Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Frame Movie Review: ‘घटना चांगली असो किंवा वाईट…फोटो चांगलाच आला पाहिजे’; पत्रकारितेच्या नैतिकतेवर भाष्य करणारा ‘फ्रेम’ कसा आहे?

Frame Movie Review: नागराज मंजुळे आणि अमेय वाघ यांच्या 'फ्रेम' चित्रपटाचा रिव्ह्यू वाचा. पत्रकारितेतील नैतिकता, मानवी संवेदना, दमदार अभिनय आणि भावनिक क्लायमॅक्समुळे हा चित्रपट का पाहावा, जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 10, 2026 | 08:23 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नागराज मंजुळे आणि अमेय वाघ यांचा दमदार अभिनय
  • भावनिक आणि विचार करायला भाग पाडणारा क्लायमॅक्स
  • वास्तववादी मांडणी आणि प्रभावी छायाचित्रण
बातमी आधी की माणूस आधी? कॅमेऱ्याने प्रत्येक क्षण टिपायचा की गरज पडल्यास मदतीचा हात द्यायचा? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणारा ‘फ्रेम’ हा चित्रपट पत्रकारितेतील व्यावसायिकता आणि मानवी संवेदनांमधील संघर्ष प्रभावीपणे पडद्यावर मांडतो.

नागराज मंजुळे यांचा ‘फ्रेम’ हा सिनेमा १० जुलैपासून ZEE5 वर प्रदर्शित झाला आहे. दोन वेगवेगळ्या पिढ्यांतील फोटो जर्नलिस्टच्या आयुष्याभोवती फिरणारा हा चित्रपट विक्रम पटवर्धन यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. स्वतः माजी फोटो जर्नलिस्ट असल्याने त्यांनी पत्रकारितेतील वास्तव अत्यंत प्रामाणिकपणे पडद्यावर उभे केले आहे.

चित्रपटाची सुरुवात विविध घटनांच्या छायाचित्रांनी होते. त्याचवेळी सिद्धार्थ (अमेय वाघ)चा आवाज ऐकू येतो. “प्रेस फोटोग्राफरचं आयुष्य म्हणजे घटनांनी भरलेलं आयुष्य… चांगली घटना, वाईट घटना, मोठी घटना, छोटी घटना… पण काही घटना अशा असतात, ज्या स्वीकारणं खूप कठीण असतं.” या संवादातूनच चित्रपटाचा आशय स्पष्ट होतो.

यानंतर एन्ट्री होते अनुभवी फोटो जर्नलिस्ट चंदू पानसरे उर्फ सीपी (नागराज मंजुळे) यांची. त्यांच्याकडे इंटर्नशिपसाठी आलेल्या नवख्या फोटोग्राफर्समध्ये सिद्धार्थही असतो. पहिल्याच दिवशी त्याला घटनास्थळी पाठवले जाते. त्याने टिपलेले फोटो सर्वांना प्रभावित करतात, मात्र त्याचवेळी त्याला दुखापतही होते. चंदू त्याला एक महत्त्वाचा धडा देतो—“सुट्टी असली तरी कॅमेरा सोबत ठेवायचा.” या एका वाक्यात फोटो जर्नलिस्टचं संपूर्ण आयुष्य सामावलेलं आहे.

चित्रपटात पुढे रागिणी (अक्षया गुरव)ची एन्ट्री होते. सिद्धार्थ आणि रागिणीची मैत्री हळूहळू फुलताना दिसते. त्याचवेळी चंदूच्या वैयक्तिक आयुष्यातील वेदनाही समोर येतात. कुटुंबापासून दूर राहण्याची खंत, मुलीला भेटण्याची धडपड आणि व्यावसायिक आयुष्याचा त्याच्या मानसिकतेवर झालेला परिणाम चित्रपट संवेदनशीलतेने दाखवतो.

चित्रपटाचा सर्वात प्रभावी भाग म्हणजे चंदू पानसरेला मिळणारा ‘सर्वोत्कृष्ट फोटो जर्नलिस्ट’ पुरस्कार. पुरस्कार स्वीकारताना तो म्हणतो, “घटना चांगली असो किंवा वाईट… फोटो चांगलाच आला पाहिजे.” हा संवाद चित्रपटाचा आत्माच ठरतो.

