Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काम नाही, EMI कसे भरायचे? अभिनेत्री अक्षया नाईकने कलाकारांच्या संघर्षावर व्यक्त केल्या भावना

अभिनेत्री अक्षया नाईकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनय क्षेत्रातील अनिश्चितता, कामाचा संघर्ष, आर्थिक अडचणी आणि संधी मिळवण्यासाठी पुढाकार घेण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 09, 2026 | 09:27 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

हिंदी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करून मराठी टेलिव्हिजन आणि ओटीटी विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अक्षया नाईक सध्या एका खास वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकेपासून ते नेटफ्लिक्सवरील गाजलेल्या ‘तस्करी’ वेब सीरिजपर्यंत विविध भूमिका साकारत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र, यावेळी ती तिच्या अभिनयामुळे नव्हे, तर कलाकारांच्या करिअरमधील वास्तव मांडल्यामुळे चर्चेत आहे.

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये अक्षयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मला काम मागायला लाज वाटत नाही.” अभिनय क्षेत्र जितके आकर्षक दिसते, तितकेच ते अनिश्चित असल्याचे तिने म्हटले आहे.

अक्षया म्हणाली, “अभिनय हे करिअर जितकं ग्लॅमरस आहे, तितकंच अनसर्टनही आहे. प्रायोगिक कलाकृतींमधून अनेकदा आर्थिक उत्पन्न मिळत नाही. सोशल मीडियावर मी सतत सक्रिय असल्यामुळे अनेकांना वाटतं की माझ्याकडे भरपूर काम आहे. पण कलात्मक कामाने घरातील बिलं आणि ईएमआय भरले जात नाहीत.”

तिने पुढे सांगितले की, अनेकदा प्रोजेक्ट उशिरा सुरू होतात, काही प्रकल्प मधेच बंद पडतात, तर काही ठिकाणी मानधनही अडकते. “काम हातात असूनही ते नसल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. माझ्या शरीरयष्टीमुळे माझ्यासाठी संधी मर्यादित आहेत, किंवा कदाचित मी योग्य लोकांपर्यंत पोहोचत नाही,” असेही तिने नमूद केले.

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Lock Upp 2: ‘बैंड बजा दी तूने..’,घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ‘लॉक अप 2’मध्ये गौरव खन्नाची एन्ट्री, Akanksha Chamola झाली भावूक

याच कारणामुळे आपणही इतर क्षेत्रांप्रमाणेच काम शोधण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे सांगत ती म्हणाली, “कॉर्पोरेट क्षेत्रातील लोक जसे विविध प्लॅटफॉर्मवर नोकरी शोधतात, तसेच कलाकारांनीही संधी शोधण्यात कमीपणा मानू नये. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियामुळे कलाकारांना अनेक संधी मिळाल्या आहेत.”

आपल्या पोस्टचा उद्देश स्पष्ट करत अक्षया म्हणाली, “माझ्यात चांगलं काम करण्याची क्षमता आहे. मेहनत करण्याची तयारी आहे. फक्त योग्य संधी आणि योग्य लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे.”

Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’मध्ये मोठा ट्विस्ट! शरूमुळे जयला झाल्या आपल्या चुकीची जाणीव; नात्याला मिळणार नवी दिशा

अक्षया नाईकच्या या प्रामाणिक पोस्टला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेक कलाकार आणि चाहत्यांनी तिच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले आहे. अभिनय क्षेत्रातील संघर्ष आणि वास्तव समोर आणणाऱ्या तिच्या या वक्तव्याची सध्या मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे.

Web Title: No work how do you pay the emi actress akshaya naik opens up about the struggles artists face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • tv serial

संबंधित बातम्या

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
1

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
2

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
3

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?
4

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.