Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jay Jay Swami Samarth: स्वामींची शिवनाथ-राधाला अंतिम चेतावणी; दिला ३ दिवसांचा अवधी, अक्कलकोटमध्ये मोठा ट्विस्ट

Jay Jay Swami Samarth: ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत शिवनाथ-राधाला स्वामींनी तीन दिवसांची मुदत दिली आहे. रेणुकाच्या अक्कलकोटमधील परतण्याने संघर्ष अधिक तीव्र झाला असून, पुढे काय घडणार याची उत्सुकता वाढली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 21, 2026 | 02:40 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Jay Jay Swami Samarth: कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ – अध्याय स्वामीसेवेच्या कृपाप्रसादाचा’ मालिकेत अक्कलकोटमधील संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. स्वामींनी शिवनाथ आणि राधाला थेट तीन दिवसांची मुदत दिली आहे. आपली पापं कबूल करा आणि केलेल्या चुका सुधारा, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा स्वामींनी दिला आहे.

शिवनाथ आणि राधाच्या हातात देण्यात आलेलं वाळूचं घड्याळ या उलटणाऱ्या वेळेचं प्रतीक ठरत असून, या अंतिम इशाऱ्यामुळे दोघांवर मानसिक दबाव वाढत आहे. आता या तीन दिवसांत ते आपल्या चुका मान्य करणार का, की शेवटपर्यंत सत्य लपवण्याचा प्रयत्न करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रेणुका अक्कलकोटमध्ये परतल्याने शिवनाथ हादरला

या तीन दिवसांच्या मुदतीआधीच अक्कलकोटमध्ये आणखी एक मोठं संकट उभं राहिलं आहे. रेणुका पुन्हा अक्कलकोटमध्ये परतल्याचं समजताच शिवनाथ हादरतो. तिच्या तोंडून स्वतःची आणि राधाची पापं, भूतकाळातील रहस्यं आणि अपराध सर्वांसमोर उघड होण्याची भीती त्याला सतावत आहे.

संतापाच्या भरात शिवनाथ रेणुकाचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र, प्रत्येक वेळी तिच्या रक्षणासाठी स्वामी त्याच्या मार्गात ठामपणे उभे राहतात. दुसरीकडे मार्तंडच्या प्रभावाखाली असलेला शिवनाथ आपली चूक मान्य करून सत्य कबूल करण्यास तयार नाही.

स्वामींसमोरही चार दिवसांचं आव्हान

एकीकडे स्वामींनी शिवनाथ-राधाला तीन दिवसांची मुदत दिली आहे, तर दुसरीकडे सुबेदारांनी स्वामींनाही चार दिवसांची मुदत दिली आहे. चार दिवसांत हे प्रकरण संपवा, अन्यथा कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा सुबेदारांनी दिला आहे.

त्यामुळे अक्कलकोटमध्ये दोन काउंटडाऊन सुरू झाले आहेत. एका बाजूला शिवनाथ-राधावर स्वामींचा दबाव, तर दुसरीकडे स्वामींसमोर सुबेदारांनी उभं केलेलं आव्हान. त्यामुळे मालिकेतील तणाव आता शिगेला पोहोचला आहे.

रेणुकाच्या मनगटावरील कापडाचं रहस्य काय?

रेणुका अक्कलकोटमध्ये परत कशी आली? तिच्या मनगटावर बांधलेल्या कापडामागे नेमकं काय रहस्य आहे? स्वामींनी दिलेल्या औषधी लेपामुळे तिच्या मानसिक अवस्थेत काय बदल होणार? तसेच सदाशिवला रेणुकाबद्दल इतकी अनाकलनीय ओढ का वाटते, याचाही उलगडा अद्याप झालेला नाही.

Yad Lagla Song: ‘पुन्हा कर्तव्य आहे’ फेम पूजा चव्हाणचा नवा अंदाज; आकाश यादवसोबतचं ‘याड लागलं’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

दुसरीकडे मार्तंडचा खरा डाव काय आहे आणि शिवनाथ त्याच्या प्रभावातून बाहेर पडणार का, याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. शिवनाथ-राधाला दिसणारी कवटी, वाळूचं घड्याळ आणि वाढत जाणारे भास हे स्वामींचे संकेत आहेत की त्यांच्या कर्मांचा परिणाम, हा प्रश्नही कायम आहे.

शिवनाथ-राधा सत्य कबूल करणार का?

आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे स्वामींनी दिलेल्या तीन दिवसांच्या मुदतीत शिवनाथ आणि राधा सत्य कबूल करणार का? की सुबेदारांची चार दिवसांची मुदत संपण्यापूर्वीच अक्कलकोटमध्ये असा काही अनपेक्षित उलटफेर होणार, ज्यामुळे संपूर्ण परिस्थिती बदलून जाईल?

बाळ अखेर स्वामींकडे सोपवलं जाणार का, रेणुकाच्या भूतकाळाचं गूढ काय आहे आणि मार्तंडचा डाव कुठपर्यंत पोहोचला आहे, याची उत्तरं आगामी भागांत मिळणार आहेत.

पुढील भागांत या सर्व रहस्यांचा उलगडा होणार असून, अक्कलकोटमध्ये आता कोणता मोठा ट्विस्ट घडणार याची उत्सुकता वाढली आहे.

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी जीव धोक्यात घालणार ‘तारिणी’; अमृतसरमध्ये रंगणार गुप्त मोहिमेचा थरार

Web Title: Jay jay swami samarth serial akkalkot twist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!
1

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!

Star Pravah Serial: प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेचा अखेर निरोप; वकिलाची भूमिका साकारताना अभिनेत्याला मिळाला खास अनुभव
2

Star Pravah Serial: प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेचा अखेर निरोप; वकिलाची भूमिका साकारताना अभिनेत्याला मिळाला खास अनुभव

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा
3

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष
4

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.