Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Natak: पुण्यातील वाहतूक कोंडीचा नाटकाला फटका; संजय नार्वेकरांनी स्वतः उचललं फर्निचर, कलाकारांनी उभारलं नेपथ्य

Marathi Natak: पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे 'भ्रमाचा भोपळा' नाटकाच्या प्रयोगाला उशीर झाला. संजय नार्वेकर, चेतना आणि कलाकारांनी स्वतः फर्निचर उचलून नेपथ्य उभारल्याचा व्हिडिओ व्हायरल.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 04, 2026 | 03:38 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Marathi Natak: पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीचा फटका आता सांस्कृतिक कार्यक्रमांनाही बसू लागला आहे. नाटक यशस्वीपणे रंगमंचावर सादर होण्यासाठी कलाकारांइतकीच पडद्यामागील बॅकस्टेज टीमचीही मेहनत महत्त्वाची असते. मात्र, वाहतूक कोंडीमुळे ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकाच्या प्रयोगाला मोठा विलंब झाला. अशा परिस्थितीत अभिनेते संजय नार्वेकर आणि इतर कलाकारांनी स्वतःच पुढाकार घेत नेपथ्य उभारले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे नाटकाला उशीर

इन्स्टाग्रामवरील ‘नाटकवेडा मराठी माणूस’ या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये संजय नार्वेकर, चेतना आणि इतर कलाकार नाटकासाठी लागणारे फर्निचर व नेपथ्याचे साहित्य स्वतः उचलून रंगमंचावर मांडताना दिसत आहेत.

पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मिरवणुकांमुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे १ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता हडपसर येथील विठ्ठल तुपे नाट्यगृहात होणाऱ्या ‘भ्रमाचा भोपळा’च्या प्रयोगासाठी नेपथ्य घेऊन येणारी बस तब्बल दोन तास वाहतूक कोंडीत अडकून पडली.

Bigg Boss 20 : ‘तथास-TWO!’ ‘बिग बॉस 20’ची अधिकृत घोषणा; प्रीमियर डेट जाहीर, सलमान खानच्या ‘करण-अर्जुन’शी खास कनेक्शन

दरम्यान, संजय नार्वेकर आणि इतर कलाकार वेळेत नाट्यगृहात पोहोचले होते. मात्र, नेपथ्य वेळेवर न आल्याने प्रयोग सुरू होण्यास विलंब होणार हे स्पष्ट झाले. यावेळी संजय नार्वेकर यांनी स्वतः रंगमंचावर येऊन प्रेक्षकांशी संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती दिली. त्यांच्या या प्रामाणिक संवादामुळे प्रेक्षकांनीही संयम दाखवत कलाकारांना सहकार्य केले.


रात्री १०.४० वाजता प्रयोगाला सुरुवात

अखेर रात्री १०.०३ वाजता नेपथ्याची बस नाट्यगृहात पोहोचली. प्रयोग आणखी लांबू नये म्हणून संजय नार्वेकर, चेतना आणि संपूर्ण कलाकारांसह बॅकस्टेज टीमने सेटचे साहित्य स्वतः उचलून नेपथ्य उभारण्यास सुरुवात केली. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे अल्पावधीतच तयारी पूर्ण झाली आणि रात्री १०.४० वाजता नाटकाचा पडदा उघडला.

2026-27 Upcoming Movies: 2026-27 मध्ये बॉक्स ऑफिसवर राज्य करणार या अभिनेत्री; आलिया, तमन्ना, श्रद्धामध्ये कोणाची जादू चालणार?

वाहतूक कोंडीसारख्या मोठ्या अडचणीवर कलाकारांची जिद्द आणि प्रेक्षकांच्या संयमामुळे मात करता आली. या प्रसंगानंतर संजय नार्वेकर आणि संपूर्ण टीमच्या समर्पणाचे सोशल मीडियावर कौतुक होत असून, “शो मस्ट गो ऑन” या उक्तीचा प्रत्यय त्यांनी पुन्हा एकदा घडवून दिला.

Web Title: Marathi natak bhramacha bhopala delayed due to pune traffic sanjay narvekar video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • marathi actor
  • Marathi celebrities
  • Pune Traffic

संबंधित बातम्या

Entertainment News: एकेकाळी मिळाली भरभरून प्रसिद्धी… आज उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवतोय हा अभिनेता; कोण आहे तो?
1

Entertainment News: एकेकाळी मिळाली भरभरून प्रसिद्धी… आज उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवतोय हा अभिनेता; कोण आहे तो?

Sachin Deshpande: इन्स्टावर कमी फॉलोवर्समुळे नाही तर… अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, सांगितलं इंडस्ट्रीचं भयावह वास्तव
2

Sachin Deshpande: इन्स्टावर कमी फॉलोवर्समुळे नाही तर… अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, सांगितलं इंडस्ट्रीचं भयावह वास्तव

Ajinkya Rahane: ‘आई म्हणायची, बघ तो कुठे पोहोचला अन् तू…’; अजिंक्य रहाणेबरोबर क्रिकेट खेळायचा ‘हा’ मराठी अभिनेता, फोटो पाहा
3

Ajinkya Rahane: ‘आई म्हणायची, बघ तो कुठे पोहोचला अन् तू…’; अजिंक्य रहाणेबरोबर क्रिकेट खेळायचा ‘हा’ मराठी अभिनेता, फोटो पाहा

Jhimma 3 Movie : ‘यावेळी तिसराच आहे!’, ‘झिम्मा ३’ची पहिली झलक समोर; नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
4

Jhimma 3 Movie : ‘यावेळी तिसराच आहे!’, ‘झिम्मा ३’ची पहिली झलक समोर; नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.