
Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
अमोल परचुरेच्या ‘कॅच अप’ या शोमध्ये मुक्ता बर्वे आली होती. तिथे तिला थेट विचारलं, मुंबई पुणे मुंबई 4 येणार आहे का? त्यावर मुक्ता हसली आणि म्हणाली, हो, आम्हाला पण सांगितलंय की हा चित्रपट येणार आहे.मग तिला विचारलं शूटिंग सुरू झालं का? त्यावर तिने सांगितलं की नाही, अजून शूटिंग सुरू नाही झालं. पण स्क्रिप्टवर जबरदस्त काम सुरू आहे. मला अजून पूर्ण स्क्रिप्ट वाचायला मिळाली नाही, पण थोडीफार आयडिया आहे की पुढे काय होणार आहे.ती म्हणाली, हा चित्रपट व्हायलाच हवा. सगळ्यांचीच इच्छा आहे. निर्मात्यांशी आमचं बोलणं झालंय. स्क्रिप्टचं काम चालू आहे. माझ्याकडे जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला दिली. आता शूटिंग कधी सुरू होईल आणि रिलीज कधी होईल हे आत्ताच सांगणं कठीण आहे.तिचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
15 वर्षांचा प्रवास’मुंबई पुणे मुंबई’ ला आता 15 वर्ष झाली. सतीश राजवाडेने हा सिनेमा दिग्दर्शित केला होता आणि संजय छाबरिया आणि अमित भानुशाली यांनी प्रोड्यूस केला होता.पहिला भाग 2010 ला आला. गोष्ट साधी होती. मुंबईची मॉडर्न गौरी आणि पुण्याचा गायक गौतम एका लग्नासाठी दोघेही मुंबई ते पुणे प्रवास करतात.
सुरुवातीला भांडणं, टोमणे आणि मग हळूहळू प्रेमात पडतात. या सिनेमाचे डायलॉग आणि गाणी लोकांच्या तोंडावर होती.त्यानंतर 2015 ला दुसरा भाग आला. त्यात गौरी आणि गौतमच्या लग्नानंतरची गोष्ट दाखवली. लग्न झाल्यावर येणारे प्रॉब्लेम, फॅमिली ड्रामा, नात्यातले चढ-उतार हे सगळं दाखवलं. तो पण सुपरहिट झाला.
2018 ला तिसरा भाग आला. त्यात सगळ्यात गोड गोष्ट होती. गौरी आणि गौतम आई-बाबा होणार होते. त्यांना जुळी मुलं होतात हे दाखवलं. प्रेक्षकांनी त्याला पण खूप प्रेम दिलं.आता चौथ्या भागात काय दाखवणार? गौरी-गौतमची मुलं मोठी झाली असतील का?
त्यांच्या संसारात नवीन काय ट्विस्ट येणार? मध्यमवयीन जोडप्याची गोष्ट असणार का? याचीच उत्सुकता सगळ्यांना आहे.स्वप्नील आणि मुक्ताची केमिस्ट्री हेच या सिनेमाचं सगळ्यात मोठं यश आहे. त्यामुळे चौथा भाग येणार हे ऐकूनच चाहते खूश आहेत. फक्त आता वाट बघायची आहे की सतीश राजवाडे आणि टीम शूटिंग कधी सुरू करते आणि हा सिनेमा कधी थिएटरमध्ये येतो.