Angre Marathi Movie : मराठा आरमाराचा इतिहास झळकणार मोठ्या पडद्यावर! सरखेल कान्होजीराजेंवर सिनेमा येतोय…’आंग्रे’

मात्र, पुरस्कारप्राप्त फोटोवरील पडदा हटताच कथेला जबरदस्त कलाटणी मिळते. तो फोटो नेमका कोणाचा असतो? तो पाहिल्यानंतर सिद्धार्थ हादरून जातो आणि चंदूला जाब विचारतो. यानंतर दोघांमधील संघर्ष अधिक तीव्र होत जातो. पुढे काय घडतं? हा प्रश्न चित्रपट पाहिल्यानंतरच उलगडतो.

चित्रपटात  प्रेक्षकांना एक अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळेल. हा ट्विस्ट केवळ कथेचा शेवट करत नाही, तर पत्रकारितेच्या नैतिकतेबाबत अनेक प्रश्नही उपस्थित करतो.

चित्रपटाच्या शेवटी आणखी एक प्रभावी ट्विस्ट पाहायला मिळतो. सिद्धार्थला फोटो जर्नलिझममधील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर होतो. हा पुरस्कार स्वीकारताना तो आपल्या सीपी सरांना समर्पित करतो. मात्र, पुरस्कारप्राप्त फोटो कोणता हे चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल.

Zee Marathi Serial: ‘दीपज्योती’ आणि ‘शुभ श्रावणी’मध्ये येणार मोठे ट्विस्ट; नात्यांची होणार कठीण परीक्षा

काय खटकतं?

चित्रपटाचा विषय गंभीर असल्याने काही ठिकाणी गती संथ वाटते. मनोरंजनाची अपेक्षा ठेवणाऱ्या प्रेक्षकांना हा चित्रपट थोडा संथ वाटू शकतो. मात्र, आशयाच्या दृष्टीने ही संथ गती कथेला आवश्यक ठरते.

चित्रपटातील स्टार कास्ट

चित्रपटात नागराज मंजुळे, अमेय वाघ, मुग्धा गोडसे आणि अक्षया गुरव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नागराज मंजुळे यांनी वरिष्ठ छायाचित्रकार चंदू पानसरे, अमेय वाघ यांनी सिद्धार्थ देशमुख, अक्षया गुरव यांनी पत्रकार रागिणी, तर मुग्धा गोडसे यांनी चंदू पानसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

‘फ्रेम’ हा केवळ एका फोटो जर्नलिस्टची कथा नाही, तर प्रत्येक पत्रकार, छायाचित्रकार आणि संवेदनशील माणसाला पडणाऱ्या नैतिक प्रश्नांचा आरसा आहे. बातमीच्या मागे असलेला माणूस आणि एका ‘फ्रेम’ची किंमत काय असते, याचा विचार करायला लावणारा हा चित्रपट नक्की पाहावा.

Web Title: Frame movie review a tale of journalism humanities and powerful performance is frame worth watching read the review

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Amey Wagh
  • marathi movie
  • Nagraj Manjule

संबंधित बातम्या

बदलत्या नात्यांची गोष्ट सांगणाऱ्या ‘डिंक्स’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात! प्राजक्ता माळीचा नवा लूक चर्चेत
1

बदलत्या नात्यांची गोष्ट सांगणाऱ्या ‘डिंक्स’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात! प्राजक्ता माळीचा नवा लूक चर्चेत

Pach Futacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ कोण? अखेर नाव आलं समोर;अभिनेत्रीची नाटकातून सिनेसृष्टीत दमदार एंट्री
2

Pach Futacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ कोण? अखेर नाव आलं समोर;अभिनेत्रीची नाटकातून सिनेसृष्टीत दमदार एंट्री

Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीचे ‘मामा’ अशोक सराफ यांचा नागपुरात नागरी सत्कार; मुख्यमंत्र्यांनी केला गौरव
3

Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीचे ‘मामा’ अशोक सराफ यांचा नागपुरात नागरी सत्कार; मुख्यमंत्र्यांनी केला गौरव

Marathi Movie : नोटांचा पाऊस, पैशांच्या मागे धावणारी माणसं अन्..; ‘अफरातफरी’चा मोशन पोस्टर पाहिलात का?
4

Marathi Movie : नोटांचा पाऊस, पैशांच्या मागे धावणारी माणसं अन्..; ‘अफरातफरी’चा मोशन पोस्टर पाहिलात का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.