Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadi Wari New Song: विठ्ठलनामाचा गजर, भक्तीचा सुरेल सोहळा! ‘पालखी निघाली वारीला’ प्रेक्षकांच्या भेटीला

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीनिमित्त 'पालखी निघाली वारीला' हे नवीन भक्तिगीत प्रदर्शित झाले आहे. शंकर महादेवन आणि रीवा राठोड यांच्या सुरेल आवाजातील या गीताला रूप कुमार राठोड यांचे संगीत लाभले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 20, 2026 | 03:14 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात विठ्ठलभक्तांसाठी एक खास संगीतमय भेट घेऊन ‘पालखी निघाली वारीला’ हे नवीन भक्तिगीत प्रदर्शित करण्यात आले आहे. विठ्ठल नामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि वारकऱ्यांच्या अढळ श्रद्धेचं दर्शन घडवणारं हे गीत नुकतंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.

या भक्तिगीताला ग्रॅमी पुरस्कार विजेते आणि पद्मश्री शंकर महादेवन तसेच मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सन्मानित गायिका रीवा राठोड यांनी आपल्या सुमधुर आवाजाने सजवलं आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ गायक-संगीतकार रूप कुमार राठोड आणि गायिका सुनाली राठोड यांची कन्या असलेल्या रीवा राठोडने याच गीतातून प्रथमच मराठीत गायन केलं आहे.

या गीताला ज्येष्ठ संगीतकार रूप कुमार राठोड यांनी संगीत दिलं असून, डॉ. दीपक वझे यांनी विठ्ठलभक्ती, वारकरी परंपरा आणि श्रद्धेचं सार प्रभावी शब्दांत मांडलं आहे. गाण्याची आकर्षक ध्वनिचित्रफीत सौ. श्वेता परुळकर यांनी साकारली असून, हे गीत DFF प्रस्तुत करत आहे.

Rapper Santy Sharma : CJP आंदोलनावर बोलणं पडलं महागात? रॅपर शेंटी शर्माचं YouTube चॅनल डिलीट; पोस्टने वेधलं लक्ष

आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रदर्शित झालेलं हे भक्तिगीत वारकरी संप्रदायाची भक्ती, एकता आणि परंपरा अनुभवण्याची संधी देत आहे. ‘विठ्ठल… विठ्ठल…’ या नामघोषासह पालखी सोहळ्याचं भव्य दर्शन घडवणारं हे गीत प्रत्येक भक्ताच्या मनात भक्तीचा दीप प्रज्वलित करेल.

या गाण्याविषयी बोलताना शंकर महादेवन म्हणाले, “‘पालखी निघाली वारीला’ गाताना मला प्रत्यक्ष वारीचा अनुभव घेत असल्यासारखं वाटलं. विठ्ठलभक्ती, वारकऱ्यांचा उत्साह आणि त्या वातावरणातील सात्त्विक ऊर्जा या गाण्यातून व्यक्त करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.”

Marathi Serial: ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये अलौकिक गुरुलीला! कावेरीला शिर्डीत साईबाबांच्या रूपात होणार स्वामींचे दिव्य दर्शन

तर रीवा राठोड म्हणाल्या, “वारी ही भावनांची आणि श्रद्धेची अखंड यात्रा आहे. अशा पवित्र भावनेवर आधारित गाण्याचा भाग होता आलं, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. हे गीत ऐकताना श्रोत्यांना विठ्ठलनामात तल्लीन झाल्याचा अनुभव नक्कीच मिळेल.”

Web Title: Palakhi nighali warila shankar mahadevan reeva rathods devotional song

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Ashadhi Wari 2026
  • Eknath Shinde
  • New Song
  • VitthalRukmini

संबंधित बातम्या

Don’t Be Shy Jhoomo Song:  मस्ती, मैत्री आणि तरुणाईचा जोश; ‘डोंट बी शाय’चं धमाकेदार गाणं ‘झूमो’ रिलीज
1

Don’t Be Shy Jhoomo Song: मस्ती, मैत्री आणि तरुणाईचा जोश; ‘डोंट बी शाय’चं धमाकेदार गाणं ‘झूमो’ रिलीज

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद
2

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी,’ एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर खरमरीत टीका
3

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी,’ एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर खरमरीत टीका

Eknath Shinde : ‘शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही पण..,’ अमित ठाकरेंच्या कृतीवर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया
4

Eknath Shinde : ‘शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही पण..,’ अमित ठाकरेंच्या कृतीवर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.