( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘लॉक अप सीझन २’ हा वादग्रस्त रिअॅलिटी शो सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या शोमध्ये दररोज नवे खुलासे आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अलीकडेच स्पर्धक अभिनेत्री आकांक्षा चमोला हिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत केलेल्या खुलाशामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर भावूक होत तिने सांगितले की, ती आणि तिचा पती गौरव खन्ना लवकरच घटस्फोट घेणार असून, गेल्या वर्षभरापासून दोघेही वेगळे राहत आहेत. मात्र, आता या कथेला एक भावनिक वळण मिळाले आहे.
शोच्या ताज्या भागात जेलर फराह खान यांनी ‘भेटीची वेळ’ सुरू झाल्याची घोषणा केली. त्यानंतर पहिला पाहुणा म्हणून गौरव खन्नाने शोमध्ये प्रवेश करताच सर्व स्पर्धक आश्चर्यचकित झाले. विशेषतः आकांक्षा चमोला पतीला समोर पाहून भावूक झाली आणि तिच्या डोळ्यांत अश्रू आले.
शोमध्ये प्रवेश करताच गौरव खन्नाने एक भावनिक कविता सादर केली. त्यानंतर पत्नीकडे पाहत तो हसत म्हणाला, “बँड वाजवलीस तू तर!” या एका वाक्यातून त्याच्या मनातील वेदना आणि प्रेम दोन्ही स्पष्टपणे जाणवत होते. गौरवचे शब्द ऐकताच आकांक्षा स्वतःच्या भावना आवरू शकली नाही आणि ती भावूक झाली.
View this post on Instagram
गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानले जात होते. काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी २०१६ मध्ये विवाह केला होता. यापूर्वी गौरव ‘बिग बॉस’मध्ये सहभागी असताना आकांक्षा पाहुणी म्हणून आली होती. त्यानंतरही दोघांचे अनेक रोमँटिक क्षण सोशल मीडियावर चर्चेत राहिले होते. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्यांनी चाहत्यांनाही धक्का बसला.
दरम्यान, आकांक्षा चमोला हिने ‘लॉक अप २’मध्ये आणखी एक वैयक्तिक खुलासा करत सांगितले की,आकांक्षाचा खुलासा आकांक्षा चमोलाने तिच्या घटस्फोटासोबतच, ‘लॉकअप २’ मध्ये तिच्या आयुष्यातील आणखी एक मोठे रहस्य उघड केले. तिने सांगितले की लग्नाआधी ती बायसेक्शुअल होती. तिने हे देखील कबूल केले की लग्नाआधी तिचे अनेक महिलांसोबत गंभीर संबंध होते. आता गौरव खन्नाने स्वतः शोचा एक भाग म्हणून आकांक्षासमोर आपले लैंगिक कल उघड केल्यामुळे, चाहते आगामी भाग पाहण्यासाठी उत्सुक आहेत.






