Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वप्नील जोशीच्या घरी आली लक्झरी Tesla! व्हिडिओ शेअर करत दाखवली नव्या गाडीची झलक; किंमत ऐकून व्हाल थक्क

Swapnil Joshi New Car: लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशीने इतक्या किमतीची Tesla Model YL इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत नव्या लक्झरी कारची झलक पाहायला मिळत असून चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 17, 2026 | 09:53 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Swapnil Joshi New Tesla Car:  मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशीने आपल्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. स्वप्नीलने टेस्ला (Tesla) कंपनीची आलिशान इलेक्ट्रिक कार खरेदी केली असून, सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत नव्या गाडीची पहिली झलक दाखवली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

स्वप्नील जोशी त्याच्या कुटुंबीयांसह नवी कोरी कार खरेदी करण्यासाठी गेला होता. ही पोस्ट शेअर करताना त्याने त्याच्या भावना वक्त केल्या आहेत. त्याने पोस्टमध्ये लिहिले, “मी लहान होतो तेव्हा माझे बाबा सायकल चालवायचे. त्यांना पाहताना एक दिवस माझ्याकडेही जगातील सर्वोत्तम सायकल असावी, असं स्वप्न मी पाहायचो. पण नशिबाने माझ्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं आणि ते स्वप्न काळाच्या ओघात मागे पडलं. काही वर्षांनंतर लोक या कारला जगातील सर्वोत्तम कार म्हणू लागले आणि आज तीच कार माझ्या घरी आणण्याचं भाग्य मला लाभलं,”

स्वप्नील पुढे म्हणाला, “ही गाडी अमेरिकन आहे किंवा महागडी आहे म्हणून मी ती घेतलेली नाही. माझ्यासाठी ती भविष्याचं प्रतीक आहे आणि आज भारतात राहूनही ती अभिमानाने खरेदी करता येते, हीच मोठी गोष्ट आहे. मात्र, या कारपेक्षाही मोठा आनंद म्हणजे माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यांतील अभिमान, माझ्या मुलांच्या नजरेत त्यांच्या वडिलांबद्दल निर्माण झालेला आदर आणि माझ्या पत्नीच्या चेहऱ्यावरचं समाधान. तेच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहे. वेलकम होम, Tesla… कारण स्वप्नं नेहमी आपण जशी कल्पना करतो तशी पूर्ण होत नाहीत; कधी कधी ती आपल्या कल्पनेपलीकडच्या सुंदर पद्धतीने पूर्ण होतात.”


‘नुकसान होण्यापेक्षा बाहेर पडणं..’, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका अचानक का सोडली? ईशा केसकरने अखेर सोडलं मौन

स्वप्नीलचे कार कलेक्शन
स्वप्नीलकडे रेंज रोव्हर डिफेंडर देखील आहे. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात स्वप्नीलने ही कार खरेदी केली होती. दरम्यान तीन वर्षांपूर्वी अभिनेत्याने जॅग्वार ही अलिशानही खरेदी केली होती.

Fauzi Release Date: ‘अज्ञातपर्व’ संपले! प्रभासच्या ‘फौजी’च्या रिलीज डेटची घोषणा, बॉक्स ऑफिसवर चार बड्या स्टार्समध्ये होणार टक्कर

Tesla Model YL ची किंमत किती?

स्वप्नील जोशीने खरेदी केलेल्या Tesla Model YL या इलेक्ट्रिक कारची किंमत सुमारे ६५ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. उत्कृष्ट परफॉर्मन्स, लांब पल्ल्याची बॅटरी रेंज आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे Tesla Model YL ही जगभरातील लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV पैकी एक मानली जाते.

स्वप्नील जोशीच्या या नव्या लक्झरी कारची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, त्याचा व्हिडिओ चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.

 

Web Title: Swapnil joshi buys 65 lakh tesla model yl actor gives a glimpse of his new luxury ev in viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Swapnil Joshi
  • Tesla Car

संबंधित बातम्या

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
1

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
2

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
3

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.