Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनातील गुंतागुंत वाढवणारा ‘दृश्य-अदृश्य’ चित्रपटाचा टीझर रिलीज; ‘इफ्फी’नंतर आता महाराष्ट्रात उत्सुकता शिगेला

५६व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव (IFFI) मध्ये या चित्रपटाने जागतिक स्तरावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आता नुकताच प्रदर्शित झालेला टीझर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: May 19, 2026 | 11:24 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी सिनेसृष्टीत वेगळ्या धाटणीच्या आणि आशयघन चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या परंपरेत आणखी एक महत्त्वाची भर पडत आहे. “आपल्या डोळ्यांना दिसतं ते खरं की मनात निर्माण होणारे भास?” या अनाकलनीय प्रश्नाभोवती फिरणारा ‘दृश्य-अदृश्य’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी कथा, दमदार अभिनय आणि कुशल दिग्दर्शन यांचा संगम असलेला हा चित्रपट १९ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, ५६व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव (IFFI) मध्ये या चित्रपटाने जागतिक स्तरावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आता नुकताच प्रदर्शित झालेला टीझर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

आरएसटी कॅनव्हास निर्मित ‘दृश्य-अदृश्य’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची निर्मिती प्रद्योत पेंढारकर, अनिल वर्खडे, दत्ताजी थोरात, धनंजय थोरात, पृथ्वीराज खेडकर, युवराज खेडकर आणि अश्विनी खेडकर यांनी केली आहे. आजवर बऱ्याच आशयघन यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या मिलिंद लेले यांनी ‘दृश्य-अदृश्य’चे दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शनासोबतच ‘दृश्य-अदृश्य’चे कथा-पटकथा लेखन मिलिंद लेले यांनीच केले असून, संवाद अस्मिता कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. ‘जे दिसतं तेच खरं असतं का?’ हा प्रश्न विचारत ‘दृश्य अदृश्य’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. ‘२५ लाख रुपयांच्या इन्सेन्टिव्हचं सिक्रेट’ टिझरमधील रहस्य आणखी गडद करणारे असून, चित्रपटाबाबत कुतूहल जागविणारं आहे. ‘डोळ्यांवर विश्वास ठेवायचा की मनावर?’ हा प्रश्न उपस्थित करीत ‘दृश्य अदृश्य’चा टिझर मनातील गुंतागुंत आणखी वाढवतो. भास आणि सत्य यात खूप मोठं अंतर असल्याचे टिझर अधोरेखित करतो. ‘माणूस ओळखणं कठीण की सत्य?’ हा टिझरमध्ये विचारलेला प्रश्नही खोलवर विचार करायला लावतो. ‘दृश्य-अदृश्य’चा टिझर खऱ्या अर्थाने चित्रपटाबाबत उत्सुकता वाढविणारा असून, प्रदर्शनानंतर लगेचच सोशल मीडियावर टिझरला नेटकऱ्यांचा तूफान प्रतिसाद मिळत आहे.

Deool Band 2: ‘… तर माझं ‘देऊळ कायमचं बंद’! ‘देऊळ बंद २’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज; आता होणार थेट देवाची परीक्षा!

चित्रपटात कोणते कोणते कलाकार?

मुख्य भूमिकेतील अभिनेत्री पूजा सावंत या चित्रपटात आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा अतिशय वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. पूजाच्या जोडीला अशोक समर्थ, सुव्रत जोशी, हार्दिक जोशी, अक्षया गुरव, विद्याधर जोशी, केया इंगळे आदी तगड्या कलाकारांची फळी आहे. गीतकार वलय मुळगुंद यांच्या गीतरचना संगीतकार आशिष मुजुमदार, देवदत्त बाजी यांनी गायिका प्रियांका बर्वे आणि निधी हेगडे यांच्या आवाजात संगीतबद्ध केल्या आहेत. नृत्य दिग्दर्शन दीपक देबनाथ यांनी केले असून, नितिन बोरकर यांनी कला दिग्दर्शन केले आहे. अमोल साळुंके यांनी छायाचित्रण केले असून, सचिन वाघ यांनी संकलन केले आहे. महेश बराटे यांची रंगभूषा, तर किर्ती जंगम-जोशी यांची वेशभूषा आहे.

Salman Khanच्या व्हायरल पोस्टमागचं अखेर सत्य समोर; ‘मम्मी पूछ रही हैं…’ म्हणत सांगितली फोटोमागची खरी गोष्ट

Web Title: Dhrushya adrushya teaser released intensifying psychological intrigue after iffi recognition anticipation peaks in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • Pooja Sawant

संबंधित बातम्या

Bhootam Bhayam Movie: ‘भूतम भय्यम’च्या कलाकारांमध्ये असं तयार झालं बॉन्डिंग; दिग्दर्शकांनी सांगितला २५ दिवसांच्या वर्कशॉपचा किस्सा
1

Bhootam Bhayam Movie: ‘भूतम भय्यम’च्या कलाकारांमध्ये असं तयार झालं बॉन्डिंग; दिग्दर्शकांनी सांगितला २५ दिवसांच्या वर्कशॉपचा किस्सा

Miranda Warning movie: जान्हवी किल्लेकरचा ‘मिरांडा वॉर्निंग’मधील लूक पाहिलात का? एका नजरेने वाढवलं रहस्य, नेमकी भूमिका काय?
2

Miranda Warning movie: जान्हवी किल्लेकरचा ‘मिरांडा वॉर्निंग’मधील लूक पाहिलात का? एका नजरेने वाढवलं रहस्य, नेमकी भूमिका काय?

Gondhal Movie on Oscar: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी रंगणार! ९ ऑक्टोबरपासून देशभरातील ‘या’ ६ शहरांत खास शो
3

Gondhal Movie on Oscar: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी रंगणार! ९ ऑक्टोबरपासून देशभरातील ‘या’ ६ शहरांत खास शो

Dharau Marathi Movie: गोमातेच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘धाराऊ’चं मोशन पोस्टर रिलीज , ‘या’ दिवशी होणार रिलीज
4

Dharau Marathi Movie: गोमातेच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘धाराऊ’चं मोशन पोस्टर रिलीज , ‘या’ दिवशी होणार रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.