Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bandkhor Marathi Movie: चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

Bandkhor Marathi Movie: चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले असून त्यात छाया कदम, प्रियदर्शनी इंदलकर, मृणाल कुलकर्णी, पूजा कातुर्डे, तितिक्षा तावडे आणि नित्यश्री ज्ञानलक्ष्मी या सहा अभिनेत्री आत्मविश्वासपूर्ण अंदाजात दिसत आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 31, 2026 | 07:00 PM
Bandkhor Marathi Movie: चेहऱ्यावर करारी भाव… (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Bandkhor Marathi Movie: चेहऱ्यावर करारी भाव… (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘बंडखोर’चं नवं पोस्टर चर्चेत
  • सहा अभिनेत्रींचा दमदार आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाज
  • अन्यायाविरोधात उभ्या राहणाऱ्या स्त्रियांची कथा
सहन करणं, गप्प राहाणं आणि परिस्थितीशी जुळवून घेणं… स्त्रीच्या वाट्याला आलेल्या या चौकटी आता मोडीत काढण्याची वेळ आली आहे. याच विषयावर भाष्य करणाऱ्या ‘बंडखोर’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. स्वतःसाठी उभं राहाण्याची, प्रश्न विचारण्याची आणि अन्यायाविरोधात बंड पुकारण्याची हिंमत दाखवणाऱ्या या सहा स्त्रिया ‘बंडखोर’च्या या पोस्टरमध्ये दिसत आहेत. या पोस्टरने चित्रपटाच्या आशयाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

बंडखोरी नेमकी कशा विरोधात?

पोस्टरमध्ये छाया कदम, प्रियदर्शनी इंदलकर, मृणाल कुलकर्णी, पूजा कातुर्डे, तितिक्षा तावडे आणि नित्यश्री ज्ञानलक्ष्मी या सहा जणी एका वेगळ्याच रुबाबात दिसत आहेत. त्यांच्यातील आत्मविश्वास त्यांच्या देहबोलीतून जाणवतो. त्यांची ही बंडखोरी नेमकी कशा विरोधात आहे, त्यांचा हा बेधडकपणा कुठून आला आणि त्यांच्या या वृत्तीमुळे कथेत काय घडणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच निर्माण झाली आहे.

वेगळा स्वभाव आणि बेधडक वृत्ती दाखवणारं हे पोस्टर

‘बंडखोर’ हे या सहा पात्रांच्या स्वभावाचीच ओळख असल्याचं पोस्टरवरून स्पष्ट होतं. अन्यायाविरोधात आवाज उठवणं, मनाविरुद्ध गोष्टींना ठामपणे नकार देणं आणि आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणं, ही या सहा जणींची वृत्ती आहे. त्यामुळे बंडखोरी हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग आहे. या सहा जणींचा वेगळा स्वभाव आणि बेधडक वृत्ती दाखवणारं हे पोस्टर चित्रपटाबद्दलचे कुतूहल वाढवत आहे. Bandkhor Marathi Movie:

Entertainment News: तीस वर्षांचा प्रवास आणि तीन नवे आवाज – पंचम निषादचा ‘वर्तमान’ पुन्हा रंगमंचावर

स्वभावातच एक स्पष्टपणा

दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात, “‘बंडखोर’मधल्या या सहा जणी केवळ पडद्यावरची पात्रं नाहीत, तर आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या अनेक स्त्रियांचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या स्वभावातच एक स्पष्टपणा आहे. चुकीचं वाटत असेल तर त्या त्याला विरोध करतात आणि स्वतःच्या आयुष्याबाबतचे निर्णय घेताना कुणाच्या परवानगीची वाट पाहात नाहीत. त्यांची ही बेधडक वृत्ती, त्यांचे वेगळे स्वभाव आणि आयुष्याकडे पाहाणयाचा त्यांचा दृष्टिकोन या सगळ्यामुळे ‘बंडखोर’ची गोष्ट माझ्यासाठी खूप खास आहे.”

Jui Gadkari post: ‘आमची म्हातारी आज ७०ची झाली असती…’ सायलीची पूर्णा आजीच्या आठवणीत भावूक पोस्ट

संजय शेटये, विनसन ग्राफिक प्रोडक्शन निर्मित आणि सत्यसाई फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे संवाद लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. या सहा ‘बंडखोर’ स्त्रियांची गोष्ट येत्या २४ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Web Title: Bandkhor marathi movie new poster featuring six powerful women sparks curiosity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली
1

शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली

Sumo Didi Trailer Released: रूढींच्या आखाड्यात जिद्दीची कुस्ती! ‘सुमो दीदी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
2

Sumo Didi Trailer Released: रूढींच्या आखाड्यात जिद्दीची कुस्ती! ‘सुमो दीदी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Early Throat Cancer: ६८ वर्षीय रुग्णाला दुर्मिळ कर्करोगाचे निदान; आधुनिक शस्त्रक्रियेतून मिळाला दिलासा
3

Early Throat Cancer: ६८ वर्षीय रुग्णाला दुर्मिळ कर्करोगाचे निदान; आधुनिक शस्त्रक्रियेतून मिळाला दिलासा

Jaw Cancer Surgery: “कर्करोगामुळे जबडा काढला… मग तो पुन्हा कसा तयार करतात? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात..
4

Jaw Cancer Surgery: “कर्करोगामुळे जबडा काढला… मग तो पुन्हा कसा तयार करतात? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.