Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pradeep Purnekar Murder : उद्धव ठाकरे थेट पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला, ‘शेवटपर्यंत तुमच्यासोबत’ म्हणत दिला मोठा शब्द

Pradeep Purnekar Murder : ठाण्यातील मानपाडा परिसरात ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांना धीर देत भावनिक होऊन कोणतेही पाऊल न उचलण्याचा सल्ला दिला.

  • By विवेक
Updated On: Oct 01, 2026 | 04:52 PM
Uddhav Thackeray at Pradeep Purnekar recidence

Uddhav Thackeray at Pradeep Purnekar recidence

Follow Us
Follow Us:
  • उद्धव ठाकरेंनी प्रदीप पूर्णेकरांच्या कुटुंबीयांची भेट घेतली
  • ‘शांत डोक्याने निर्णय घ्या’, असा मुलगा आणि भावाला सल्ला
  • कुटुंबीयांकडून CBI चौकशी आणि न्यायालयाच्या देखरेखीखाली तपासाची मागणी
 

ठाणे : ठाण्याच्या मानपाडा परिसरात ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या (Pradeep Purnekar Murder) झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेनंतर बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकर यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.

उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकरांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यामुळे भावुक वातावरण निर्माण झाले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांना धीर देत भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका, असा सल्ला दिला.

“शेवटपर्यंत तुमच्या कुटुंबासोबत राहू” ठाकरेंनी दिला शब्द

उद्धव ठाकरे यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नी विजेता पूर्णेकर, मुलगा राम पूर्णेकर आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी संवाद साधला. ‘सध्याच्या घडीला जे काही कराल ते शांत डोक्याने करा. भावनेच्या भरात कोणतंही पाऊल उचलू नका,’ असा सल्ला त्यांनी पूर्णेकर यांच्या मुलाला आणि भावाला दिल्याची माहिती आहे. तसेच, शेवटपर्यंत तुमच्या कुटुंबासोबत राहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘गांxxx दम नाही तर कशाला…’, संजय राऊतांनी शेअर केली मीनाक्षी शिंदेंची कथित ऑडिओ क्लिप; ठाण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप

यावेळी पूर्णेकर कुटुंबीयही भावूक झाले होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या घरी एकदा तरी यावं, अशी प्रदीप पूर्णेकर यांची इच्छा होती. ‘तुम्ही आज घरी आलात हे पाहून त्यांना आनंद झाला असता,’ अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.

पूर्णेकर कुटुंबीयांची CBI चौकशीची मागणी

दरम्यान, या हत्या प्रकरणाच्या तपासाबाबतही कुटुंबीयांनी उद्धव ठाकरेंसमोर आपली भूमिका मांडली. या प्रकरणाचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा आणि CBI चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

एफआयआरमध्ये काही नावांचा समावेश करण्यावरूनही पूर्णेकर कुटुंबीयांनी गंभीर दावा केला. “सुरुवातीला मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नावं एफआयआरमध्ये नोंदवण्यास पोलीस तयार नव्हते. मात्र, संजय राऊत आल्यानंतर ही नावं एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आली,” असा दावा कुटुंबीयांनी केला.

ठाणे महापालिका निवडणुकीतील कथित फेरफार आणि पैशांच्या वापराबाबतही पूर्णेकर कुटुंबीयांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. मात्र, या सर्व आरोपांची अधिकृत तपासातून पडताळणी होणे बाकी आहे. मानपाडा, मनोरमा नगर आणि आझाद नगर परिसरात प्रदीप पूर्णेकर यांचा राजकीय प्रभाव असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्या हत्येनंतर ठाण्यातील राजकीय वातावरणातही या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत.

Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट

Web Title: Pradeep purnekar murder uddhav thackeray meets family thane manpada vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • sanjay raut
  • Shivsena UBT
  • Thane news
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis Chhath Pooja : जुहू चौपाटीवर छठपूजेचा जनसागर! ‘एक समुद्र पाण्याचा, दुसरा जनतेचा!’ चौपाटीवर फडणवीसांचं खास भाषण
1

Devendra Fadnavis Chhath Pooja : जुहू चौपाटीवर छठपूजेचा जनसागर! ‘एक समुद्र पाण्याचा, दुसरा जनतेचा!’ चौपाटीवर फडणवीसांचं खास भाषण

Prakash Ambedkar : छटपूजेवरून प्रकाश आंबेडकर आक्रमक, ठाकरे बंधूंवर NSA लावणार की नाही? भाजपला थेट सवाल!
2

Prakash Ambedkar : छटपूजेवरून प्रकाश आंबेडकर आक्रमक, ठाकरे बंधूंवर NSA लावणार की नाही? भाजपला थेट सवाल!

Aaditya Thackeray : एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा धक्का? ऑपरेशन टायगर 3 ची चर्चा सुरू होताच आदित्य ठाकरे संतापले
3

Aaditya Thackeray : एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा धक्का? ऑपरेशन टायगर 3 ची चर्चा सुरू होताच आदित्य ठाकरे संतापले

Bhayandar Fort Making Competition 2026 : भाईंदरमध्ये शिवसेनेतर्फे किल्ले बनविणे स्पर्धा २०२६; विजेत्यांना २५ हजारांचे पारितोषिक
4

Bhayandar Fort Making Competition 2026 : भाईंदरमध्ये शिवसेनेतर्फे किल्ले बनविणे स्पर्धा २०२६; विजेत्यांना २५ हजारांचे पारितोषिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.