केलं. हा सीन पाहताना प्रेक्षकांनाही हे सहज लक्षात येईल, असं त्या म्हणाल्या.

सौरव गांगुली बायोपिकच्या सेटवरून Rajkummar Raoचा फर्स्ट लूक लीक; ‘दादा’चा अंदाज पाहून चाहते थक्क

चित्रपटाच्या ZEE5 मराठीवरील रिलीजबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, त्यांना वैयक्तिकरित्या चित्रपट थिएटरमध्येच पाहायला आवडतो, पण OTT मुळे प्रेक्षकांना आता त्यांच्या सोयीनुसार कोणताही चित्रपट पाहता येतो, ही खूप मोठी सकारात्मक बदल आहे.

पूर्वी थिएटरमध्ये रिलीज झालेला चित्रपट पुन्हा पाहणं कठीण असायचं, पण OTT मुळे चित्रपटांना “नवीन आयुष्य” मिळतं आणि ते अधिक मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात, असंही त्यांनी सांगितलं. “सुपर डुपर” आता ZEE5 वर अधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे याचा त्यांना विशेष आनंद आणि अभिमान असल्याचं त्यांनी व्यक्त केलं.

Web Title: After its box office success super duper is soon set to release on zee5 marathi nirmiti sawant shares special behind the scenes stories from the set

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

Dharau Marathi Movie: पाकिस्तानातही मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा डंका! अधिकृत टीझर प्रदर्शित, २६ पुरस्कारांचा मान
1

Dharau Marathi Movie: पाकिस्तानातही मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा डंका! अधिकृत टीझर प्रदर्शित, २६ पुरस्कारांचा मान

Gondhal Marathi Movie: ऑस्कर २०२७ मध्ये ऐतिहासिक झेप! होम्बळे फिल्म्सच्या माध्यमातून ‘गोंधळ’ चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार
2

Gondhal Marathi Movie: ऑस्कर २०२७ मध्ये ऐतिहासिक झेप! होम्बळे फिल्म्सच्या माध्यमातून ‘गोंधळ’ चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार

Kon Yashwant Pansare : भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री आमनेसामने! ‘कोण यशवंत पानसरे?’चा प्रीमियर कधी?
3

Kon Yashwant Pansare : भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री आमनेसामने! ‘कोण यशवंत पानसरे?’चा प्रीमियर कधी?

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
4

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.