Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पतीने Kiss केलं तर चालेल पण…,’ इंटिमेट सीनवर ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्रीची स्पष्ट भूमिका

'तारक मेहता' फेम अभिनेत्री सिंपल कौलने इंटीमेट आणि किसिंग सीनबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "किस चालेल, पण अफेअर अजिबात नाही," असे म्हणत तिने नात्यातील विश्वास आणि निष्ठेवर भर दिला.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 03, 2026 | 12:47 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Simple Kaul on husband kissing scene: चित्रपट आणि मालिकांमध्ये किस किंवा जिव्हाळ्याच्या दृश्यांचे चित्रीकरण हा अभिनयाचा एक भाग असतो. मात्र, अशा दृश्यांमुळे अनेकदा कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा रंगते. अशातच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री सिंपल कौल हिने इंटीमेट आणि किसिंग सीनबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

एका विशेष मुलाखतीत बोलताना सिंपल कौल म्हणाली, “जर एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री किसिंग सीन किंवा इतर जिव्हाळ्याचे दृश्य करत असेल, तर ते फक्त त्यांच्या कामाचा भाग आहे. माझ्या पतीने किंवा जोडीदाराने व्यावसायिक गरज म्हणून असे दृश्य केले, तर मला त्यात कोणतीही अडचण नाही.”

मात्र, तिने विवाहबाह्य संबंधांबाबत ठाम भूमिका घेतली. “पडद्यावरील इंटीमेट सीन आणि वास्तविक आयुष्यातील नातेसंबंध यात खूप मोठा फरक आहे. जर जोडीदाराने विवाहबाह्य संबंध ठेवले, तर ते मी कधीही स्वीकारणार नाही,” असे तिने स्पष्ट केले.

नात्यातील विश्वास आणि निष्ठा यावर भर देताना सिंपल म्हणाली, “फसवणूक म्हणजे फसवणूकच. त्याची दुसरी कोणतीही व्याख्या असू शकत नाही. जर दोन व्यक्ती प्रेमात असतील, तर त्यांनी एकमेकांशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिले पाहिजे.”

Veen Doghantali Hi Tutena:  तुमचं लग्न ६ महिन्यांत मोडणार!’ अंशुमनचं स्वानंदीला थेट चॅलेंज; समर-स्वानंदीच्या नात्यात मोठा ट्विस्ट

तिने पुढे सांगितले की, जर एखाद्याला दीर्घकालीन वचनबद्ध नातं नको असेल, तर ते सुरुवातीलाच स्पष्टपणे सांगितले पाहिजे. नात्यात बदल किंवा दुसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू लागल्यास ते लपवण्याऐवजी जोडीदाराशी प्रामाणिकपणे संवाद साधणे महत्त्वाचे आहे. मात्र, फसवणूक करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही, असेही तिने नमूद केले.

Lock Upp 2 Viral Video: ‘ब्लँकेटच्या आत ये..’, योगेश-आकांक्षाच्या व्हायरल व्हिडिओने रंगली चर्चा; ब्रेकअपनंतर पुन्हा वाढली जवळीक?

कामाच्या आघाडीवर सिंपल कौलने ‘कुटुंब’, ‘शरारत’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘ओये जस्सी’, ‘यम हैं हम’, ‘दिल्ली वाली ठाकूर गर्ल्स’ आणि ‘जिद्दी दिल माने ना’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

Web Title: Kiss is fine but an affair is absolutely not taarak mehta fame simple kaul shares her clear stand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Actress
  • tv serial

संबंधित बातम्या

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
1

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
2

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.