Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prasad Oak: ‘उद्धव ठाकरे माझी वाट बघत उभे होते..’, धर्मवीर’मधील भूमिकेबद्दल प्रसाद ओकने सांगितला तो खास किस्सा

Prasad Oak: ‘धर्मवीर’मधील आनंद दिघेंच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे चक्क रस्त्यावर प्रसाद ओकची वाट बघत उभे होते; “तू आल्याशिवाय मला तुझं कौतुक करायचं नव्हतं”, अभिनेत्याने सांगितला खास किस्सा

  • By अमृता यादव
Updated On: Aug 17, 2026 | 03:15 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Prasad Oak:अभिनेता प्रसाद ओक आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. ‘धर्मवीर’ या चित्रपटात त्याने शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली. आनंद दिघे यांच्यासारखी केलेली वेशभूषा, देहबोली, संवादफेक आणि अभिनय यामुळे प्रसाद ओकने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रसाद ओकने ‘धर्मवीर’च्या आठवणींना उजाळा देताना उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित एक खास किस्सा सांगितला आहे.

“भीती वाटली असती तर मी कलाकार झालोच नसतो”

‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद ओकला ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघे यांच्या भूमिकेमुळे राजकीयदृष्ट्या काही अडचणींचा सामना करावा लागला का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रसादने स्पष्टपणे आपली भूमिका मांडली.

“मी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांच्या खूप जवळचा व्यक्ती आहे. मला कुणीच प्रश्न विचारला नाही की तू ही भूमिका का करतोय? मला अजिबातच भीती वाटली नाही. भीती वाटली असती तर मी कलाकार झालोच नसतो,” असं प्रसाद ओकने सांगितलं.

“९५ चित्रपट केल्यानंतरही अशा संधीची वाट पाहत होतो”

कलाकार म्हणून प्रत्येकजण चांगल्या भूमिकेच्या आणि संधीच्या प्रतीक्षेत असतो, असं प्रसादने सांगितलं. तो म्हणाला, “प्रत्येक कलाकार चांगल्या भूमिकेची, संधीची वाट पाहत असतो. मी जवळपास ९५ चित्रपट केले, तरीसुद्धा मी अशा संधीची वाट पाहत होतो.”

‘धर्मवीर’ हा त्याच्या कारकिर्दीतील ९६ वा चित्रपट होता आणि या भूमिकेसाठी त्याने सर्वस्व झोकून दिलं होतं.

Ananya Raj Death: कोण होती अनन्या राज? १५ जुलैला निधन; कुटुंबाने महिनाभर का लपवून ठेवली निधनाची बातमी? मृत्यूचं कारणही सांगितलं

‘धर्मवीर’ पाहिल्यानंतर उद्धव ठाकरे रस्त्यावर थांबले

दरम्यान, चित्रपट पाहिल्यानंतरचा एक खास प्रसंग सांगताना प्रसाद ओकने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेबद्दलही भाष्य केलं.

प्रसाद म्हणाला, “चित्रपट पाहिल्यानंतर संजय राऊत यांनी माझं खूप कौतुक केलं. ‘धर्मवीर’ पाहिल्यानंतर तर जोपर्यंत प्रसाद ओक येत नाही, तोपर्यंत मी मीडियाला प्रतिक्रिया देणार नाही, असं सांगून उद्धव ठाकरे रस्त्यावरच उभे राहिले.”

पुढे हा प्रसंग आठवताना प्रसाद म्हणाला, “त्यावेळी मला गर्दीतून खाली आणलं गेलं. उद्धव ठाकरे माझ्यासाठी असे थांबले आहेत, हे समजल्यावर मला थोडं संकोचल्यासारखंच झालं.”

रंगभूमीवर उलगडणार एका गावाची हृदयस्पर्शी कथा! ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’मध्ये प्रेम, कर्तव्य आणि माणुसकीचा अनोखा संगम

“तू आल्याशिवाय मला तुझं कौतुक करायचं नव्हतं”

उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी प्रसाद ओकचं कौतुक करताना नेमकं काय म्हटलं, हेही अभिनेत्याने सांगितलं.

“ते मला म्हणाले की, ‘तू आल्याशिवाय मला तुझं कौतुक करायचं नव्हतं.’” उद्धव ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेची आठवण प्रसाद ओकने मुलाखतीत सांगितली.

या भूमिकेमुळे राजकीयदृष्ट्या आपल्याला कोणताही त्रास झाला नसल्याचंही प्रसादने स्पष्ट केलं. “त्यामुळे राजकीयदृष्ट्या मला कोणाचाही त्रास झाला नाही,” असं त्याने सांगितलं.

‘धर्मवीर’मधील आनंद दिघे यांच्या भूमिकेला मिळालेलं प्रेम आणि या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे यांनी केलेलं कौतुक हा प्रसाद ओकच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा अनुभव ठरला आहे.

Web Title: Uddhav thackeray waiting for me prasad oak shared dharmaveer movie incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • prasad oak
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar Murder : उद्धव ठाकरे थेट पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला, ‘शेवटपर्यंत तुमच्यासोबत’ म्हणत दिला मोठा शब्द
1

Pradeep Purnekar Murder : उद्धव ठाकरे थेट पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला, ‘शेवटपर्यंत तुमच्यासोबत’ म्हणत दिला मोठा शब्द

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
2

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
3

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
4

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.