Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वामींच्या कृपेने ‘सनई चौघडे’चा पहिल्याच आठवड्यात दबदबा; टॉप 10 मध्ये मालिकेने मिळवले स्थान

‘सनई चौघडे’ मालिकेची धमाकेदार सुरुवात झाली असून, अवघ्या काही दिवसातच मालिकेने टॉप १० मध्ये आपली जागा मिळवली आहे. स्वामींच्या आशीर्वादने हे सगळं शक्य झालं असल्याचे टीमने सांगितले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 02, 2026 | 10:54 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • स्वामींच्या कृपेने ‘सनई चौघडे’ची जबरदस्त सुरुवात
  • पहिल्याच आठवड्यात मालिकेचा दबदबा
  • टॉप 10 मध्ये मालिकेने मिळवले स्थान
झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात पहिल्याच आठवड्यात घर करण्यात यशस्वी ठरली आहे. लालबाग-परळच्या पार्श्वभूमीवर आधारित मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कथा प्रेक्षकांना आपलीशी वाटत असून, मालिकेने सुरुवातीपासूनच दमदार पकड घेत टॉप १० मालिकांमध्ये स्थान मिळवले आहे. भावनिक गुंतवणूक, वास्तववादी मांडणी आणि स्वामींचा आशीर्वाद या सगळ्यांच्या जोरावर मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Ramayana : भगवान रामांच्या अवतारात रणवीरला पाहून मंत्रमुग्ध झाले चाहते; चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला

मालिकेच्या लाँच आठवड्यात एक अनोखा आणि विक्रमी उपक्रमही राबवण्यात आला. पमा परब आणि तिच्या कुटुंबाने ७००० हून अधिक स्वामी भक्तांसह ‘श्री स्वामी समर्थ तारक मंत्र’चे सामूहिक पठण करत ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’मध्ये आपली नोंद केली. या उपक्रमामुळे मालिकेला एक वेगळी ओळख मिळाली आणि प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली.

आता मालिकेच्या दुसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांसाठी आणखी एक मोठा ट्विस्ट आणि सरप्राईज पाहायला मिळणार आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर ‘सनई चौघडे’मध्ये ‘सत्यजीत’ या महत्त्वपूर्ण भूमिकेत एन्ट्री करत आहे. त्याच्या आगमनामुळे मालिकेतील नातेसंबंध आणि कथानकाला एक नवं वळण मिळणार आहे.

भारतासह परदेशातही Dhurandhar 2 घालतोय धुमाकूळ; 14 व्या दिवशी चित्रपटाची कोटींची कमाई

सध्या कथानकात शर्वरी नोकरीच्या शोधात मुलाखती देताना दिसत आहे. योगायोगाने ती ज्या कंपनीत इंटरव्ह्यू देते, ती कंपनी सत्यजीतचीच निघते. याचदरम्यान जय खानोलकरही एका बिझनेस डीलसाठी सत्यजीतला भेटायला येतो. या तिघांच्या भेटीतून कथानकात नवा संघर्ष आणि नाट्य निर्माण होणार आहे. आता शर्वरीला ही नोकरी मिळणार का? सत्यजीतच्या आगमनामुळे जय आणि शर्वरीच्या नात्यात बदल होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ‘सनई चौघडे’ ही मालिका प्रेक्षकांना पाहावी लागणार आहे.

Web Title: Anai choughade zee marathi serial update top 10

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 10:54 AM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Tata Stocks Fall : Chandrasekaran यांच्या राजीनाम्याने शेअर बाजारात खळबळ? टाटाच्या कंपन्यांचे शेअर कोसळले, तब्बल 68000 कोटी स्वाहा
1

Tata Stocks Fall : Chandrasekaran यांच्या राजीनाम्याने शेअर बाजारात खळबळ? टाटाच्या कंपन्यांचे शेअर कोसळले, तब्बल 68000 कोटी स्वाहा

Airtel Recharge : एयरटेल ग्राहकांना मोठा धक्का! प्लॅन्सच्या किमतीत थेट वाढ;  299 चा प्लॅन आता ‘इतका’ महागला
2

Airtel Recharge : एयरटेल ग्राहकांना मोठा धक्का! प्लॅन्सच्या किमतीत थेट वाढ; 299 चा प्लॅन आता ‘इतका’ महागला

Jaya Hind Industries : जय हिंद इंडस्ट्रीजची मोठी घोषणा! पुढील 2 वर्षांत 600 कोटींची गुंतवणूक; उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्लॅन?
3

Jaya Hind Industries : जय हिंद इंडस्ट्रीजची मोठी घोषणा! पुढील 2 वर्षांत 600 कोटींची गुंतवणूक; उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्लॅन?

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
4

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.