Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोशल मीडियाने बदललं आयुष्य! YouTube-insta मुळे प्रसिद्ध झालेले मराठी Content creators कोण?

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक मराठी कलाकारांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. YouTube, Instagram आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक creators आज लाखो लोकांपर्यंत पोहोचले आहेत. विनायक माळी, अथर्व सुदामे, करण सोनवणे यांच्यासह अनेक मराठी creators यांनी मेहनत, सातत्य आणि टॅलेंटच्या जोरावर यश मिळवलं.

  • By Dilip Bane
Updated On: Jun 02, 2026 | 05:51 PM
Famous marathi content creator list

Famous marathi content creator list

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियामुळे अनेक मराठी कलाकारांना मिळाली मोठी ओळख
  • YouTube आणि Instagram मुळे बदललं अनेक creators चं आयुष्य
  • मेहनत, टॅलेंट आणि सातत्यामुळे तयार झाली वेगळी ओळख
  • विनायक माळी ते अथर्व सुदामे; जाणून घ्या यशाची कहाणी
  • मराठी creators कसे बनले लाखो लोकांचे आवडते चेहरे?
  • कोण आहेत YouTube मुळे प्रसिद्ध झालेले मराठी कलाकार?
कुठल्याही क्षेत्रात नाव कमावणे तसेच ते टिकवून ठेवणे फार महत्त्वाचं असतं कारण त्यात खूप सारी जवळची माणसं पण असतात जी तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतात. त्यासाठी अजून महत्त्वाचं असतं ते एक प्लॅटफॉर्म जिथे तुम्ही तुमचं कौशल्य दाखवू शकता. पण आपण टॅलेंटेड असूनही आपली कला सादर करू शकलो नाही म्हणून आपण कितीतरी वेळा विचार सोडून देतो. पण सोशल मीडियाच्या जमान्यात तुम्हाला स्वच्छंदी आयुष्य जगायला मिळतं, जे काही वाटतं ते मुक्तपणे मांडता येतं. त्यासाठी तुमच्याकडे इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे. खूप सारे असे प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही तुमची कला सादर करू शकता.

एक गोष्ट अजून महत्त्वाची ती म्हणजे प्लॅटफॉर्म असूनही तुमच्यात उपजत कला असावी लागते. ती नसेल तर फार कोणी तुम्हाला महत्त्व देणार नाही. असं असतं तर सगळेच क्रिएटर झाले असते पण तसं शक्य नसतं. म्हणून मराठीमध्ये सोशल मीडियाचा वापर करून जे फेमस झाले आहेत त्या कलाकारांची यादी आणि त्यांची मेहनत जाणून घेऊया.

Raja Shivaji Box Office Collection : मराठीतला रेकॉर्डब्रेक सिनेमा; ‘राजा शिवाजी’ची 100 कोटींची कमाई

YouTube मुळे प्रसिद्ध झालेले मराठी Creators / कलाकार

१) विनायक माळी

विनायक माळी महाराष्ट्रातील एक लोकप्रिय मराठी YouTuber आहे. त्याची विनोद शैली इतरांपेक्षा थोडी वेगळी असल्यामुळे तो लोकांच्या लगेच लक्षात राहतो. आरमुठ्या म्हणून आपली वेगळी शैली त्याने लोकांसमोर सादर केली. प्रेक्षकांना ही त्याची भूमिका फार आवडली म्हणून त्याचे सगळेच व्हिडिओ मिलियन क्रॉस करतात. त्याचे शेठ माणूस तसेच माझी बायको या सिरीज फार लोकप्रिय आहेत. पनवेलमध्ये जन्मलेल्या या YouTuber ने आगरी-कोळी शैलीत आपला ठसा उमटवला आहे.

२) अथर्व सुदामे

ऐतिहासिक वारसा लाभलेलं एक प्रसिद्ध शहर म्हणजे पुणे आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या या शहरात मराठीमध्ये जेवढे कलाकार दिसतील त्यातले निम्याहून अधिक पुणे या शहरातून आलेले असतील. त्यापैकी एक म्हणजे अथर्व सुदामे. अथर्वाची विनोदी शैली सुद्धा त्याची खास ओळख आहे. इन्स्टंट जोक तयार करून हसवणे ही त्याची खासियत. पुणेरी टोमणे वापरून जोक तयार करणे, त्यावर रील बनवून लोकांना हसवणे म्हणून त्याच्या रील्स फार व्हायरल होतात. अथर्व मराठी चित्रपट क्षेत्रात आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे.

३) करण सोनवणे (Focused Indian)

करण सोनवणे हा Focused Indian या नावाने सोशल मीडियावर फेमस आहे. त्याची कॉमेडी काही प्रमाणात आपल्याला अथर्व सुदामे याची आठवण करून देते. करण relatable comedy, social satire आणि entertaining content तयार करून लोकांना हसवण्याचं काम करत असतो. बिग बॉस मराठीमध्येही त्याने भाग घेतला होता. रील्समधून त्याने स्वतःची acting skills दाखवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

४) जस्ट नील थिंग्स

Just Neel Things हा सुद्धा मराठीमधील मोठा content creator म्हणून ओळखला जातो. Just Neel Things या नावाने YouTube चॅनलवर तो आपले दैनंदिन व्हिडिओ publish करत असतो. त्याने प्रसिद्ध मराठी वेड लावलं या गाण्यावर आपली कला सादर केली होती. मराठी YouTube community मध्ये त्याचं मोठं नाव असल्यामुळे Insta Fest वर त्याला प्रसिद्धी मिळाली होती.

५) सौरभ घाडगे

सौरभ घाडगे हा हजरजबाबी comedy creator आहे. विनोद तयार करण्यासाठी त्याला कधी topic ची गरज लागत नाही. कुठल्याही परिस्थितीवर जोक निर्माण करणे ही त्याची खासियत. Short videos तयार करून social punch मारत लोकांना हसवणे आणि रडवणे ही त्याच्या विनोदाची शैली आहे.

६) अथर्व रुके

हा असा content creator आहे ज्याने कुठलीही पार्श्वभूमी नसताना आपलं अस्तित्व तयार केलं आहे. स्वतःच्या content वर त्याचा फार विश्वास आहे. त्याची मेहनत त्याला वेगळं बनवते. स्त्री पात्र साकारून विनोद निर्माण करणे ही त्याची खासियत आहे. तुंबाडची मंजुळा या आगामी मराठी चित्रपटातून तो अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. एक गुणी कलाकार म्हणून त्याला लोक ओळखत आहेत.

मराठी content creators पाहिले तर लिस्ट तशी भलीमोठी आहे. पण सोशल मीडियाचा वापर करून आपलं नाव एका वेगळ्या उंचीवर नेणारे हे काही मोजके कलाकार आहेत ज्यांनी स्वतःची एक खास ओळख तयार केली आहे.

Small Business Ideas: कमी पैशात सुरू करा स्वतःचा व्यवसाय! ‘हे’ 8 भन्नाट कल्पना तुम्हाला करून देतील बंपर कमाई

Web Title: Marathi content creators success story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • Entertainment marathi
  • YouTuber

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.