Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुरुंच्या भेटीने भावूक झाले कलाकार; स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यातील खास क्षण

यंदाच्या सोहळ्यातील एक खास क्षण मात्र सर्वांच्या मनात कायमचा कोरला गेला. कलाकारांच्या यशाचा गौरव करणाऱ्या या मंचावर यंदा त्यांच्या यशामागे उभ्या असलेल्या शिक्षकांनाही मानाचा मुजरा करण्यात आला.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 13, 2026 | 01:40 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

यंदाचा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा अनेक अर्थांनी खास आणि संस्मरणीय ठरला. वर्षभर प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या कलाकारांचा गौरव करणारा हा सोहळा केवळ पुरस्कारांचं व्यासपीठ नसून एकमेकांच्या यशाचा आनंद साजरा करणाऱ्या कुटुंबाचा सोहळा म्हणूनही ओळखला जातो.

यंदाच्या सोहळ्यातील एक खास क्षण मात्र सर्वांच्या मनात कायमचा कोरला गेला. कलाकारांच्या यशाचा गौरव करणाऱ्या या मंचावर यंदा त्यांच्या यशामागे उभ्या असलेल्या शिक्षकांनाही मानाचा मुजरा करण्यात आला. कलाकारांना घडवणाऱ्या आणि त्यांच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरलेल्या गुरुजनांचा विशेष सन्मान या मंचावर करण्यात आला.

ज्ञानाची खरी ज्योत महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पेटवली. त्या ज्ञानदीपाची मशाल पुढेही अखंडपणे प्रज्वलित ठेवण्याचं काम अनेक शिक्षिका करत आहेत. ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेच्या निमित्ताने सावित्रीबाईंचा वारसा पुढे नेणाऱ्या ‘सावित्रीच्या लेकीं’चा या सोहळ्यात सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Monalisa Married: ‘लव्ह जिहाद नाही…’,महाकुंभची व्हायरल गर्ल मोनालिसा चर्चेत; मुस्लिम प्रियकराशी लग्नामागचं कारण केलं स्पष्ट

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात एक खास आणि भावनिक क्षण पाहायला मिळाला. अनेक लोकप्रिय कलाकारांच्या शिक्षिका या विशेष प्रसंगी उपस्थित होत्या. यामध्ये मधुराणी गोखले, सुप्रिया पाठारे, शशांक केतकर, अमित भानुशाली, जुई गडकरी, शर्वरी जोग, मृणाल दुसानिस, अभिषेक रहाळकर, समृद्धी केळकर, एतशा संझगिरी, प्रतिक्षा मुणगेकर, माधवी निमकर, सुमीत पुसावळे, विशाल निकम, कृतिका देव, आकाश नलावडे, यशोमन आपटे आणि इंद्रनील कामत या कलाकारांचा समावेश होता.

Ramayan:रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची रिलीज डेट ढकलली पुढे? सोशल मीडियावर चाहत्यांचा उडाला गोंधळ

आपल्या शिक्षकांना पुन्हा भेटताना कलाकार खूप भावूक झाले. त्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. काही कलाकारांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, तर काहींनी शिक्षकांच्या आशीर्वादामुळेच आपण आज या उंचीवर पोहोचलो असल्याचे सांगितले.

गुरु-शिष्य नात्याचा हा सुंदर सोहळा पाहून प्रेक्षकही भावूक झाले. कलाकारांच्या यशामागे उभ्या असलेल्या शिक्षकांना दिलेला हा सन्मान सोहळ्याला अधिक अर्थपूर्ण बनवणारा ठरला.

Web Title: Artists get emotional meeting their gurus special moments at star pravah parivar puraskar ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • awarded
  • Entertainemnt News
  • star pravah

संबंधित बातम्या

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
1

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
2

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
4

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.