Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tumbadchi Manjula OTT Release: ‘तुंबाडची मंजुळा’चा ZEE5 वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर; ‘या’ दिवसापासून पाहता येणार ब्लॉकबस्टर चित्रपट

Tumbadchi Manjula OTT Release: जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, ओम भुतकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'तुंबाडची मंजुळा' हा गाजलेला मराठी चित्रपट ७ ऑगस्टपासून ZEE5 वर डिजिटल प्रीमियर होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 03, 2026 | 03:05 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Tumbadchi Manjula OTT Release: यंदाच्या वर्षातील गाजलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक ठरलेला ‘तुंबाडची मंजुळा’ आता घरबसल्या पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटगृहात प्रेक्षक आणि समीक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवल्यानंतर या चित्रपटाचा ७ ऑगस्ट रोजी मराठी ZEE5 वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.

दिग्दर्शक विविध कोरगावकर यांच्या दिग्दर्शनाखाली आणि झी स्टुडिओच्या निर्मितीत साकारलेल्या या चित्रपटात जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर आणि उषा नाडकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Shraddha Kapoor Followed Marathi Actress: श्रद्धाने ‘या’ मराठी अभिनेत्रीला इंस्टाग्रामवर केलं फॉलो; पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

काय आहे ‘तुंबाडची मंजुळा’ची कथा?

चित्रपटातील केशव हे पात्र स्वतःला मंजुळा नावाच्या महिलेच्या आत्म्याने झपाटल्याचं खोटं सांगतो. त्यानंतर गावभर सुरू होतो गोंधळ, अफवा, अंधश्रद्धा आणि अनपेक्षित घटनांचा सिलसिला. विनोद, रहस्य, भय आणि भावनिक प्रसंगांचा सुरेख मेळ साधत हा चित्रपट अंधविश्वास, सामाजिक पूर्वग्रह आणि मानवतेचा संदेश देतो.

‘तुंबाडची मंजुळा’ का ठरला खास?

२०२६ मधील गाजलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक ठरलेल्या या सिनेमात भय, विनोद आणि भावनिक कथानकाचा उत्तम संगम पाहायला मिळतो. दमदार कलाकारांचा अभिनय आणि वेगळा विषय यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

Actor in Old Age Home: थलपती विजयसोबत झळकलेला अभिनेत्याची दयनीय अवस्था; औषधांसाठीही नाहीत पैसे, वृद्धाश्रमात राहण्याची वेळ

कलाकारांनी व्यक्त केला आनंद

दिग्दर्शक विविध कोरगावकर म्हणाले, “प्रेक्षकांचं मनोरंजन करतानाच समाजातील श्रद्धा आणि समजुतींवर भाष्य करणारा चित्रपट बनवण्याचा आमचा प्रयत्न होता. थिएटरमध्ये मिळालेलं प्रेम आता ZEE5 च्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचेल, याचा आनंद आहे.”

जितेंद्र जोशी म्हणाले, “केशव हे पात्र एका छोट्या खोट्यामुळे मोठा गोंधळ निर्माण करतं. थिएटरमधील प्रतिसाद अविस्मरणीय होता. आता हा चित्रपट डिजिटल माध्यमातून अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.”

तर सई ताम्हणकर म्हणाल्या, “‘तुंबाडची मंजुळा’मध्ये विनोद, भय आणि भावना यांचा सुंदर मिलाफ आहे. ही कथा मनोरंजनासोबत विचार करायलाही भाग पाडते. ZEE5 वर कुटुंबासोबत हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना नक्कीच आनंद मिळेल.”

भूत, गोंधळ, विनोद आणि भावनांनी भरलेला हा भन्नाट प्रवास अनुभवण्यासाठी ७ ऑगस्टपासून ‘तुंबाडची मंजुळा’ फक्त मराठी ZEE5 वर पाहता येणार आहे.

Web Title: Tumbadchi manjula ott release zee5 world digital premiere 7 august marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • Sai Tamhankar

संबंधित बातम्या

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
1

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे
2

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
3

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
4

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.