Raja Shivaji Box Office Collection : मराठीतला रेकॉर्डब्रेक सिनेमा; ‘राजा शिवाजी’ची 100 कोटींची कमाई
‘जय भवानी जय शिवाजी’ असा नामघोष ऐकला की आपसुकच अंगात दहा हत्तींचं बळ संचारतं. असं हे महाराष्ट्राचं आराध्य़ दैवत छत्रपती शिवाजी महारांजांचा इतिहास वेगळ्या धाटणीने मांडण्याचा प्रयत्न केला ते रितेश देशमुख आणि जिओ स्टुडिओजने केला. या सिनेमाने मराठी सिनेविश्वातील आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडून काढले. विकेंडला सर्वात जास्त कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे. चित्रपटाच्या प्रभावी मांडणी, भव्य निर्मितीमूल्ये आणि भावनिक कथनशैलीमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. थिएटरमधील अनुभव हा एक सणासारखा वाटत असून, महाराष्ट्रभर चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. हाऊसफुल्ल शो आणि वाढती प्रेक्षकसंख्या हे या यशाचे प्रमुख निदर्शक ठरत आहेत. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीलाही देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मराठी चित्रपटासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग डे, सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड आणि सर्वाधिक एका दिवसातील कलेक्शनसह विक्रमांची नोंद केल्यानंतर, या भव्य चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात आणि चौथ्या वीकेंडमध्येही आपली यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे.
वेब सिरीजच्या प्रभावाखाली मराठी रंगभूमी; डिजिटल पिढीच्या आवडीनुसार नाटकांच्या मांडणीत नवनवे प्रयोग
बॉक्स ऑफिस ब्रेक-अप (भारत निव्वळ):
पहिला आठवडा: ₹57.70 कोटी
दुसरा आठवडा: ₹27 कोटी
तिसरा वीकेंड: ₹8.40 कोटी
तिसरा आठवडा + चौथा वीकेंड:
18वा दिवस (सोमवार): ₹1.25कोटी
18 वा दिवस (मंगळवार): ₹1.45कोटी
20 वा दिवस (बुधवार): ₹1.20 कोटी
21वा दिवस (गुरुवार): ₹0.95 कोटी
22वा दिवस (शुक्रवार): ₹0.70 कोटी
23 वा दिवस (शनिवार): ₹1.35 कोटी
24वा दिवस (रविवार): ₹1.40 कोटी
फक्त भारतातील एकूण कमाई: ₹101.40 कोटी असं एकंंदरित या सिनेमाची यशस्वीरित्या वाटचााल सुरु आहे.






