Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aga Aai Aaho Aai Review: पुण्याची आई, कोल्हापूरची सासू अन् प्रेमळ नात्यांची सुंदर ओढाताण; हृताची सिरीज प्रेक्षकांची मनं जिंकणार?

Aga Aai Aaho Aai Review: हृता दुर्गुळे, निर्मिती सावंत आणि रेणुका शहाणे यांच्या दमदार अभिनयाने सजलेली 'अगं आई, अहो आई' ही वेब सीरिज सासू-सुनेच्या नात्याला नवा अर्थ देते. वाचा सविस्तर रिव्ह्यू.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 24, 2026 | 11:40 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Aga Aai Aaho Aai Review: सासू-सुनेचं नातं म्हणजे वाद, टोमणे आणि कटकारस्थान अशी प्रतिमा आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांत पाहायला मिळाली. मात्र झी ५ मराठीवरील ‘अगं आई अहो आई’ ही वेब सिरीज या चौकटीला छेद देत सासू, आई आणि मुलगी यांच्यातील प्रेम, समजूतदारपणा आणि जिव्हाळ्याच्या नात्याची सुंदर कहाणी सांगते.

कथेच्या केंद्रस्थानी आहे पुण्यात वाढलेली श्रेया (हृता दुर्गुळे). लग्नानंतर नव्या घरातील माणसं, वेगळ्या चालीरीती आणि नव्या नात्यांशी जुळवून घेताना तिचा प्रवास अनेक भावनिक वळणं घेतो. रेणुका शहाणे श्रेयाच्या आईच्या भूमिकेत, निर्मिती सावंत प्रेमळ आणि समंजस सासू सुनिताताईंच्या भूमिकेत, तर सुयोग गोऱ्हे अनिशच्या भूमिकेत सहज आणि नैसर्गिक अभिनय करताना दिसतात.

“लग्न झाल्यावर फक्त नवरा-बायको एकत्र येत नाहीत, तर दोन कुटुंबं एकत्र येतात,” ही संकल्पना मालिकेच्या पहिल्याच प्रसंगातून प्रभावीपणे मांडली जाते. कोल्हापूरचा अनिश आपल्या एकत्र कुटुंबाची ओळख श्रेयाशी करून देतो. अनेक नव्या चेहऱ्यांमध्ये गोंधळलेली श्रेया जेव्हा घरात प्रवेश करते, तेव्हा सुनिताताई तिचा हात हातात घेऊन प्रेमाने घरात आणतात. हा साधा पण हृदयस्पर्शी प्रसंग मालिकेचा सूर ठरवतो.

लग्नानंतर श्रेयाची आई तिला भेटण्यासाठी येते. आपल्या मुलीने सासूला “आई” म्हणून हाक मारणं, तिच्याकडून घरातील गोष्टी शिकणं आणि तिला स्वतःच्या आईइतकंच मानणं पाहून तिच्या आईच्या मनात होणारी घालमेल वास्तववादी पद्धतीने मांडली आहे. मात्र त्याचवेळी आई मुलीच्या प्रत्येक अडचणीत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.

‘गौरवपेक्षा माझा कुत्रा बरा…’, ‘Lock Upp 2’मध्ये आकांक्षा चमोलाचं वादग्रस्त वक्तव्य; नेटकऱ्यांनी चांगलंच धरलं धारेवर

मालिकेतील सर्वात भावनिक प्रसंग म्हणजे मंगळागौरीच्या दिवशी श्रेयाला आलेली मासिक पाळी. कार्यक्रमाच्या दिवशीच आलेल्या या अडचणीमुळे ती आधी आईला सांगते. मात्र श्रेयाची अस्वस्थता ओळखून सासूबाई स्वतः पुढाकार घेतात. त्या श्रेयासाठी काढा बनवतात, गरम पाण्याची पिशवी देतात आणि आईप्रमाणे तिची काळजी घेतात. या एका प्रसंगातून सासू-सुनेचं नातं आई-लेकीच्या नात्यात कसं रूपांतरित होतं, हे अत्यंत सुंदररीत्या दाखवण्यात आलं आहे.

मालिकेची खरी ताकद तिच्या छोट्या-छोट्या प्रसंगांत आहे. बारशाचा कार्यक्रम, घरातील विविध समारंभ, श्रेयाच्या आणि सासूबाईंच्या गप्पा, अनिश आणि श्रेयाच्या आईमधील वाढत जाणारं आई-मुलाचं नातं, तसेच घरातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांसाठी उभी राहताना दिसणारे प्रसंग कथेला अधिक भावनिक आणि वास्तववादी बनवतात.

मालिकेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिची कथनशैली. प्रत्येक भागाची सुरुवात श्रेया आणि अनिश यांच्या लग्नाआधीच्या आयुष्यातील एका छोट्याशा प्रसंगाने होते. त्यानंतर कथा वर्तमानकाळात येते आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील एखादा नवा अनुभव, नात्यांमधील बदल किंवा भावनिक प्रसंग उलगडत जातो.

