Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Entertainment News: एकेकाळी मिळाली भरभरून प्रसिद्धी… आज उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवतोय हा अभिनेता; कोण आहे तो?

Entertainment News: मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारून ओळख मिळवलेले अभिनेते रमेश चंदणे सध्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवत आहेत. अभिनय क्षेत्रात अनेक चढ-उतार अनुभवूनही त्यांनी अभिनयाची आवड कायम जपली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 03, 2026 | 05:17 PM
Entertainment News: एकेकाळी मिळाली भरभरून प्रसिद्धी... (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Entertainment News: एकेकाळी मिळाली भरभरून प्रसिद्धी... (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

Marathi Actor Ramesh Chandane: चित्रपटसृष्टीत यश मिळवणं जितकं कठीण आहे, तितकंच त्या यशाला टिकवून ठेवणंही अवघड असतं. अनेक कलाकारांना एक काळ मोठी लोकप्रियता मिळते, पण नंतर काम कमी होतं आणि आयुष्य वेगळ्याच वळणावर येऊन उभं राहतं. अशाच एका अभिनेत्याची कहाणी सध्या चर्चेत आहे. रुपेरी पडद्यावर महत्त्वाच्या भूमिका साकारणारा अभिनेता आज रोजीरोटीसाठी रिक्षा चालवत असला, तरी अभिनयाची ओढ त्याच्या मनातून अजिबात कमी झालेली नाही.

हा अभिनेता नेमका आहे तरी कोण?

अभिनेता रमेश चंदणे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये स्थान मिळवलं. अभिनयाची आवड कॉलेजपासूनच होती. मोठा कलाकार बनण्याचं स्वप्न डोळ्यांत घेऊन त्यांनी मुंबईची वाट धरली. मात्र सुरुवातीचा काळ खूपच कठीण होता. अनेक ठिकाणी ऑडिशन दिल्या, निर्माते आणि दिग्दर्शकांची भेट घेतली, पण अपेक्षित संधी मिळत नव्हती. सततच्या अपयशामुळे त्यांनी मुंबई सोडून पुन्हा गावाकडे जाण्याचा निर्णयही घेतला होता.

आयुष्यात मोठा बदल

याच काळात त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडला. एका फोन कॉलमुळे त्यांना हिंदी चित्रपट ‘हॉस्टेल’मध्ये भूमिका मिळाली. ही संधी त्यांच्या करिअरसाठी महत्त्वाची ठरली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. ‘फोर्स’, ‘सीक्रेट ऑफ गावस्कर’ आणि ‘झपाटलेला २’ यांसारख्या चित्रपटांत त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयाचं कौतुकही झालं आणि प्रेक्षकांनी त्यांना ओळखायला सुरुवात केली. (Entertainment News:)

कामाची गती मंदावली

मात्र मनोरंजन विश्वात प्रत्येक दिवस सारखा नसतो. काही वर्षांनंतर कामाची गती मंदावली. नवीन प्रोजेक्ट मिळणं कमी झालं. दुसरीकडे कुटुंबाची जबाबदारी वाढत होती. घर चालवण्यासाठी नियमित उत्पन्नाची गरज होती. अशा परिस्थितीत रमेश यांनी कोणताही कमीपणा न बाळगता रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी हा केवळ रोजगार होता, स्वप्न नव्हे.

Excel Music Launch: रितेश सिधवानी-फरहान अख्तर यांची मोठी घोषणा; ‘Excel Music’च्या माध्यमातून संगीतविश्वात नवी इनिंग

आर्थिक गुंतवणूकदार आणण्याची अट

रमेश यांना सुरुवातीला वाटलं होतं की काही महिन्यांत पुन्हा अभिनयाची संधी मिळेल. पण वेळ पुढे सरकत गेला आणि परिस्थिती बदलली नाही. अनेक ठिकाणी आश्वासनं मिळाली, पण प्रत्यक्ष काम मिळालं नाही. काहींनी तर भूमिका देण्यासाठी आर्थिक गुंतवणूकदार आणण्याची अट घातली. इतकंच नाही, तर रिक्षा चालवतो म्हणून काही लोकांनी त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं आणि टोमणेही मारले.

काही ऑफर्स स्वीकारल्या नाहीत

दरम्यान, त्यांना ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत रिक्षाचालकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मात्र त्यानंतर सतत त्याच प्रकारच्या भूमिका येऊ लागल्या. एकाच साच्यात अडकायचं नाही, या विचाराने त्यांनी काही ऑफर्स स्वीकारल्या नाहीत. कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची त्यांची इच्छा आजही कायम आहे.

काही काळानंतर त्यांना नागराज मंजुळे यांच्या ‘मटका किंग’ या प्रकल्पात काम करण्याची संधी मिळाली. या भूमिकेत त्यांनी मनापासून काम केलं आणि त्यातून पुन्हा एकदा अभिनयाची ऊर्जा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांना आजही विश्वास आहे की योग्य संधी मिळाली, तर ते पुन्हा एकदा पडद्यावर दमदार पुनरागमन करू शकतात.

Tamannaah Bhatia Jewellery: तमन्ना भाटियाच्या ज्वेलरीची समंथा रुथ प्रभूला भुरळ; इन्स्टाग्राम स्टोरीतून केलं खास कौतुक

अभिनयावरील प्रेमही सोडलं नाही

रमेश चंदणे यांची कहाणी संघर्ष, जिद्द आणि स्वाभिमानाची आहे. परिस्थिती बदलली म्हणून त्यांनी मेहनत करणं थांबवलं नाही आणि अभिनयावरील प्रेमही सोडलं नाही. आज ते रिक्षा चालवत असले, तरी त्यांच्या मनात एकच ओळख कायम आहे—”मी अभिनेता आहे.” त्यांचा हा आत्मविश्वास आणि चिकाटी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 

Web Title: Famed but no work actor ramesh chandane is pulling the family cart by driving a rickshaw

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi actor
  • Marathi News

संबंधित बातम्या

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
1

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
2

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
3

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
4

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.