कथेला आणखी भावनिक वळण तेव्हा मिळतं, जेव्हा श्रेयाच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करावं लागतं. या कठीण प्रसंगात अनिश जावई म्हणून नव्हे, तर घरातील मुलगा म्हणून सर्व जबाबदाऱ्या पार पाडतो. त्याची आईही पुण्यात येऊन श्रेयाच्या माहेरच्या कुटुंबाला आधार देते. मात्र या सर्वांमध्ये आई आणि अनिश यांच्यात वाढत जाणारं आई-मुलाचं नातं पाहून श्रेयाच्या मनात निर्माण होणारी असुरक्षितता अतिशय सूक्ष्मपणे दाखवण्यात आली आहे.

सीरिजमधील सर्वात वेगळा आणि लक्षवेधी पैलू म्हणजे सासू आणि सुनेचं नातं. सामान्यतः आईला मुलीच्या मनातील घालमेल सर्वप्रथम समजते, पण इथे चित्र वेगळं आहे. सुनिताताईंना श्रेयाच्या मनात काय सुरू आहे, तिची अस्वस्थता काय आहे, हे शब्दांशिवाय कळतं आणि त्या त्यानुसार तिची साथ देतात. त्याचप्रमाणे माहेर आणि सासर यांच्या नात्यांमध्ये अनावश्यक हस्तक्षेप किंवा कृत्रिम संघर्ष दाखवण्याऐवजी परस्पर समजूतदारपणाला महत्त्व देण्यात आलं आहे. त्यामुळे कथानक कुठेही ओढूनताणून वाटत नाही.

Ramayana Trailer: ‘रामायणम्’चा ट्रेलर लांबणीवर; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नमित मल्होत्रांची मोठी घोषणा?

श्रेया दोन्ही कुटुंबांमध्ये सुंदर समतोल साधताना दिसते. कोल्हापूरची सासू आणि पुण्याची आई यांचं नातं मैत्रिणींप्रमाणे फुलतं, तर अनिश आणि श्रेयाच्या आईचं आई-मुलाचं नातं अधिक घट्ट होतं. तर  श्रेया आणि अनिशचे वडील त्यांच्या-त्यांच्या जागी अगदी परफेक्ट दाखवले आहेत. शेवटच्या भागात श्रेया सासूबाईंसोबत, तर अनिश श्रेयाच्या आईसोबत सरप्राईजचा प्लॅन करताना दिसतो, त्यामुळे शेवटही उत्सुकता वाढवणारा ठरतो.

दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी ‘अगं आई, अहो आई’मधून सासू-सून, सासू-जावई आणि विहीणबाई या नात्यांमधील मैत्रीचा एक वेगळाच पैलू उलगडला आहे. कृत्रिम नाट्य, अनावश्यक संघर्ष किंवा नकारात्मकता टाळून त्यांनी नात्यांतील प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणाचा प्रवास प्रभावीपणे मांडला आहे. त्यामुळे ही वेब सिरीज केवळ मनोरंजन करत नाही, तर नात्यांचा खरा अर्थही नव्याने समजावून सांगते.

Web Title: Aga aai aho aai review not a typical saas bahu feud but a heartwarming tale of love how is hruta durgule new web series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi zee5
  • Web Series

संबंधित बातम्या

Ramayana Trailer: ‘रामायणम्’चा ट्रेलर लांबणीवर; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नमित मल्होत्रांची मोठी घोषणा?
1

Ramayana Trailer: ‘रामायणम्’चा ट्रेलर लांबणीवर; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नमित मल्होत्रांची मोठी घोषणा?

Pritam And Pedro: सायबर सुरक्षेचा संदेश देणार ‘प्रीतम अँड पेड्रो’; देशभरातील शाळांमध्ये राबवणार विशेष जनजागृती अभियान
2

Pritam And Pedro: सायबर सुरक्षेचा संदेश देणार ‘प्रीतम अँड पेड्रो’; देशभरातील शाळांमध्ये राबवणार विशेष जनजागृती अभियान

Marathi Serial: आषाढी वारीचा भक्तिरंग झी मराठीवर! ‘सनई चौघडे’ आणि ‘कमळी’मध्ये रंगणार खास वारी विशेष भाग
3

Marathi Serial: आषाढी वारीचा भक्तिरंग झी मराठीवर! ‘सनई चौघडे’ आणि ‘कमळी’मध्ये रंगणार खास वारी विशेष भाग

Shefali Jariwala: पराग त्यागीवर पुन्हा कोसळला दु:खाचा डोंगर, शेफाली जरीवालनंतर सिम्बा चाही मृत्यू, म्हणाला “मलाही…”
4

Shefali Jariwala: पराग त्यागीवर पुन्हा कोसळला दु:खाचा डोंगर, शेफाली जरीवालनंतर सिम्बा चाही मृत्यू, म्हणाला “मलाही…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.